शहरं
Join us  
Trending Stories
1
अनकॅप्ड मुकुल चौधरीची अविश्वसनीय खेळी! KKR च्या तोंडचा घास हिसकावत LSG ला जिंकून दिली मॅच
2
मुंबईला भारतातील पहिली नॉन-एसी ‘बंद दरवाजांची’ लोकल ट्रेन; उपनगरीय सेवेत होणार दाखल  
3
कोण आहे Mukul Choudhary? ‘आर्मी मॅन’च्या भूमीतला २१ वर्षीय ‘जवान’ बिग हिटरच्या रुपात कसा घडला?
4
Wife Killed Husband: पतीची हत्या, पत्नीचा आक्रोश; प्रियंकाच दुःख बघून सगळे हेलावले, पण तिच निघाली मास्टरमाईंड
5
"आमचे हात अजूनही ट्रिगरवरच आहेत", खवळलेल्या इराणची इस्रायलला खुली धमकी, लेबनाननंतर आक्रमक
6
Video: मुंबई विमानतळाच्या टर्मिनल १ मध्ये आगीचा भडका; प्रवेशद्वार बंद, धुराचे लोट बघून प्रवासी घाबरले
7
Latest Marathi News LIVE: इराणने हल्ला केला, तर आम्हीही निष्ठुरपणे उत्तर देऊ; इस्रायलच्या संरक्षण मंत्र्याचा इशारा
8
बॉलिंगसाठी 'ग्रीन' सिग्नल! तब्बल २५ कोटींचा ऑलराउंडर अखेर गोलंदाजीला आला; पहिल्याच षटकात रिषभ पंतची शिकार
9
Pune Crime: प्रेमात सगळं विसरली अन् प्रियकराच्या मदतीने सहा वर्षांच्या लेकराची केली हत्या, कारण...; पुणे जिल्ह्यातील घटना
10
KKR vs LSG : अजिंक्य रहाणेचा भन्नाट सिक्सर! बॅट निसटली तरीही चेंडू थेट सीमारेषेबाहेर (VIDEO)
11
उपराष्ट्रपती जे.डी. व्हान्स यांना पाकिस्तानात जायला वाटतेय भीती; US-इराण चर्चा फिस्कटणार?
12
"...तोपर्यंत आम्ही हल्ले करत राहू", इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांचा इशारा; हल्ल्याचे व्हिडीओही दाखवले
13
22 वर्षाचा बॉयफ्रेंड, ३५ वर्षाची गर्लफ्रेंड; दोघे रुममध्ये गेले आणि नंतर 'बेड बॉक्स'मध्ये मिळाला तिचा मृतदेह
14
KKR vs LSG: Finn Allen खराब पंचगिरीचा शिकार? दिग्वेश राठीनं टिपलेल्या झेलवरुन वादंग (VIDEO)
15
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
16
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
17
रशियाच्या पाणबुड्या महिनाभर ब्रिटनच्या समुद्रात लपलेल्या, काय करत होत्या? ब्रिटीशांच्या दाव्याने खळबळ...
18
KKR vs LSG : अर्जुन तेंडुलकरची नुसतीच हवा! Playing XI मध्ये मिळाली नाही जागा; अजिंक्य रहाणेचा गेम प्लॅनही फसला
19
टी-२० सामन्यात तब्बल ९ विकेट्स, एका षटकांत ४ बळी; कधीही न तुटणारा वर्ल्ड रेकॉर्ड कुणी बनवला?
20
ट्रम्प यांच्या दाव्याने खळबळ, १०० मिसाईल...! 'शांतीदूत' म्हणवून घेणारा पाकिस्तान 'बेनकाब'; चीनचा बुरखा फाटला
Daily Top 2Weekly Top 5

विद्यार्थ्यांच्या कौशल्य विकासाला ‘केआयटी’च्या लँग्वेज लॅबचे बळ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 13, 2021 04:58 IST

कोल्हापूर : येथील कोल्हापूर इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजीच्या अभियांत्रिकी महाविद्यालयाची लँग्वेज लॅब (भाषा प्रयोगशाळा) ही विद्यार्थ्यांच्या कौशल्य व व्यक्तिमत्त्व विकासासाठी ...

कोल्हापूर : येथील कोल्हापूर इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजीच्या अभियांत्रिकी महाविद्यालयाची लँग्वेज लॅब (भाषा प्रयोगशाळा) ही विद्यार्थ्यांच्या कौशल्य व व्यक्तिमत्त्व विकासासाठी आदर्शवत ठरत आहे. अखिल भारतीय तंत्रशिक्षण परिषदेकडून (एआयसीटी) गुणवत्ता सुधारणा कार्यक्रमांतर्गत मागासवर्गीय विद्यार्थ्यांच्या व्यक्तिमत्त्व विकास व संभाषण कौशल्य सुधारण्यासाठी केआयटीला १२ लाख रुपयांचा निधी मिळाला आहे.

यासाठी आवश्यक असणारी संगणक प्रणाली आणि अद्ययावत सुविधा असणारी कोल्हापूरमधील ही एकमेव लॅब आहे. या निधीच्या माध्यमातून विद्यार्थ्यांसाठी त्यांचे इंग्रजी संभाषण, आत्मविश्वास, संभाषण चातुर्य, व्यक्तिमत्त्व विकास सुधारण्यासाठी वेगवेगळे उपक्रम राबविण्यात येत आहेत. केआयटीचे संचालक डॉ. विलास कार्जिन्नी आणि लॅबचे सहसमन्वयक डॉ. महेश शिंदे यांच्या नियोजनातून विद्यार्थ्यांसाठी विविध सत्रे सुरू आहेत. या लॅबच्या उभारणीसाठी संस्थेचे अध्यक्ष भरत पाटील, उपाध्यक्ष सुनील कुलकर्णी, सचिव दीपक चौगुले आदींचे मार्गदर्शन लाभले.

प्रतिक्रिया

आवश्यक सुविधा आणि विद्यार्थी यांचा विचार करून केआयटीला या लॅबच्या केंद्राची मान्यता मिळाली आहे. लँग्वेज लॅब म्हणजे फक्त भाषा उच्चारण आणि वाणीशुद्धी असे नाही, तर त्याठिकाणी विद्यार्थ्यांना आवश्यक असणाऱ्या अनेकविध गोष्टी करता येतात.

- डॉ. विलास कार्जिन्नी

चौकट

व्यक्तिमत्त्व विकास साधता येतो

इंग्रजी आणि उत्कृष्ट संभाषण कौशल्य हे विद्यार्थ्यांना त्यांच्या कलाप्रमाणे लँग्वेज लॅबमध्ये शिकता येतात. ऐकणे, बोलणे, वाचणे, लिहिणे या कौशल्यांवर आधारित वेगवेगळे प्रयोग करता येतात. स्वत:ची निरीक्षणे नोंदवता येतात. त्यामुळे त्यांच्या वैचारिक प्रक्रियेत सुधारणा होऊन व्यक्तिमत्त्व विकास साधता येतो, असे डॉ. महेश शिंदे यांनी सांगितले.

फोटो (१००१२०२१-कोल-केआयटी लँग्वेज लॅब) : कोल्हापुरातील केआयटी महाविद्यालयातील लँग्वेज लॅबमध्ये इंग्रजी संभाषण, संभाषण चातुर्य, व्यक्तिमत्त्व विकास सुधारण्यासाठी विविध उपक्रम राबविण्यात येत आहेत.