शहरं
Join us  
Trending Stories
1
Baramati By Election 2026: “सुनेत्राकाकींना बिनविरोध निवडून देण्यासाठी सहकार्य करा”; रोहित पवारांचे काँग्रेसला आवाहन
2
होर्मुज सामुद्रधुनी उघडा, अन्यथा...; डोनाल्ड ट्रम्प यांचा इराणला शेवटचा इशारा, युद्धविराम धोक्यात?
3
फ्लॅटसाठी १ कोटी मोजले, मध्यरात्री बाल्कनीचे छत कोसळले...; व्हायरल व्हिडीओमुळे रिअल इस्टेट क्षेत्राचे पितळ उघडे पडले
4
मोठे गिफ्ट! आता कारच्या डॅशबोर्डवर दिसणार व्हॉट्सॲप; चॅटिंग, कॉलही करता येणार; Apple CarPlay साठी खास अ‍ॅप लाँच
5
"माझ्याकडे दैवी शक्ती आहे..." म्हणत लुटले १६ एकर रान; भोंदू अशोक खरातचा शेतकऱ्यांना गंडा, १४ वा गुन्हा दाखल
6
IPL 2026: मैदानात शुभमन गिलकडून झाली चूक, डगआऊटमध्ये आशिष नेहराचा चढला पारा, रिअ‍ॅक्शन कॅमेऱ्यात कैद
7
आजी म्हणायची कोरे कपडे घालू नका... पण का? जुन्या पिढीच्या 'त्या' भीतीला विज्ञानाचा आधार!
8
ट्रम्पना मोठा स्पर्धक तयार झाला! पाकिस्तान सीझफायरसाठी नोबेल मागू लागला; शरीफ, मुनीर...
9
Ashok Kharat : "तुला मुलगाच होईल..." असं सांगून भोंदू अशोक खरातने गर्भवतीवर केले होते अत्याचार
10
मस्साजोग सरपंचपदाची पोटनिवडणूक बिनविरोध होणार? संतोष देशमुखांच्या पत्नी उमेदवारी अर्ज भरणार
11
Viral Video: "नोकरी हवी तर किम जोंग उनला शिवी दे..."; कंपनीची अजब अट पाहून उमेदवार थरथरला
12
Top Marathi News LIVE Updates: काँग्रेसने आपला उमेदवार मागे घ्यावा; सुप्रिया सुळेंची काँग्रेसला विनंती
13
मस्करीची कुस्करी! मित्राच्या गुप्तांगात भरली एअर कॉम्प्रेसरने हवा; आतड्यांचा अक्षरशः गोळा झाला अन्...
14
इस्रायलच्या हल्ल्यांनं लेबनान हादरला, १० मिनिटांत १०० हून अधिक ठिकाणी हल्ले! २५४ जणांचा मृत्यू, अनेक जखमी; इराण म्हणाला...
15
पाकिस्तान खोटारडा निघाला...! सीजफायरच्या नावाखाली इराणचा गेम? की अमेरिकेनं मोडला करार...? लेबनानवरून नवा वाद
16
Kruthika Reddy : इंजेक्शन, गर्लफ्रेंड अन् डिजिटल पुरावे; डॉ. कृतिका रेड्डी हत्याप्रकरणात पतीच्या चॅटने फिरली चक्र
17
इराणनं विश्वासघात केला तर, सर्वनाश अटळ! ट्रम्प यांचा इशारा, होर्मुजजवळ अजूनही युद्धनौका तैनात
18
स्मृती मानधना आणि पलाश मुच्छल यांच्यातील दुरावा मिटला? कुटुंबातील सदस्यांचा एकत्रित फोटो व्हायरल
19
“इराणच्या १० कलमी प्रस्तावाला ट्रम्प यांनी दाखवली केराची टोपली”; व्हाइट हाऊसने सगळे सांगितले
20
"पाकिस्तान विश्वासार्ह नाही!" इस्रायली राजदूताचा अमेरिकेला घरचा आहेर; जेडी व्हॅन्स यांच्या पाकिस्तान दौऱ्यापूर्वीच खळबळ
Daily Top 2Weekly Top 5

आक्षेपार्ह मजकुराच्या पुस्तकांची विक्री थांबवा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 5, 2021 04:23 IST

लोकमत न्यूज नेटवर्क कोल्हापूर : छत्रपती संभाजी महाराज यांच्याबाबत आक्षेपार्ह मजकूर आणि शिवाजी विद्यापीठाचे नाव असलेली सर्व पुस्तके तातडीने ...

