शहरं
Join us  
Trending Stories
1
"शिवसेनाप्रमुखांचा ब्रँड पुसून टाकण्याचा प्रयत्न कराल तर नामोनिशान पुसून टाकू"
2
भाषेवरून राजकारण पेटले, उद्धव ठाकरेंची सडकून टीका, एकनाथ शिंदेंचा जोरदार पलटवार!
3
Mumbai Local: मुंबईकरांचा प्रवास आणखी सुखकर होणार, रेल्वेमंत्र्यांची लोकल ट्रेनबाबत मोठी घोषणा
4
आजचे राशीभविष्य : २० जून २०२५; विनाकारण खर्च वाढतील, प्रकृतीची काळजी घ्यावी लागेल
5
samruddhi mahamarg Accident: समृद्धी महामार्गावर अपघातात दोघांचा मृत्यू, जीपचालकाला डुलकी लागल्याने दुर्घटना!
6
Bombay High Court: ‘त्या’ एसआरए योजनेत ३५ टक्के जागा खुल्या ठेवा
7
इराण-इस्रायल युद्धात दोन गटात विभागलं केलं जग? रशियानंतर आता चीनचीही 'एन्ट्री', भारताची भूमिका काय?
8
Vivek Lagoo: ज्येष्ठ अभिनेते विवेक लागू यांचं निधन, रंगभूमीवरचा शिस्तप्रिय नट हरपला
9
IND vs ENG : गिलनं दिला 'ब्लू प्रिंट'चा दाखला; 'लगान' वसूल करण्यासाठी रोहित-विराटचाही घेतलाय सल्ला
10
“आम्ही कट्टर देशाभिमानी हिंदू, भ्रष्ट भाजपावाले घरोघरी ‘सिंदूर’ वाटणार होते”: उद्धव ठाकरे
11
जाईन गे माये तया पंढरपुरा, भेटेन माहेर आपुलिया! अलंकापुरीतून माऊलींच्या पालखीचे वैभवी प्रस्थान
12
साताऱ्यातील पर्यटनस्थळांवर १९ ऑगस्टपर्यंत निर्बंध; धबधब्यांसह कास पठार, महाबळेश्वरमधील स्थळे अन् धरणांचाही समावेश
13
"महाराष्ट्रात हिंदी लादल्यास रस्त्यावर उतरू", मराठी अस्मितेसाठी उद्धव ठाकरेंचा एल्गार
14
नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाला दिबांचे नाव लवकरात लवकर द्या, सर्वपक्षीय कृती समितीची मागणी
15
"आपला मेळावा बाळासाहेबांच्या विचारांचा, तर दुसरा..."; एकनाथ शिंदेंचा जोरदार हल्लाबोल
16
ऑपरेशन सिंधू: भारत सरकार इस्रायलमधील भारतीयांना परत आणणार! कशी करता येणार नोंदणी? जाणून घ्या
17
“पहलगाम हल्लातील दहशतवादी आकाशात गेले, पाताळात गेले की भाजपात गेले?”; ठाकरेंचा बोचरा सवाल
18
"पाकिस्तानात ठेवलं जाणार इराणचं अण्वस्त्र साहित्य?"; ट्रम्प यांनी मुनीर यांना नेमकं का जेवायला बोलावलं? सगळं विचित्रच...!
19
"अमेरिकेनं इस्रायलला थेट लष्करी मदत केली तर..." आता इराण-इस्रायल युद्धात रशियाची 'एन्ट्री'; दिली खुली धमकी!
20
आरोपांची उठली राळ, मंत्री संजय शिरसाटांचा इम्तियाज जलीलांविरोधात कायदेशीर पलटवार

‘सर्फनाला’चे काम बंद पाडले

By admin | Updated: February 4, 2015 00:11 IST

प्रकल्पग्रस्तांचे आंदोलन : प्रश्न मार्गी न लागल्याचा आरोप

आजरा : अप्पर जिल्हाधिकारी व कार्यकारी अभियंता यांच्याशी पारपोली (ता. आजरा) येथील २१ जानेवारी २०१५ च्या बैठकीत झालेल्या निर्णयांची प्रभावी अंमलबजावणी होत नसल्याच्या कारणास्तव मुक्ती दलाच्या नेतृत्वाखाली प्रकल्पग्रस्तांनी सर्फनाला प्रकल्पाचे काम मंगळवारी बंद पाडले.आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर संपत देसाई यांच्यासह प्रकल्पग्रस्त उपस्थित होते. यावेळी देसाई म्हणाले, अप्पर जिल्हाधिकारी अजित पवार यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीत विविध निर्णय झाले होते. शेळप गावठाणात ज्यांना भूखंडाचे वाटप झाले आहे, अशा प्रत्येक भूखंडधारकास शेळप येथील किमान एक एकर जमीन मिळाली नाही तर पूर्वीचे आदेश बदलून सर्वांना किमान एक एकर जमिनीचा आदेश तातडीने होण्याचे ठरले होते; पण असा आदेश झाला नाही.आंबाडे गट नं. ८६ मधील प्रकल्पग्रस्तांचे गावठाण पसंदीचे व जमीन मागणी फॉर्म सादर झाल्यानंतर तातडीने वर्ग करून आदेश काढण्याचे ठरले होते. प्रत्यक्षात असे घडले नाही. यामुळे प्रशासनावर कितपत विश्वास ठेवायचा, हा प्रश्न आहे. शासकीय अधिकाऱ्यांकडून प्रकल्पग्रस्तांची थट्टा केल्याचा हा प्रकार आहे. प्रकल्पग्रस्त स्त्री-पुरुषांनी अखेर हे काम बंद पाडले. यावेळी पी. आर. पाटील, ज्ञानेश्वर गुंजाळ, मारुती ठोकरे, श्रीपती जाधव, हरिबा जाधव यांच्यासह ‘श्रमुद’चे कार्यकर्ते उपस्थित होते. (प्रतिनिधी)बैठकीत ठरलेल्या गोष्टींची अंमलबजावणी करण्याचे काम टाळले जात आहे. आता कामे पूर्णत्वास जाण्यासाठी प्रकल्पाचे काम बंद करण्याशिवाय पर्याय नाही.- संपत देसाई