शहरं
Join us  
Trending Stories
1
“शेतकऱ्यांचे अतोनात नुकसान, भरीव मदत सरकार देईल, उद्या मंत्रिमंडळ बैठकीत...”: संजय शिरसाट
2
'या' दिवसापर्यंत गपचूप ट्रॉफी भारताला द्या नाहीतर...; BCCIचे मोहसीन नक्वी यांना 'अल्टीमेटम'
3
"ही सगळी नाटकं, पाकिस्तानसोबत खेळायलाच नको होतं"; भारत-पाक सामन्यावरुन आदित्य ठाकरेंनी सुनावलं
4
भाजप कार्यालय आमच्यासाठी इमारत नाही, मंदिर आहे; पंतप्रधान मोदींनी व्यक्त केल्या भावना...
5
डोनाल्ड ट्रम्प यांचा मोठा निर्णय! आता 'या' उद्योगावर लादला १००% कर; भारताला सर्वाधिक फटका...
6
१०० वर्षांनी हंस महालक्ष्मी योग: ८ राशींचे कल्याण, कल्पनेपलीकडे लाभ; अपार यश, भरघोस भरभराट!
7
"दुसऱ्याच महिन्यात रंगेहाथ पकडलं...!" धनश्री वर्माचा खळबळजनक खुलासा, युजवेंद्र चहलनं लग्नाच्या पहिल्याच वर्षात दिला होता धोका?
8
“दसरा मेळाव्याबाबत सदसद्विवेकबुद्धीला स्मरून निर्णय घ्यावा”; अजित पवारांचा रोख कुणाकडे?
9
१० वर्षांपासून सत्ता असलेल्या राज्यात भाजपाला जबर धक्का, निवडणुकीत मिळाल्या ४० पैकी केवळ ५ जागा   
10
कुठलाही क्रिकेट सामना हे सत्य बदलू शकत नाही; PM मोदींच्या ट्विटवर मोहसीन नक्वींची दर्पोक्ती
11
विघ्नहर्ता बाप्पा संकटात धावला! श्री सिद्धीविनायक मंदिर अतिवृष्टीबाधितांसाठी १० कोटी देणार
12
IND vs PAK Final : "ते स्वतः स्ट्राइकवर येऊन..." PM मोदींसंदर्भात नेमकं काय म्हणाला सूर्यकुमार यादव?
13
ठाकरे बंधू अधिकृतपणे एकत्र येण्याआधीच ठाकरे गट-मनसेत महापौर पदावरून रस्सीखेच? नेत्यांचे दावे
14
“देवाभाऊ जाहिरातींचा खर्च पूरग्रस्तांना द्यायला हवा होता”; ठाकरे गटाचा भाजपावर पलटवार
15
मॅगी बनवण्यापेक्षाही लागणार कमी वेळ; चीनच्या सर्वात उंच पुलामुळे २ तासांचा प्रवास काही मिनिटांत
16
Video - गरबा खेळताना हार्टअटॅक! नवऱ्यासोबत नाचताना पडली अन्...; ४ महिन्यांपूर्वी झालेलं लग्न
17
मंदिराजवळ कुणी बिगर हिंदू प्रसाद विकत असेल तर त्याला...; साध्वी प्रज्ञासिंह ठाकूर यांचं वादग्रस्त विधान
18
करुर येथील चेंगराचेंगरीसाठी पोलिसांनी विजयला ठरवले जबाबदार, म्हणाले तो सभेला जाणीवपूर्वक उशिरा आला कारण...
19
संवेदनशील पूर परिस्थितीत एसटी मुख्यालयात हजर नसलेल्या ३४ आगार प्रमुखांवर कारवाई होणार!
20
"सूर्यकुमारने माझ्याशी दोन वेळा हस्तांदोलन केले, पण जगासमोर..."; पाकिस्तानी कर्णधाराचा दावा

पुरोगामित्वासाठी ‘शेकाप’ बळकट करा

By admin | Updated: February 14, 2016 00:56 IST

जयंत पाटील : कार्यकर्त्यांचा मेळावा; जातीयवादी पक्षांकडून गोरगरिबांना उद्ध्वस्त करण्याचा प्रयत्न

