शहरं
Join us  
Trending Stories
1
युद्धविरामानंतर फ्रान्सच्या नेतृत्वात १५ देश आले एकत्र; होर्मुझवर आखला 'प्लॅन बी', कसली तयारी?
2
इराणचा अमेरिकेवर खळबळजनक आरोप; "शस्त्रसंधीच्या ३ अटी मोडल्या, आता चर्चा करणे व्यर्थ!"
3
इंदूरच्या राजा-सोनमसारखं प्रकरण; "तू दिसायला चांगला नाहीस, मला..";  टोमणे मारत पत्नीनेच पतीला संपवलं
4
आसाममध्ये बहुतेक १०० टक्के मतदान होतेय...! दुपारी १ वाजेपर्यंत ६०% पेक्षा जास्त मतदान; केरळ आणि पाँडिचेरीमध्येही उत्साह
5
अजितदादांचे जॅकेट अन् चष्मा, तसाच लूक; पार्थ पवारांनी घेतली खासदारकीची शपथ, आईचा खास सल्ला!
6
मराठी वर्षातील पहिली कालाष्टमी २०२६: १० राशींना सफलता, मान-सन्मान; पगारवाढ, मोठी संधी मिळेल!
7
Maruti Suzuki: दमदार मायलेज, किंमतही कमी; 'या' आहेत मारुती सुझुकीच्या बजेट कार, किंमत ४.६१ लाखांपासून सुरू
8
रेखा झुनझुनवालांनी 'या' Smallcap कंपनीतील २ लाखांपेक्षा अधिक शेअर्स विकले; स्टॉक 52W हायपासून ३५% खाली
9
युद्धविरामाचं भवितव्य अधांतरी, इराणी राजदूतांनी X वरील पोस्ट हटवली, चर्चेतून बाहेर पडणार?   
10
बारामती बिनविरोधसाठी महायुतीची धावाधाव; CM फडणवीसांचा सपकाळांना फोन, सुनेत्रा पवारांची तीनदा चर्चा
11
'तो' १० सूत्री प्रस्ताव पूर्णपणे 'फेक', ट्रम्प यांचं मोठं विधान; म्हणाले, करार न झाल्यास इराणवर पुन्हा बॉम्बफेक!
12
१० हजारांचा स्मार्टफोन थेट १४ हजारांवर! अचानक ४० टक्क्यांनी किंमती वाढल्या, 'ही' आहेत २ मोठी कारणे
13
प्रेमात आंधळी झाली ममता! प्रियकरासाठी पोटच्या २ वर्षांच्या मुलीचा गळा घोटला; मृतदेह गटारात फेकून रचला बनाव
14
रावण फक्त खलनायक नाही तर..., 'रामायण'मध्ये काय वेगळं बघायला मिळणार? दिग्दर्शक म्हणाले...
15
शिकारीचा थरार! गोळीबारात १ जण ठार; घटनास्थळी तलवार सापडल्याने गूढ वाढले, डाव कुणी साधला?
16
अमेरिका-इराण युद्धविरामानंतर रशियाची भारतासह आशियाई देशांना 'बिग ऑफर'; ट्रम्प यांची डोकेदुखी
17
महिलेला आंटी म्हणणं त्याला पडलं महागात, बोलावले पोलिस, कोर्टाने ठोठावला लाखोंचा दंड
18
कारचा तिसरा गियर कधी टाकावा? जाणून घ्या योग्य स्पीड अन् गियर बदलण्याची पद्धत, वाचवा इंधन
19
Heels History: सुरुवात झाली पुरुषांसाठी, मग महिलांच्या फॅशनचा भाग कशा बनल्या 'Heels'?
20
Ashok Kharat : भोंदू अशोक खरातचे ते 'पाप' ४६ वर्षे जुने; गावकऱ्यांनी दिलेला चोप, एका रात्रीत गाव सोडून पळाला
Daily Top 2Weekly Top 5

