शहरं
Join us  
Trending Stories
1
अमूल दूध २ रुपयांनी महागले, महागाईने बेजार झालेल्या सर्वसामन्यांना झटका!
2
जातीय जनगणनेसाठी सरकारला पूर्ण पाठिंबा, पण..., राहुल गांधींच्या केंद्राला 'या' 4 मागण्या
3
“सामाजिक समता प्रस्थापित करण्याच्या दिशेने जातिनिहाय जनगणनेचा निर्णय महत्त्वाचा”: अजित पवार
4
वेळ वाया घालवू नका, थेट कारवाई करा; पहलगाम हल्याबाबत राहुल गांधींची सरकारला मागणी
5
केवळ अजित पवारच नव्हे, शरद पवारांच्या राष्ट्रवादीकडूनही मोदी सरकारच्या निर्णयाचं स्वागत
6
जातनिहाय जनगणना; अमित शाह म्हणाले ऐतिहासिक निर्णय, ओवेसी म्हणाले भाजपनं दलित मुस्लिमांसाठी...'
7
“सर्वच प्रश्न सुटतील, योग्य न्याय मिळेल”; जातिनिहाय जनगणना निर्णयाचे छगन भुजबळांकडून स्वागत
8
पुढच्या हंगामात खेळणार का? MS धोनीनं प्रश्न विचारणाऱ्या डॅनी मॉरिसनचीच घेतली फिरकी (VIDEO)
9
दुकानदाराच्या डोळ्यात मिरची पूड टाकून ५० हजार रुपये लुटले, संपूर्ण प्रकार कॅमेऱ्यात कैद!
10
केंद्र सरकारने अचानक जातीय जनगणनेचा निर्णय का घेतला? काँग्रेसचा सवाल...
11
“शेतकऱ्यांना विमा कवच आवश्यक, नवा पॅटर्न अन्यायकारक, योजना पहिल्यासारखी सुरु ठेवा”: सपकाळ
12
गुरुवारी विनायक चतुर्थी: ५ मिनिटे लागतील, स्वामी-बाप्पा कृपा करतील; ‘हे’ मंत्र-श्लोक म्हणाच
13
BREAKING: देशात जातिनिहाय जनगणना होणार; केंद्रातील मोदी सरकारचा मोठा निर्णय
14
Maharashtra Day 2025 Wishes: महाराष्ट्र दिनाच्या हार्दिक शुभेच्छा द्या 'या' स्फूर्तिदायी काव्यरचनांमधून, शेअर करा सुंदर शुभेच्छापत्रं!
15
"CSKला धोनीची गरज नाही, संघाच्या भविष्यासाठी..."; MSD ज्याला आदर्श मानतो, त्यानेच मांडलं रोखठोक मत
16
विनायक चतुर्थी: गणपती पूजनात ‘या’ गोष्टी हव्यातच, कसे कराल व्रत? पाहा, सोपी पद्धत अन् मान्यता
17
विनायक चतुर्थी: ६ राशींना अनुकूल, अडकलेले पैसे मिळतील; नोकरीत पदोन्नती, बाप्पा चांगलेच करेल!
18
"PM मोदींना लष्कराला फ्री हॅन्ड देण्याचा अधिकारच नाही, तो तर..."; प्रकाश आंबेडकरांचं थेट कायद्यावर बोट
19
IPL 2025 : कुलदीप-रिंकू यांच्यात नेमकं काय घडलं? खरी गोष्ट आली समोर (VIDEO)

‘एसटीपी’ पूर्ण क्षमतेने सुरू

By admin | Updated: April 22, 2015 00:21 IST

प्रशासनाचा दावा : जयंती नाल्यातील दूषित पाण्यावर प्रक्रिया सुरू

कोल्हापूर : कसबा बावडा येथील सांडपाणी प्रक्रिया केंद्र (एसटीपी) सोमवारी रात्री बारा वाजल्यापासून पूर्ण क्षमतेने सुरू झाल्याचा दावा महापालिका प्रशासनाने केला आहे. जयंती नाल्यातील १०० टक्के दूषित पाण्याचा उपसा करून यावर प्रक्रिया करण्याचे काम सुरू झाले आहे. शहरातील ६५ टक्के दूषित पाणी थेट नदीत मिळणे बंद होणार आहे. अद्याप बापट कॅम्प व लाईन बझार येथील नाल्यांतील दूषित पाणी नदीत मिसळते. या पाण्यावर येत्या वर्षभरात प्रक्रिया केली जाणार असल्याची माहिती जलअभियंता मनीष पवार यांनी ‘लोकमत’ला दिली.पंचगंगा प्रदूषणप्रश्नी मुंबई उच्च न्यायालयात गुरुवारी (दि.२३) सुनावणी होत आहे. तत्पूर्वी, कोणत्याही परिस्थितीत केंद्र सुरू करून त्याबाबतचे प्रतिज्ञापत्र सादर करणे मनपाला गरजेचे आहे. त्यामुळे प्रक्रिया केलेले पाणी वाहून नेणाऱ्या पाईपचे काम पूर्ण होताच, सोमवारी रात्रीपासून जयंती नाल्यातील ५५ ते ६० एमएलडी सांडपाण्यावर प्रक्रिया सुरू केली. ‘राजाराम’सह नऊ प्रोसेसर्सची आज वीज तोडणारकोल्हापूर : कसबा बावडा येथील राजाराम सहकारी साखर कारखाना, तसेच इचलकरंजीतील नऊ प्रोसेसर्स युनिटना वीजपुरवठा खंडित करण्यासंदर्भात महावितरणने मंगळवारी सकाळी नोटीस लागू केली. महाराष्ट्र राज्य प्रदूषण नियंत्रण मंडळाने तसे आदेश दिले आहेत. त्यामुळे २४ तासांची मुदत संपताच आज, बुधवारी सकाळी वीजपुरवठा खंडित करण्याची कारवाई केली जाईल, असे महावितरणचे अधीक्षक अभियंता दीपक कुमठेकर यांनी सांगितले. पंचगंगा प्रदूषणाची मुंबई उच्च न्यायालयाने गांभीर्याने दखल घेतली आहे. राजाराम कारखाना व इचलकरंजीतील नऊ प्रोसेसर्स युनिटमालकांनी आपले रसायनमिश्रित सांडपाणी पंचगंगा नदीत सोडल्याचे आढळून आले होते. त्यानुसार महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाचे सदस्य डॉ. पी. अनबालगन यांनी संबंधित संस्थांचा पाणीपुरवठा व वीजपुरवठा खंडित करण्याचा आदेश दिला आहे.