मुरगूड शाखेच्यावतीने सभासदांचा सत्कार
मुरगूड : कोजिमाशि पतसंस्थेने सातत्याने गुणवंत सभासदांच्या पाठीवर कौतुकाची थाप देत सभासद बंधू -भगिनींना प्रेरणा देण्याचे काम केले असून, सभासद हेच संस्थेचे खरेखुरे बलस्थान आहेत, असा विश्वास संस्थेचे संचालक व मुरगूड शाखेचे अध्यक्ष प्रा. एच. आर. पाटील यांनी व्यक्त केला.
कोल्हापूर जिल्हा माध्यमिक शिक्षण (कोजिमाशि) पतसंस्थेच्या मुरगूड शाखेच्या विविध क्षेत्रात मोलाची कामगिरी करणाऱ्या गुणवंत सभासदांच्या सत्कारप्रसंगी ते बोलत होते. अध्यक्षस्थानी महालक्ष्मी हायस्कूलच्या प्राचार्या प्रभावती पाटील होत्या. शिवराजचे प्राचार्य बी. आर. बुगडे यांची कोल्हापूर जिल्हा मुख्याध्यापक संघाच्या उपाध्यक्षपदी, तर मुख्याध्यापक संघाच्या संचालकपदी मुरगूड विद्यालयाचे प्राचार्य एस. आर. पाटील व माजी प्राचार्य जीवन साळोखे यांच्यासह पत्रकार पदाधिकारी, शिक्षकेतर पदाधिकारी व अन्य गुणवंत सभासदांचा सत्कार करण्यात आला.
यावेळी माजी प्राचार्य जीवन साळोखे, मुख्याध्यापक संघाचे उपाध्यक्ष प्राचार्य बी. आर. बुगडे यांनी मनोगते व्यक्त केली. कार्यक्रमास संचालक अरविंद किल्लेदार, मळगे विद्यालयाचे प्राचार्य ए. एच. सय्यद, हमीदवाडा हायस्कूलचे मुख्याध्यापक ए. जी. पाटील, श्रमिक हायस्कूल बानगेचे मुख्याध्यापक एस. एस. पाटील, मुरगूड विद्यालयाचे उपप्राचार्य शामराव पाटील, शिवराजचे उपप्राचार्य रवींद्र शिंदे, ए. एम. पाटील, प्रकाश गोधडे, रवींद्र पाटील, ज्ञानदेव ढेकळे, गौरव चव्हाण उपस्थित होते.
फोटो ओळ : कोजिमाशि पतसंस्थेच्या मुरगूड शाखेच्या वतीने गुणवंत सभासदांचा सत्कार करताना मुरगूड शाखेचे अध्यक्ष प्रा. एच. आर. पाटील, प्राचार्य बी. आर. बुगडे, मा. प्राचार्य जीवन साळोखे, प्राचार्या प्रभावती पाटील अन्य मान्यवर उपस्थित होते.