शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी बातमी! इराण युद्धामुळे भारतीय अर्थव्यवस्थेसमोर निर्माण झाली ५ मोठी संकटे; आरबीआय गव्हर्नर संजय मल्होत्रांचा महागाईचा इशारा
2
पाकिस्तानच्या मध्यस्थीचे कोणी कोणी केले कौतुक? अमेरिका-इराण युद्धविरामाचे जगभरातून स्वागत! ट्रम्प यांच्या भाषेवर ऑस्ट्रेलियाची टीका
3
२१ लाख गुंतवणूकदारांसाठी खुशखबर! LIC पहिल्यांदाच देऊ शकते बोनस शेअर्स; 'या' दिवशी घोषणा होण्याची शक्यता
4
इराणच्या 'पीस प्लॅन'मध्ये मोठा घोळ! फारसी आणि इंग्रजी मसुद्यात आढळला फरक; युरेनियमच्या अटीवरून संभ्रम वाढला
5
इराणमधील युद्धविरामावर भारताची पहिली प्रतिक्रिया आली समोर, निर्णयाचं स्वागत करत व्यक्त केली अशी अपेक्षा 
6
'चमका हिंदुस्तान हमारा!'; अणुऊर्जा क्षेत्रात भारताचा 'करिश्मा'! रशियानंतर भारत दुसरा देश ठरला, ४०० वर्षांपर्यंत टेन्शन संपणार
7
सस्पेन्स कायम! भारतीयांनो, इराण तात्काळ सोडा; युद्धविरामानंतर काही तासांत भारताने जारी केली सूचना
8
अमेरिका-इराणमध्ये युद्धविरामाची घोषणा; जगभरातील देशांनी काय म्हटले? पाकिस्तानच्या भूमिकेची चर्चा
9
स्मरण दिन २०२६: ७ दिवस ३ उपाय, ‘ही’ सेवा सुरक्षा कवच ठरेल; स्वामी कृपेचा अद्भूत अनुभव येईल!
10
आयसीएल फिनकॉर्पचा नवीन एनसीडी इश्यू १० एप्रिल रोजी खुला होणार; १२.२५% पर्यंत परताव्याचा दावा
11
पाकिस्तानच्या मध्यस्थीचे 'डर्टी सीक्रेट'! १००० खोल्यांचा सौदा केला, आसिम मुनीर यांनी ट्रम्प यांना दिली ८,३०० कोटींची ऑफर
12
Ashok Kharat : अशोक खरातला न्यायालयीन कोठडी; उद्या पुन्हा नव्या गुन्ह्यात कोर्टात सादर करण्याचे आदेश
13
School bus Accident: काळजाचा ठोका चुकवणारा अपघात; ३५ विद्यार्थ्यांसह शालेय बस खड्ड्यात उलटली!
14
७ मिनिटांच्या बैठकीत निवडणूक आयुक्त म्हणाले, Get Lost...; डेरेक ओ ब्रायन यांचा गंभीर आरोप
15
नवऱ्याचे ९ महिलांसोबत संबंध, १४ वर्षांचा संसार मोडला; प्रसिद्ध अभिनेत्रीचा खुलासा, एकटीने करतेय मुलाचा सांभाळ
16
आसाराम बापूच्या मुलाचा घटस्फोट, पत्नीला द्यावी लागणार कोट्यवधी रुपयांची पोटगी, कोर्टाचे आदेश
17
Video : बॉयफ्रेंडला चीटिंग करताना रंगेहाथ पकडलं; भररस्त्यात गर्लफ्रेंडने धू-धू धुतलं, पण नंतर जे झालं…
18
इस्रायल तयार नव्हता...! ट्रम्प यांनी इराणला लुळा-पांगळा करण्याचा प्लॅन सांगितला; नेतान्याहू झटकन तयार झाले...
19
थायलंडच्या महाराजांना भेटायला गेले भारतीय राजदूत; समोर अधिकारी गुडघ्यावर बसले, कारण काय?
20
"बाबा, मला पोलीस नाही व्हायचं!" वडिलांचं स्वप्न बाजूला सारलं; आता स्विंगच्या जोरावर गाजवतोय आयपीएल
Daily Top 2Weekly Top 5

पंकजा मुंडेंच्या राजीनाम्यासाठी रास्ता रोको

By admin | Updated: June 28, 2015 00:53 IST

राष्ट्रवादी काँग्रेसचे आंदोलन : पुणे-बंगलोर महामार्ग रोखला; राजीनामा देईपर्यंत आंदोलनाचा इशारा

