शहरं
Join us  
Trending Stories
1
‘बांगलादेशी आहेस का?’, केरळमध्ये परप्रांतीय तरुणाला बेदम मारहाण, रुग्णालयात मृत्यू 
2
भारताच्या कारवाईमुळे बांगलादेश खवळला, भारतीयांसाठी व्हिसा सर्व्हिस केली बंद 
3
वैभव सूर्यवंशी आणि आयुष म्हात्रेनं जशास तसे उत्तर दिलं; पण सरफराज अहमदला ते नाही दिसलं! म्हणे...
4
रशियाला युद्धादरम्यान मोठा धक्का ! सैन्याचे लेफ्टनंट जनरल सर्वारोव्हचा कार स्फोटात मृत्यू
5
युजवेंद्र चहलने विकत घेतली आलिशान BMW Z4 कार; भारतात त्याची किंमत ऐकून धक्काच बसेल!
6
नवीन वर्षाच्या सुरूवातीला कमी हाेणार थंडीचा जोर; हवामान तज्ज्ञांनी व्यक्त केला अंदाज
7
Vijay Hazare Trophy स्पर्धेत दिसणार रोहित-विराटचा जलवा! ही जोडी कधी अन् कोणत्या मैदानात खेळणार सामना?
8
बांगलादेशातील हिंदू तरुणाच्या हत्येप्रकरणी मोठा खुलासा; ईशनिंदेचा आरोप खोटा, 'हे' होते कारण
9
महाराष्ट्रापाठोपाठ गोव्यातील निवडणुकीतही भाजपाची मुसंडी, काँग्रेसची पीछेहाट, आपचा धुव्वा
10
AI शक्तिशाली सहाय्यक, मात्र मानवी मेंदूला पर्याय नाही; सर्व तज्ज्ञांचे एकमताने शिक्कामोर्तब
11
भारतीय ऑलराउंडरची क्रिकेटच्या सर्व प्रकारातून निवृत्ती! IPL लिलावात CSK नं लावली होती विक्रमी बोली
12
"पालिका निवडणुकांमध्येही देवेंद्र फडणवीसच ‘धुरंधर’; उद्धव ठाकरे 'रेहमान डकैत"; भाजपाची टीका
13
IPL 2026: Axar Patel ला धक्का! कर्णधारपदावरून हटवलं, आता 'हा' Delhi Capitals चा 'कॅप्टन'
14
Video: उकळत्या तेलात हात घालून काढते गरमागरम पकोडे... 'समोसा गर्ल' ची रंगलीये तुफान चर्चा
15
झाडू मारण्यासाठी सॉफ्टवेअर इंजिनिअरने सोडली हाय-फाय नोकरी; आता महिन्याला १.१ लाख पगार
16
हाण की बडीव! रुग्णालयात डॉक्टर-रुग्ण भिडले, एकमेकांच्या जीवावर उठले; लाथाबुक्क्यांनी मारहाण
17
VIDEO: तुर्की संसदेत जोरदार राडा ! आधी खासदारांमध्ये बाचाबाची अन् लाथाबुक्क्यांनी हाणामारी
18
नगरपरिषद निवडणुकीतील यश भाजपाचंच की 'इनकमिंग'चं?; सुप्रिया सुळेंनी मांडला 'हिशेब'
19
मंत्रिपदाचा आणि जिंकण्याचा संबंध नाही, आत्मचिंतनाची गरज; बावनकुळेंचा मुनगंटीवारांवर निशाणा?
20
"ज्यांच्याकडे मुख्यमंत्रिपद तेही कायम नाही, मी योग्य क्षणी..."; सुधीर मुनगंटीवारांनी थेटच सांगितले
Daily Top 2Weekly Top 5

शारंगधर देशमुख यांना रोखण्याची रणनीती

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 5, 2021 07:01 IST

अमर पाटील : कळंबा दक्षिण विधानसभा मतदारसंघातील हाय व्होल्टेज लढतीसाठी प्रसिद्ध प्रभाग म्हणजे प्रभाग ७४ सानेगुरुजी वसाहत. २००५ व ...

अमर पाटील : कळंबा

दक्षिण विधानसभा मतदारसंघातील हाय व्होल्टेज लढतीसाठी प्रसिद्ध प्रभाग म्हणजे प्रभाग ७४ सानेगुरुजी वसाहत. २००५ व २०१० च्या पारंपरिक लढतीमधील काँग्रेस, भाजप व राष्ट्रवादी काँग्रेस पक्षांचे पारंपरिक प्रतिस्पर्धी उमेदवारच पुन्हा २०२१ च्या निवडणुकीत तिसऱ्यांदा एकमेकांसमोर उभे ठाकले आहेत. येथे तिसऱ्यांदा काँग्रेसचे शारंगधर देशमुख भाजपचे संजय सावंत व राष्ट्रवादी कॉंग्रेसचे सुनील देसाई यांच्यात लढत होणार आहे. एकूण पंचवीस लहानमोठ्या कॉलन्यांत विस्तारित प्रभागात साने गुरुजी वसाहत, राजोपाध्येनगर तसेच मुस्लिम समाजातील मतदारांची भूमिका निर्णायक ठरते. येथे पक्षीय तसेच गटातटांच्या राजकारणापेक्षा उमेदवार आणि विकासकामांच्या मुद्द्यांवर चुरशीची निवडणूक होते.