लोकमत न्यूज नेटवर्क

कोल्हापूर : छत्रपती संभाजी महाराज यांच्याबाबत आक्षेपार्ह मजकूर आणि शिवाजी विद्यापीठाचे नाव असलेली सर्व पुस्तके तातडीने मागे घ्यावीत, त्यांची विक्री तत्काळ थांबवावी, अशी सूचना विद्यापीठ प्रशासनाने गुरुवारी फडके बुक हाऊसला केली. बी. ए. अभ्यासक्रमातील इतिहास विषयाची पुस्तके यापुढे विद्यापीठाने प्रकाशित करावी, अशी शिफारस इतिहास विषयाच्या अभ्यास मंडळाने केली.

फडके बुक हाऊसने प्रकाशित केलेल्या बी. ए. भाग तीन (सेमिस्टर पाच) ‘मराठ्यांचा राजकीय इतिहास’ या पुस्तकावर आधारित इतिहास सुपर गाईडसह अन्य दोन विषयांच्या पुस्तकांमध्ये छत्रपती संभाजी महाराज यांच्याबाबत आक्षेपार्ह मजकूर असल्याचे संभाजी ब्रिगेडचे जिल्हाध्यक्ष रूपेश पाटील यांनी विद्यापीठ प्रशासनाच्या निदर्शनास आणून दिली. त्यासह या बुक हाऊसवर कायमस्वरूपी बंदी घालण्याबाबतची कारवाई करण्याची मागणी केली. त्यानंतर विद्यापीठाच्या प्रभारी कुलसचिवांनी या बुक हाऊसला सूचना करणारे पत्र पाठविले. फडके बुक हाऊसने प्रकाशित केलेल्या पुस्तकांमध्ये छत्रपती संभाजी महाराजांबाबत आक्षेपार्ह मजकूर प्रकाशित झाल्याची बाब अतिशय गंभीर आहे. या पुस्तकांमध्ये विद्यापीठाच्या नावाचा उपयोग करण्याकरिता विद्यापीठाची कोणतीही पूर्वपरवानगी घेतलेली नाही. त्यामुळे आक्षेपार्ह मजकूर आणि विद्यापीठाचे नाव असलेली सर्व पुस्तके तातडीने मागे घ्यावीत आणि त्यांची विक्री तत्काळ थांबविण्यात यावी. यापुढे विद्यापीठाच्या नावाचा वापर करून महापुरुषांची बदनामी होईल, असा कोणताही मजकूर छपाई करण्यात येणार नाही. याबाबत आवश्यक ती खबरदारी घ्यावी. यासंदर्भात केलेली कार्यवाही तत्काळ विद्यापीठ कार्यालयाला कळविण्यात यावी, असे या पत्रात म्हटले आहे. दरम्यान, याबाबत विद्यापीठात अभ्यास मंडळाची बैठक झाली. त्यात संबंधित सर्व पुस्तके प्रकाशकांनी मागे घ्यावीत. इतिहास अभ्यासक्रमाची पुस्तके विद्यापीठाने प्रकाशित करावीत, अशी शिफारस या मंडळाने विद्यापीठाला केली.

---------------------------------------------

प्रतिक्रिया

आक्षेपार्ह मजकूर आणि परवानगीशिवाय विद्यापीठाच्या नावाचा वापर केल्याचा प्रकार विद्यापीठाने संवेदनशीलपणे, गांभीर्याने घेतला आहे. या पुस्तकांची विक्री थांबविण्यासह ती मागे घेण्याबाबतचे पत्र फडके बुक हाऊसला दिले आहे.

-डॉ. व्ही. एन. शिंदे, प्रभारी कुलसचिव