कोल्हापूर : धार्मिकता व जातीयवादी पक्षांनी सत्ता हातात घेऊन गोरगरीब व श्रमजीवींना उद्ध्वस्त करण्याचा विडाच उचलला आहे. त्यामुळे डाव्या विचारांच्या पक्षांची आवश्यकता भासत असून यासाठी शेतकरी कामगार पक्ष बळकट झाला पाहिजे, असे प्रतिपादन पक्षाचे सरचिटणीस आमदार जयंत पाटील यांनी शनिवारी येथे केले. टेंबे रोडवरील पक्षाच्या कार्यालयात आयोजित कार्यकर्त्यांच्या मेळाव्यात ते बोलत होते. अध्यक्षस्थानी माजी आमदार संपतराव पवार-पाटील होते. आमदार जयंत पाटील म्हणाले, महागाईचा उच्चांक गाठला जात आहे. तसेच जनतेच्या जिव्हाळ्याच्या प्रश्नांवरून लक्ष विचलित करण्यासाठी या सरकारकडून धार्मिक मुद्दे उपस्थित केले जात आहेत. याच विषयांवर वृत्तवाहिन्यांवर चर्चासत्रे होत आहेत. म्हणून गोरगरीब, कष्टकरी व श्रमजीवींचे प्रश्न सोडविण्यासाठी डाव्यांशिवाय कुणीच नाही. ते पुढे म्हणाले, हे सरकार आत्महत्या करणाऱ्या शेतकऱ्यांना मदत करण्यापेक्षा त्यांच्या करुणेची प्रसिद्धी करून शेतकऱ्यांना बदनाम करीत आहे. दुष्काळी मराठवाड्यात शेकापक्षाने स्वखर्चाने चार कोटी खर्च करून कालवा तयार केला आहे. एक हजार शेतकऱ्यांना दिवाळी भेट दिली. मराठवाडा विद्यापीठातील एक हजार विद्यार्थ्यांना दररोज जेवण दिले जात आहे. आत्महत्याग्रस्त शेतकऱ्यांच्या कुटुंबीयांना फक्त आर्थिकच नव्हे तर इतर छोटे-छोटे व्यवसाय पक्षाने उभारून दिले आहेत; पण याची कुठेही जाहिरात वा बातमी करून शेकापने शेतकऱ्यांच्या दुर्दैवी गरिबीचे प्रदर्शन केले नाही. भाजप सरकारने बाजार समितीला पर्याय म्हणून खासगी मार्केट उभारण्याचा निर्णय घेऊन समितीचे अस्तित्वच नष्ट करण्याचा प्रयत्न केला आहे. त्यामुळे शेतीमालाचा दर खासगी मार्केटवाल्या अडत्यांच्या मनावरच ठरणार आहे. शासनाच्या या जनताविरोधी कृत्यांवर शेका पक्षानेच आवाज उठविला पाहिजे. संपतराव पवार-पाटील म्हणाले, शासनाचे जनताविरोधी निर्णय लोकांपर्यंत पक्ष कार्यकर्त्यांनी पोहोचवून त्यांची फसवाफसवी समोर आणावी. अजित देसाई, डॉ. संपत पाटील, अंबाजी पाटील, पी. एस. पाटील, अण्णासाहेब पाटील, शिवाजीराव साळुंखे, नारायण जाधव, पांडुरंग पाटील, संतराम पाटील, राजेंद्र पाटील, चंद्रकांत बागडी, रवी पाटील, शरद नलवडे, आदींनी मनोगत व्यक्त केले. जिल्हा परिषदेचे माजी सदस्य बाबासाहेब देवकर यांनी स्वागत केले. जनार्दन जाधव यांनी आभार मानले. यावेळी भारत पाटील, बाबूराव कदम, दिगंबर लोहार, अशोकराव पवार-पाटील, केरबा पाटील, एकनाथ पाटील, विश्वास वरुटे, डी. पी. कांबळे, संभाजी पाटील, अमित कांबळे, सरदार पाटील, मोहन पाटील, अस्लम बागवान, मेहजबीन शेख, समर पवार-पाटील, दत्ता पाटील, डॉ. सुभाष पाटील, आदी उपस्थित होते.