गतवेळच्या निवडणुकीत हा प्रभाग इतर मागासवर्गीय महिला प्रवर्गासाठी राखीव झाला होता. एकूण ६३८९ पैकी ४३७३ इतके चुरशीने मतदान झाले होते. त्यावेळी चार पक्षांच्या चार महिला रिंगणात होत्या. मात्र भाजपच्या मनीषा कुंभार आणि काँग्रेसच्या माधुरी लोखंडे यांच्यात खरी लढत होऊन भाजपच्या मनीषा कुंभार मोठ्या फरकाने विजयी झाल्या होत्या. शिवसेनेच्या तेजश्री पाटील यांनीही चांगली मते मिळवली; तर राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेहा भुर्के यांना अपेक्षित मते मिळाली नाहीत. त्यावेळी काँग्रेसच्या उमेदवारास मतविभागणीचा मोठा फटका बसल्याने भाजपने काँग्रेसचा बालेकिल्ला भेदण्यात यश मिळविले.

यंदाच्या निवडणुकीत हा प्रभाग सर्वसाधारण पुरुष वर्गासाठी आरक्षित झाल्याने २००५ व २०१० च्या दोन निवडणुकांतील विजयी उमेदवार काँग्रेसचे शारंगधर देशमुख यंदा विजय मिळवून हॅटट्रिक करण्यासाठी रिंगणात उतरले आहेत. गतनिवडणुकीत काँग्रेसच्या उमेदवाराचा पराभव केल्याने भाजपला उभारी मिळाली असून भाजपसुद्धा दुसऱ्यांदा गड राखण्यासाठी रिंगणात उतरली आहे. काँग्रेसचे शारंगधर देशमुख, भाजपचे संजय सावंत, राष्ट्रवादी काँग्रेसचे सुनील देसाई यांनी जोरदार तयारी सुरू केली असून शिवसेना तुल्यबळ उमेदवाराच्या शोधार्थ आहे . गतवेळचा प्रभाग ७५ आपटेनगर अनुसूचित जातीच्या महिला प्रवर्गासाठी आरक्षित झाल्याने माजी नगरसेवक राजू दिंडोर्ले यांनीही येथून चाचपणी सुरू केली असून, ऐन वेळी दिंडोर्ले हेही निवडणुकीच्या रिंगणात उतरल्यास निवडणूक रंगतदार वळणावर जाण्याची शक्यता आहे.

गतनिवडणुकीत प्रमुख उमेदवारांना मिळालेली मते - मनीषा कुंभार : भाजप १९२४, माधुरी लोखंडे - काँग्रेस १४२१, तेजश्री पाटील - शिवसेना ७७२,

नेहा भुर्के - राष्ट्रवादी काँग्रेस १८९.

प्रभाग ७४ साने गुरुजी वसाहत

विद्यमान नगरसेविका मनीषा कुंभार

आताचे आरक्षण : सर्वसाधारण पुरुष

प्रभागातील समस्या १) मुख्य रस्त्यांसह कॉलनीअंतर्गत रस्त्यांची दुरवस्था २) रखडलेला चाळीस लाखांचा महिला जिमचा प्रकल्प

३) खुल्या आरक्षित जागा विकसित झाल्या नाहीत. ४) कमी दाबाने होणारा अपुरा पाणीपुरवठा. ५) नाल्यावरील अतिक्रमणामुळे नागरी वस्तीत पावसाळ्यात पाणी ६) वाढत्या गुन्हेगारीमुळे पोलीस ठाणे गरजेचे ७) कचरा उठवातील अनियमितता.

सोडवलेले प्रश्न १) उपनगरातील रस्त्यावरच्या भाजीमंडईस आळा बसावा यासाठी प्रभागात ६० लाखांच्या अत्याधुनिक मंडईची उभारणी २) राजोपाध्येनगरातील क्रीडांगणास संरक्षक भिंत व बैठक व्यवस्था उभारणी ३) प्रभागातील ड्रेनेज व पाणीप्रश्न बहुतांश मार्गी ४)रस्ते ,गटारी ,पाणीप्रश्न बहुतांश मार्गी

५) संपूर्ण प्रभागात एलइडी पथदिवे ६)संपर्क कार्यालयाद्वारे नागरी समस्यांचे निर्मूलन.

प्रतिक्रिया

गेल्या पाच वर्षांत प्रभागात चार कोटींची विकासकामे पूर्णत्वास नेऊन बहुतांश प्रलंबित प्रश्न मार्गी लावले पालिकेच्या सत्ता समीकरणातील राजकारणाचा व निधीवाटपातील दुजाभावाचा फटका विकासनिधी मिळवण्यावर व विकासकामांवर झाला

नगरसेविका मनीषा कुंभार

फोटो मेल केला आहे

फोटो ओळ : प्रभागात उभारण्यात येणाऱ्या उपनगरातील महिला व युवतींसाठीच्या ४० लाखांच्या महिला जिमचे काम आठ वर्षे निव्वळ राजकीय श्रेयवादात रखडले आहे