शहरं
Join us  
Trending Stories
1
आता रिपब्लिकन घडवणार ट्रम्प-मस्क यांच्यात समेट, दोघांतील वादामुळे भविष्यात अडचणी वाढण्याची पक्षाला भीती
2
आजचे राशीभविष्य : ०८ जून २०२५; आर्थिक लाभ संभवतात, विवाद व बौद्धिक चर्चेपासून दूर राहा
3
पिनकाेड विसरा; आता हा ‘पीन’ सांगेल हवा असलेला अचूक पत्ता, टपाल विभागाने सुरू केली नवीन डिजिपीन प्रणाली
4
छोट्या-छोट्या गरजांसाठी आधी घ्यावे लागायचे कर्ज, शेती क्षेत्रात झाले चांगले बदल, पंतप्रधान नरेंद्र मोदी
5
निकृष्ट अन्नधान्य कैद्यांना पुरविले; राजू शेट्टींच्या आरोपांमुळे अमिताभ गुप्ताही घेऱ्यात; जालिंदर सुपेकर, कंत्राटदार झंवर हेही रडारवर
6
छत्तीसगड सीमेवर चकमक : नक्षल कमांडर ‘भास्कर’ला कंठस्नान, ३ दिवसांत ७ नक्षलवादी ठार
7
महाराष्ट्रात ‘मॅच-फिक्सिंग’, राहुल गांधींचा आरोप; छाननीवेळी आक्षेप घेतला नाही. आयाेगाचं उत्तर
8
छोट्याशा चुकीमुळे भडकलेली, ४५ वर्षांपासून धगधगणारी ‘नरकाच्या दारा’ची आग मंदावली
9
विराट का म्हणतोय, ‘महान बनायचे, तर कसोटी खेळा!’
10
मुर्शिदाबाद हिंसाचार; १३ जणांविरोधात आरोपपत्र दाखल
11
कोकोने पटकावले पहिले फ्रेंच ओपन ग्रँडस्लॅम
12
Coronavirus: देशातील अनेक राज्यात कोरोना रुग्णसंख्येत वाढ; महाराष्ट्रात ८६ नवीन रुग्ण आढळले
13
राजासोबत 'ते' तिघे कोण होते, ज्यांच्या मागून सोनम चालत होती; स्थानिक गाईडचा खुलासा
14
तेलंगणा सीमेवरील गोदापात्रात सहा मुले बुडाली; नदीकाठी काळीज पिळवटणाारा आक्रोश
15
भारत-पाकिस्ताननंतर आशियातील आणखी २ देशात युद्धजन्य स्थिती; सीमेवर वाढवले सशस्त्र सैन्य
16
"उद्धव-राज एकत्र येऊ शकतात, उद्धवजींनी त्या लोकांपासून सावध राहावं", गजानन कीर्तिकरांचा ठाकरेंना महत्त्वाचा सल्ला
17
बिहार विधानसभा निवडणूक 2025 : NDA चा फॉर्म्युला ठरला! जाणून घ्या, कुणाच्या वाट्याला किती जागा येणार?
18
पोलीस नोकरी सोडली अन् बनला Youtuber; भारतीय क्रिएटर्सला अडकवलं, हेरगिरीसाठी पाकचा नवा डाव
19
सोनिया गांधी रूटीन चेकअपसाठी शिमला येथील IGMC हॉस्पिटलला दाखल; उपचारानंतर घरी सोडले
20
राज ठाकरेंसोबतच्या संबंधावर सोनाली बेंद्रेने मौन सोडलं; पहिल्यांदाच उघडपणे केला खुलासा

‘मोलॅसिस’ विक्री टेंडर तत्काळ थांबवा

By admin | Updated: February 26, 2016 01:25 IST

रावळ : ‘भोगावती’ कारखान्याला आदेश

आमजाई व्हरवडे : मोलॅसिसचे विक्री टेंडर तत्काळ थांबविण्याचे आदेश साखर सहसंचालक सचिन रावळ यांनी गुरुवारी परिते (ता. करवीर) येथील भोगावती सहकारी साखर कारखान्याला दिल्याने या परिसरात खळबळ उडाली आहे. याप्रकरणी ‘भोगावती’चे माजी अध्यक्ष सदाशिवराव चरापले यांच्या नेतृत्वाखालील शिष्टमंडळाने गुरुवारी साखर सहसंचालकांकडे तक्रार केली होती. ‘भोगावती’च्या सात हजार टन मोलॅसिस विक्रीत ७० लाखांचा तोटा असल्याने हे विक्री टेंडर थांबविण्याची मागणी ‘भोगावती’चे माजी अध्यक्ष सदाशिवराव चरापले यांच्या नेतृत्वाखालील शिष्टमंडळाने साखर सहसंचालक रावळ यांच्याकडे निवेदनाद्वारे केली होती. त्याची दखल घेत ‘भोगावती’ला गुरुवारीच रावळ यांनी मोलॅसिसच्या विक्रीबाबतचे टेंडर थांबविण्याचे आदेश दिले. जवाहर साखर कारखान्याने १ फेब्रुवारीला विक्री केलेला दर प्रतिटन ६२०० रुपये होता. कुंभी साखर कारखान्याने ८ फेब्रुवारीला केलेल्या मोलॅसिसचा दरही प्रतिटन ६२०० रुपयेच होता. मग २९ जानेवारीला विक्री टेंडर केलेला ‘भोगावती’चा दर ५३०० रुपयेच का? त्यामुळे ‘भोगावती’च्या संचालक मंडळाने ७० लाखांचा अपहार करण्याच्या उद्देशाने प्रतिटन ९०० रुपये कमी दराने मोलॅसिस विक्री करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे हे टेंडर रद्द करावे, असे चरापले यांनी तक्रारीत म्हटले आहे. या निवेदनावर सदाशिवराव चरापले यांच्यासह हिंदुराव चौगले, संजय पाटील (कसबा तारळे), शंकरराव पाटील (हसूर), भीमराव पाटील (वाशी), यशवंत पाटील (हिरवडे), वसंत पाटील (कुरुकली), ए. डी. पाटील (गुडाळ), सुभाष पाटील (सिरसे), सुभाष जाधव (पिंपळवाडी), विठ्ठल भोपळे (भोपळवाडी), आदींच्या सह्या आहेत.