कोल्हापूर : समाजमन सामाजिक संस्थेच्या वतीने आत्महत्या रोखण्यासाठी ‘से नो टू सुसाइड आस्क अस’ ही मोहीम हाती घेतली आहे. याअंतर्गत महिला दक्षता समितीच्या विद्यमाने प्रबोधनपर पथनाट्य स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. स्पर्धेत महाविद्यालयाच्या संघांनाही भाग घेता येईल. स्पर्धेची तारीख, वेळ, ठिकाण व सविस्तर वेळापत्रक लवकरच जाहीर करण्यात येईल, अशी माहिती महेश गावडे आणि महिला दक्षता समितीच्या तनुजा शिपूरकर यांनी दिली आहे.
शालेय-महाविद्यालयीन विद्यार्थी असो किंवा सर्वसामान्य नागरिक कोणतीही समस्या आली की, आत्महत्या करण्याचे प्रमाण वाढले आहे. या आत्महत्या समुपदेशन व चर्चेने टाळता येऊ शकतात. यासाठी नो सुसाइड आस्क मी, ही मोहीम सुरू करण्यात आली असून, याचाच एक भाग म्हणून आत्महत्या या विषयावर प्रबोधनपर पथनाट्य स्पर्धा आयोजित करण्यात आली आहे. स्पर्धेसाठी रोख रकमेची पारितोषिक दिली जाणार आहेत. इच्छुक महाविद्यालयाचे कला संघ, हौशी कलाकार अथवा संस्थांनी अधिक माहिती व नावनोंदणीसाठी अनुराधा मेहता, गोपाळकृष्ण अपार्टमेंट, राजारामपुरी सहावी गल्ली येथे संपर्क साधावा, असे आवाहन करण्यात आले आहे.
--