कोल्हापूर : तीन लाखांवरील खरेदीसाठी ई-टेंडर काढण्याचे निर्देश आहेत. परंतु, महिला व बालविकासमंत्री पंकजा मुंडे यांनी एका दिवसात २४ अद्यादेश काढून विशिष्ट कंपनीला २०६ कोटी रुपयांचा ठेका मंजूर केला. एक प्रकारे हा भ्रष्टाचाराचाच प्रकार आहे, असा आरोप करीत त्यांनी नैतिकता जपत आपल्या पदाचा राजीनामा द्यावा, या मागणीसाठी राष्ट्रवादी कॉँग्रेसने शनिवारी तावडे हॉटेलजवळ पुणे-बंगलोर महामार्ग रोखला. मुंडेंसह सरकारच्या निषेधार्थ घोषणा देत कार्यकर्त्यांनी तब्बल एक तास महामार्ग रोखून धरला. सकाळी साडेदहापासून राष्ट्रवादी कॉँग्रेस व राष्ट्रवादी युवक कॉँग्रेसचे कार्यकर्ते या ठिकाणी जमायला सुरुवात झाली. साडेअकराच्या सुमारास माजी कामगारमंत्री, आमदार हसन मुश्रीफ व खासदार धनंजय महाडिक या ठिकाणी आले. यावेळी कार्यकर्त्यांनी ठिय्या मारून दोन्ही बाजंूचा महामार्ग रोखून धरला. ‘ताईची चिक्की गोरगरिबांना बुक्की’...‘राजीनामा द्या...राजीनामा द्या...पंकजाताई राजीनामा द्या...’ ‘गरिबांना लुटणाऱ्या भाजप सरकारचा धिक्कार असो...’, अशा घोषणा देत कार्यकर्त्यांनी परिसर दणाणून सोडला. जोपर्यंत मुख्यमंत्री फडणवीस पंकजा मुंडेंचा राजीनामा घेत नाहीत, तोपर्यंत आंदोलन सुरूच ठेवू, असा इशाराही यावेळी देण्यात आला. हसन मुश्रीफ म्हणाले, मंत्री पंकजा मुंडे यांनी २०६ कोटींचा ठेका मंजूर करून गैरव्यवहार केला आहे. अहमदनगरमध्ये आदिवासी मुलांना वाटलेल्या चिक्कीत ब्लेड व काचेचे तुकडे आढळल्याने त्यांच्या जिवाशी मुंडेंनी खेळ केला आहे. त्यामुळे त्यांना मंत्रिपदावर राहण्याचा कोणताही नैतिक अधिकार नसल्याने त्यांनी तातडीने राजीनामा द्यावा. मुख्यमंत्र्यांच्या पारदर्शी कारभाराचे पितळ उघडे पडले असून, भ्रष्टाचारात त्यांचाही वाटा असल्याचा संशय येत आहे. खासदार महाडिक म्हणाले, भ्रष्टाचारमुक्त म्हणणाऱ्या भाजप सरकारचा एक वर्षातच पर्दाफाश झाला आहे. केंद्रासह राज्यात अनेक मंत्री भ्रष्टाचाराच्या जाळ्यात अडकले आहेत. टेंडर न काढता ठेका मंजूर करणाऱ्या मंत्री मुंडे यांनी नैतिकता जपत राजीनामा द्यावा. भ्रष्टाचाराचे आरोप असलेल्या केंद्रातील मंत्र्यांच्याविरोधात येत्या संसदीय अधिवेशतान आवाज उठवू. राष्ट्रवादी युवक कॉँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष उमेश पाटील म्हणाले, मुख्यमंत्र्यांनी लाचलुचपत प्रतिबंधक विभागातर्फे मंत्री मुंडे यांच्या कारभाराची चौकशी करावी. जोपर्यंत या चौकशीचे आदेश मुख्यमंत्री देत नाहीत. तोपर्यंत आंदोलन सुरूच ठेवले जाणार आहे. यावेळी ‘राष्ट्रवादी’चे शहराध्यक्ष राजू लाटकर, आर. के. पोवार, ‘राष्ट्रवादी युवक’चे शहराध्यक्ष आदिल फरास, करवीर तालुकाध्यक्ष हंबीरराव पाटील यांचे भाषण झाले. आंदोलनात जिल्हाध्यक्ष ए. वाय. पाटील, राजू लाटकर, जिल्हा बॅँकेचे संचालक भैया माने, बाबासाहेब पाटील-आसुर्लेकर, ‘राष्ट्रवादी युवक कॉँग्रेस’चे जिल्हाध्यक्ष प्रदीप पाटील-भुयेकर, शहराध्यक्ष आदिल फरास, आर. के. पोवार, अनिल साळोखे, किसन कल्याणकर, मधुकर जांभळे, अमित पाटील, नितीन जांभळे यांच्यासह कार्यकर्ते सहभागी झाले होते. (प्रतिनिधी)