शहरं
Join us  
Trending Stories
1
Eknath Shinde: काँग्रेसने पाकिस्तानला उत्तर देण्याची कधीच हिंमत दाखवली नाही, शिंदेंची टीका
2
मुस्लीम विद्यार्थी चारच, पण 159 जणांना नमाज पठण करण्यास भाग पाडलं; प्रोफेसरला अटक!
3
Pahalgam Terror Attack : पहलगाम हल्ल्यापूर्वी दहशतवाद्यांनी दाखवलं मॅगी, मोमोजचं आमिष; महिलेचा धक्कादायक खुलासा
4
रशियाने १९७२ साली सोडलेला उपग्रह नियंत्रण सुटून पृथ्वीवर कोसळणार, इथे होऊ शकते धडक, संपूर्ण जगाची चिंता वाढली   
5
युद्धात पाकिस्तानच्या बाजूनं उभं राहणार, भारताचे तुकडे होतील; कोण आहे हा दिल्लीचा शत्रू? मुनीर सैन्यासोबत लढण्याची केली घोषणा
6
आता थांबायचं नाय! 'धर्मवीर' फेम मराठी अभिनेत्याने घेतली शानदार 'थार'; मुलीच्या आनंदाला उधाण
7
पुण्यात आल्यावर मुंबईच्या तरुणीला पटवलं, शरीरसंबंधही ठेवले; नंतर तिच्याच मैत्रिणीसोबत...
8
भयंकर! नवरा-नवरीसोबत आक्रित घडलं, कारला भीषण आग; ७ जणांनी उड्या मारुन वाचवला जीव
9
वैभव सूर्यवंशीने ठोकलं विक्रमी शतक, पण आता लागू शकते क्रिकेटबंदी; खेळाडूच्या आरोपाने चर्चांना उधाण
10
टी-२० वर्ल्ड कप स्पर्धेसंदर्भात ICC ची मोठी घोषणा; सलामीच्या लढतीसह फायनलची तारीख ठरली!
11
छाया कदम यांनी 'ती' गोष्ट अभिमानाने सांगितली अन् अडचणी वाढल्या; अभिनेत्रीची होणार चौकशी
12
Traffic News: पुणे-मुंबई एक्सप्रेसवेवर मोठी वाहतूक कोंडी, ५ किलोमीटरपर्यंत वाहनांच्या रांगा
13
अरे व्वा! रुग्णालयात अनोखा विवाहसोहळा, आजारी वधूला उचलून घेऊन नवरदेवाने घेतल्या सप्तपदी
14
'वेव्हज हे फक्त नाव नाही तर...'; PM मोदींनी WAVES परिषदेमध्ये मनोरंजन क्षेत्रासाठी केली मोठी घोषणा
15
Nagpur: मित्राचा वाढदिवस ठरला आयुष्यातील शेवटचा दिवस, स्विमिंग पूलमध्ये बुडून तरुणाचा मृत्यू
16
“राज ठाकरे-उद्धव ठाकरे एकत्र येत असतील तर...”; मनसे-ठाकरे गट युतीवर काँग्रेस नेते थेट बोलले
17
एआयमुळे २०००० नोकऱ्या मिळणार, Cognizant २०२५ मध्ये फ्रेशर्सची भरती करणार
18
“उद्धव-राज ठाकरे दोघेही भावासमान, महाराष्ट्र हितासाठी मनाचा मोठेपणा दाखवत...”: सुप्रिया सुळे
19
Video - अरे बापरे! टँकर पलटताच तेल लुटण्यासाठी बादल्या, कॅन घेऊन लोकांची झुंबड
20
नाशिक: पोलिसांच्या हाताला झटका देऊन पळालेला क्रिश सापडला, कुठे बसला होता लपून?

कोल्हापूरचे मराठा आरक्षणाला बळ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 30, 2018 00:36 IST

विश्वास पाटील । लोकमत न्यूज नेटवर्क कोल्हापूर : मराठा आरक्षणासाठी आंदोलनाच्या माध्यमातून सरकारवर दबाव निर्माण करण्याबरोबरच त्या चळवळीला अभ्यासात्मक ...

