शहरं
Join us  
Trending Stories
1
अनकॅप्ड मुकुल चौधरीची अविश्वसनीय खेळी! KKR च्या तोंडचा घास हिसकावत LSG ला जिंकून दिली मॅच
2
मुंबईला भारतातील पहिली नॉन-एसी ‘बंद दरवाजांची’ लोकल ट्रेन; उपनगरीय सेवेत होणार दाखल  
3
कोण आहे Mukul Choudhary? ‘आर्मी मॅन’च्या भूमीतला २१ वर्षीय ‘जवान’ बिग हिटरच्या रुपात कसा घडला?
4
Wife Killed Husband: पतीची हत्या, पत्नीचा आक्रोश; प्रियंकाच दुःख बघून सगळे हेलावले, पण तिच निघाली मास्टरमाईंड
5
"आमचे हात अजूनही ट्रिगरवरच आहेत", खवळलेल्या इराणची इस्रायलला खुली धमकी, लेबनाननंतर आक्रमक
6
Video: मुंबई विमानतळाच्या टर्मिनल १ मध्ये आगीचा भडका; प्रवेशद्वार बंद, धुराचे लोट बघून प्रवासी घाबरले
7
Latest Marathi News LIVE: इराणने हल्ला केला, तर आम्हीही निष्ठुरपणे उत्तर देऊ; इस्रायलच्या संरक्षण मंत्र्याचा इशारा
8
बॉलिंगसाठी 'ग्रीन' सिग्नल! तब्बल २५ कोटींचा ऑलराउंडर अखेर गोलंदाजीला आला; पहिल्याच षटकात रिषभ पंतची शिकार
9
Pune Crime: प्रेमात सगळं विसरली अन् प्रियकराच्या मदतीने सहा वर्षांच्या लेकराची केली हत्या, कारण...; पुणे जिल्ह्यातील घटना
10
KKR vs LSG : अजिंक्य रहाणेचा भन्नाट सिक्सर! बॅट निसटली तरीही चेंडू थेट सीमारेषेबाहेर (VIDEO)
11
उपराष्ट्रपती जे.डी. व्हान्स यांना पाकिस्तानात जायला वाटतेय भीती; US-इराण चर्चा फिस्कटणार?
12
"...तोपर्यंत आम्ही हल्ले करत राहू", इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांचा इशारा; हल्ल्याचे व्हिडीओही दाखवले
13
22 वर्षाचा बॉयफ्रेंड, ३५ वर्षाची गर्लफ्रेंड; दोघे रुममध्ये गेले आणि नंतर 'बेड बॉक्स'मध्ये मिळाला तिचा मृतदेह
14
KKR vs LSG: Finn Allen खराब पंचगिरीचा शिकार? दिग्वेश राठीनं टिपलेल्या झेलवरुन वादंग (VIDEO)
15
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
16
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
17
रशियाच्या पाणबुड्या महिनाभर ब्रिटनच्या समुद्रात लपलेल्या, काय करत होत्या? ब्रिटीशांच्या दाव्याने खळबळ...
18
KKR vs LSG : अर्जुन तेंडुलकरची नुसतीच हवा! Playing XI मध्ये मिळाली नाही जागा; अजिंक्य रहाणेचा गेम प्लॅनही फसला
19
टी-२० सामन्यात तब्बल ९ विकेट्स, एका षटकांत ४ बळी; कधीही न तुटणारा वर्ल्ड रेकॉर्ड कुणी बनवला?
20
ट्रम्प यांच्या दाव्याने खळबळ, १०० मिसाईल...! 'शांतीदूत' म्हणवून घेणारा पाकिस्तान 'बेनकाब'; चीनचा बुरखा फाटला
Daily Top 2Weekly Top 5

औरवाड येथे रास्ता रोको

By admin | Updated: February 17, 2015 00:11 IST

रस्त्यासाठी आंदोलन : औरवाड, गणेशवाडीसह सात गावांतील ग्रामस्थ आक्रमक

बुबनाळ : शिरोळ तालुक्यातील औरवाड ते गणेशवाडी व आलास ते औरवाड हे आंतरराज्य जोडणारे दोन्ही रस्ते मजबूत करावेत, या मागणीसाठी औरवाड-नृसिंहवाडी पुलाजवळ रास्ता रोको आंदोलन करण्यात आले. गणेशवाडी, औरवाडसह सात गावांतील नागरिकांनी आंदोलनात भाग घेतल्यामुळे दोन तासांहून अधिक काळ या मार्गावर वाहतूक ठप्प झाली होती. औरवाड ते गणेशवाडी व आलास ते औरवाड हे दोन मुख्य रस्ते दोन राज्यांना जोडणारे आहेत. यामुळे या रस्त्यांवरून कर्नाटकातून महाराष्ट्रात व महाराष्ट्रातून कर्नाटकात अशा मोठ्या प्रमाणात वाहतूक सुरू असते. मात्र हे दोन्ही रस्ते कायमस्वरूपी खड्डामय होतात. पावसाळ्यात रस्त्यांची मोठी दुरवस्था बनते. वारंवार होणाऱ्या अपघातांमुळे वाहनधारक मेटाकुटीस आले आहेत. शिवाय या रस्त्यांवरून क्षमतेपेक्षा अधिक अवजड वाहतूक सुरू असल्यामुळे रस्ते खचतात. हे दोन्ही रस्ते पक्के व मजबूत करावेत, या मागणीसाठी सोमवारी सकाळी औरवाड येथील नवीन व जुन्या पुलाजवळ बुबनाळसह आलास, औरवाड, गौरवाड, कवठेगुलंद, शेडशाळ, गणेशवाडी या सात गावांतील नागरिकांनी रास्ता रोको आंदोलनास सुरुवात केली. तहसीलदार सचिन गिरी, सार्वजनिक बांधकाम विभागाचे जे. सी. बागवान आंदोलनस्थळी आल्यानंतर बागवान यांच्यावर प्रश्नांचा भडिमार करण्यात आला. तहसीलदार गिरी, पोलीस निरीक्षक डी. एस. हाके व सप्तकृषी विकास समिती यांच्यात सकारात्मक चर्चा झाली. त्यानंतर निवेदन देण्यात आले. आंदोलनात प्रकाश पाटील, योगेश जगताप, फय्याज गवंडी, संजय शिंदे, औरवाडचे उपसरपंच शपी पटेल, अफसर पटेल, दादेपाशा पटेल, अस्मल मुल्ला, गजानन वंटे, महेश देवताळे, सुनील संकपाळ, विजय कोळी, कैलास लाड यांच्यासह सात गावांतील ग्रामस्थ सहभागी झाले होते. दरम्यान, आजचे आंदोलन जनजागृती व शासनाला इशारा देण्यासाठी करण्यात आले. येत्या दीड महिन्यात मजबूत व पक्का रस्ता होण्यासाठी निधी मंजूर झाला नाही, तर सार्वजनिक बांधकाम विभाग जयसिंगपूर कार्यालयासमोर बेमुदत उपोषण करण्याचा इशारा यावेळी ग्रामस्थांनी दिला. (वार्ताहर)