पाण्यासाठी नदी अडवून जॅकवेलकडे वळविली

By admin | Updated: February 8, 2016 00:48 IST

म्हाकवेतील प्रकार : जॅकवेलच्या चुकीच्या उभारणीमुळे ग्रामपंचायतीचा खटाटोप

दत्तात्रय पाटील -- म्हाकवे --जॅकवेल कुठे असते? असा कोणत्याही शाळकरी मुलाला प्रश्न विचारला तरी तो बिनचूक उत्तर देईल की जॅकवेल नदीत असते. परंतु, म्हाकवे (ता. कागल) येथे जॅकवेलची जगावेगळी उभारणी केल्याने येथील जॅकवेल नदीत नसून, नदीच अडवून जॅकवेलमध्ये वळविण्यात आली आहे. सध्या काळम्मावाडी धरणातील अपुऱ्या पाणीसाठ्यामुळे वेदगंगा नदीत पाणी सोडण्यावर प्रशासनाने नियंत्रण आणले आहे. त्याचा परिणाम म्हाकवेतील पाणीपुरवठ्यावर होत आहे. येथील जॅकवेल नदीकाठावर नदीतील पाणी पातळीपेक्षा उंचावर बांधण्यात आले आहे. त्यामुळे नदीपात्रात कच्चा बंधारा घालून पाणी अडवून ते जॅकवेलमध्ये आणले आहे. परंतु, कच्चा बंधारा आणि जॅकवेलची उंची पाहता यातूनही अपुरेच पाणी जॅकवेलमध्ये येत आहे. त्यामुळे नदीतील पाणी विद्युत पंपाद्वारे जॅकवेलमध्ये आणि जॅकवेलमधील पाणी ग्रामस्थांना हाच आर्थिक ओरखडे काढणारा पर्याय ग्रामपंचायतीसमोर उरला आहे.वेदगंगा नदीत पाणी कमी असल्याने गावाला पिण्याच्या पाण्याचा पुरवठा करताना ग्रामपंचायतीची चांगलीच दमछाक होत आहे. त्यांना तारेवरची कसरत आणि उपद्व्याप करावा लागत आहे. सध्या गावाला दोन-तीन दिवसांतून नदीतून थेट उपसा पद्धतीनेच पाणीपुरवठा केला जात आहे. अनेक दिवसांपासून ग्रामस्थांना अशुद्ध, गाळमिश्रित पाणीपुरवठा होत असल्यामुळे ग्रामस्थांमधून संताप व्यक्त होत आहे. याकडे एकाही अधिकाऱ्याने गांभीर्याने पाहिलेले नसून, डोळेझाकपणाच करण्यात धन्यता मानली आहे. सुमारे सात हजारांहून अधिक लोकसंख्या असणाऱ्या या गावात येथील लोकप्रतिनिधींनी गेल्या तीन दशकांमध्ये अनेक योजनांतून शासनाकडून निधी उपलब्ध करून पाणी योजना केल्या आहेत. परंतु, या पाणी योजनांतून ग्रामस्थांची तृष्णा भागविली जाते का, याचे भान निधी देणाऱ्या आणि तो खर्च करणाऱ्यांना नाही. म्हाकवेकरांना ‘गढूळाचे’च पाणी!म्हाकवे गावच्या डाव्या-उजव्या बाजूला असणाऱ्या आणूर, कौलगे, बस्तवडे या गावांना एक-दोनच पाणी योजना झाल्या आहेत, तर या गावांचे जॅकवेलही याच नदीत सुमारे २५ ते ३० फूट खोलीवर आहे. त्यामुळे नदीला अपुरे पाणी असताना किंवा महापुराच्या काळातही येथे स्वच्छ आणि मुबलक पाणी मिळते. मात्र, म्हाकवे येथे याच योजना होऊनही अपुरे आणि गढूळच पाणी मिळते, ही शोकांतिका असल्याच्या प्रतिक्रिया ग्रामस्थांतून उमटत आहेत.‘आम्ही सत्तेवर येण्यापूर्वी या पाणीयोजना झाल्या आहेत. गावचा पाणीप्रश्न गंभीर आहे. हा प्रश्न सोडविण्यासाठी सर्वच सदस्य समिती एकटवली असून, स्थानिक व वरिष्ठ लोकप्रतिनिधी, वरिष्ठ अधिकारी व ग्रामस्थांशी विचारविनिमय, बैठक सुरू असून, यासंदर्भात आम्ही लवकरच पर्यायी मार्ग काढू.’- रमेश सिद्राम पाटील, उपसरपंच, म्हाकवे.