विश्वास पाटील ।लोकमत न्यूज नेटवर्ककोल्हापूर : मराठा आरक्षणासाठी आंदोलनाच्या माध्यमातून सरकारवर दबाव निर्माण करण्याबरोबरच त्या चळवळीला अभ्यासात्मक बळ देण्यातही कोल्हापूरचा वाटा मोठा राहिला आहे. महसूलमंत्री चंद्रकांत पाटील हे तर शासनाने नेमलेल्या उपसमितीचे अध्यक्षच होते. त्यामुळे मराठा आरक्षणाचा निर्णय जाहीर केलेल्या तारखेला होऊ शकला.कोल्हापूरने एकदा मनावर घेतले की मग तो कोणताही विषय असो; त्याची तड लावल्याशिवाय कोल्हापुरी माणूस थांबत नाही. त्याचे प्रत्यंतर म्हणजे कोल्हापुरातील टोललढा. त्यानंतर कोल्हापूरने मराठा आरक्षण चळवळीत तितक्याच नेटाने भाग घेतला. मराठा आरक्षण मागणीसाठी १६ आॅक्टोबर २०१६ ला निघालेला मोर्चाही महाराष्ट्रातील त्यापूर्वीच्या मोर्चाचे उच्चांक मोडणारा होता. त्यानंतर मुंबईत ९ आॅगस्ट २०१७ ला निघालेल्या मोर्चातही कोल्हापूरचा सहभाग मोठा राहिला. मोर्चे निघाले; परंतु आरक्षणाचा निर्णय होत नव्हता म्हणून राज्यभरातून ठिय्या आंदोलने सुरू झाली. त्याची सुरुवात पाथर्डी (जि. अहमदनगर) येथून झाली; परंतु त्याचा शेवट मात्र कोल्हापूरने केला. कोल्हापूरने अत्यंत नेटाने हे आंदोलन तब्बल ४२ दिवस चालविले. त्याची दखल सरकारला घ्यावी लागली. राज्य सरकारने आरक्षणप्रश्नी नियुक्त केलेल्या उपसमितीला त्यासाठी कोल्हापुरात यावे लागले. या समितीला शाहू जन्मस्थळी येऊन आम्ही आरक्षणाचा निर्णय ३० नोव्हेंबरपूर्वी घेतो, असे लिहून द्यावे लागले; मगच ठिय्या आंदोलन मागे घेण्यात आले. एवढे झाल्यानंतरही कोल्हापुरातील मराठा मावळे शांत बसले नाहीत. त्यांनी २६ नोव्हेंबरला मुंबईत विधानभवनावर गाडी मोर्चा काढण्याचे नियोजन केले. त्याचाही धसका सरकारने घेतला; कारण सरकारला हे माहीत होते की, कोल्हापुरात एकदा वात लागली तर पुन्हा राज्यभर आंदोलन पेटेल. तोंडावर लोकसभेच्या निवडणुका आहेत, ते सत्तारूढ भाजप-शिवसेनेला परवडणारे नव्हते. अगोदरच भाजप सरकारबद्दल, त्यातही पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याबद्दल नकारात्मक चित्र तयार होऊ लागले आहे. अशा स्थितीत हा विषय पेटला तर राजकीयदृष्ट्या अडचणी वाढतील. म्हणून गाडी मोर्चा निघणार नाही यासाठीही सरकारने पोलिसी बळाचा वापर केला. हा आंदोलनाचा सातत्यपूर्ण रेटाच आरक्षण मिळवून देण्यास कारणीभूत ठरला आहे.चळवळीच्या पातळीवर ही संघटनात्मक ताकद पणाला लावली असतानाच आरक्षण देणे कसे आवश्यक आहे, हे अभ्यासाच्या पातळीवरही कोल्हापूरने पटवून दिले. मराठा आरक्षणासाठी काँग्रेस आघाडी सरकारने नियुक्त केलेल्या ‘नारायण राणे समिती’ला ज्येष्ठ इतिहास संशोधक डॉ. जयसिंगराव पवार यांनी ड्राफ्ट करून देण्यात मदत केली होती. भाजप सरकारने नियुक्त केलेल्या राज्य मागासवर्गीय आयोगाचे विधि सल्लागार म्हणून कसबा बावडा येथील माजी न्यायाधीश के. डी. पाटील यांनी काम पाहिले. त्याअगोदर ‘बार्टी’ संस्थेने मराठा समाजाचे सामाजिक मागासलेपण सिद्ध करण्यासाठी नेमलेल्या समितीत इतिहास संशोधक इंद्रजित सावंत, पुराभिलेखागार विभागाचे सहायक संचालक गणेश खोडके, पुण्याचे सहायक संचालक परंतु मूळचे भुदरगड तालुक्यातील सर्जेराव वाडकर यांचाही वाटा महत्त्वाचा राहिला.पुन्हा शाहूंचे द्रष्टेपणच उपयोगीमराठा समाजाला आरक्षण देण्यासाठी या समाजाचे सामाजिक मागासलेपण सिद्ध होणे फारच महत्त्वाचे होते; कारण त्याशिवाय आरक्षणाची मागणीच करता येत नव्हती. तो आरक्षणाचा पायाच होता. हे सिद्ध करण्यासाठी राजर्षी शाहू महाराज यांच्या काळातील कागदपत्रांची फार मोलाची मदत झाली आहे. ही सर्व कागदपत्रे कोल्हापूर पुराभिलेखागार विभागाने उपलब्ध करून दिली आहेत. त्याची नोंद मागासवर्गीय आयोगाच्या अहवालावरील अनुपालन अहवालातही घेतली आहे. ‘आरक्षणाचे जनक’ अशी ओळख असलेल्या राजर्षी शाहूंच्या या कार्याचे तब्बल शंभर वर्षांनी मराठा समाजाला आरक्षण मिळण्यात योगदान राहिले. त्यातून शाहू महाराजांचे द्रष्टेपणच पुन्हा अधोरेखित झाले.पालकमंत्री चंद्रकांत पाटील केंद्रस्थानीकोल्हापूरचे पालकमंत्री व महसूलमंत्री चंद्रकांत पाटील हे आरक्षण मिळवून देण्यात सरकारच्या बाजूने ज्या घडामोडी झाल्या, त्याच्या सुरुवातीपासूनच केंद्रस्थानी राहिले. शासनाने त्यासाठी नियुक्त केलेल्या उपसमितीचे ते अध्यक्षच होते; परंतु स्वत: पाटील हे मराठा समाजातील असल्याने सरकारने आंदोलकांशी चर्चा करण्याचे अधिकार त्यांनाच दिले होते. त्यामुळे अत्यंत संवेदनशील स्थितीतही त्यांनी हा विषय कौशल्याने हाताळला. मंत्री पाटील अगदी सुरुवातीपासूनच ‘आम्ही मराठा समाजाला टिकणारे आरक्षण देणार’, असे अत्यंत आत्मविश्वासाने सांगत होते. तो विश्वास त्यांनी खरा करून दाखविला.