शहरं
Join us  
Trending Stories
1
Pune Railway Station: पुणे रेल्वे स्थानकाच्या नामांतरावरून वाद, राजकारण्यांची चढाओढ, कोणी काय मागणी केली? वाचा
2
Mumbai Local Train: कुर्ला स्थानकात तांत्रिक बिघाड; मध्य रेल्वेची वाहतूक विस्कळीत, गाड्या १० ते १५ मिनिटे उशिराने
3
६० वर्ष इराणमधून व्यवसाय चालवायचं हे भारतीय औद्योगिक घराणं; आता आहे ब्रिटनचं सर्वात श्रीमंत कुटुंब
4
Iran-Israel Ceasefire: इराणच्या हल्ल्यानंतर बंद केलेले कतारचे हवाई क्षेत्र पुन्हा सुरू; इंडिगोने दिली माहिती
5
Stock Market Today: 'या' वृत्तानं शेअर बाजारात उत्साह; ६३२ अंकांच्या तेजीसह सेन्सेक्स खुला, Midcap शेअर्समध्ये खरेदी
6
सौरव गांगुलीला अजूनही खटकते करियमधली 'ती' एक गोष्ट; निवृत्तीच्या १७ वर्षानंतर व्यक्त केल्या भावना
7
"...तरच आम्ही हल्ले थांबवू’’, युद्धविरामावर इराणच्या परराष्ट्र मंत्र्यांनी स्पष्ट केली भूमिका
8
'ऑपरेशन सिंधू'ला गती, इराणमधून २९० भारतीयांना परत आणले; यादीत श्रीलंकेच्या महिलेचाही समावेश
9
एक चूक अन् मिळाला १४ कोटी पगार; सुपरवायझरची गेली नोकरी
10
इस्राइल-इराणमधील संघर्ष शिगेला, अमेरिकेच्या तळांवरही हल्ले, मग अचानक युद्धविराम कसा झाला? पडद्यामागे काय घडलं, अशी आहे Inside Story
11
Iran Israel ceasefire: इराण-इस्रायलमधील १२ दिवसांचे युद्ध संपले; डोनाल्ड ट्रम्प यांनी केली मोठी घोषणा, काय म्हणाले?
12
इराणने रशियाकडे मागितली मदत; परराष्ट्र मंत्री अराघची यांनी मॉस्कोमध्ये पुतिन यांची घेतली भेट
13
रक्त चाचणी आता होईल केवळ ५८२ रुपयांत; हिमोफिलिया, व्हॉन विलेब्रडग्रस्तांचे पैसे वाचणार
14
Rashi Bhavishya: स्त्रीमुळे अडचणीत याल, अपघाताचीही शक्यता; आज 'या' राशीच्या लोकांनी काळजी घेणं आवश्यक
15
Election 2025: प्रभाग रचनेचा प्रस्ताव देणार आता निवडणूक आयोगाला, सरकारचा सुधारित आदेश
16
खोटे जात प्रमाणपत्र ही घटनात्मक फसवणूक, सरपंचाला हायकोर्टाने ठोठावला ५ लाखांचा दंड
17
भारताला तेलाची नाही चिंता; मित्र येतो कामी! इराणकडून आयात शून्य, पण...
18
पहिलीपासून तिसरी भाषा हिंदीचा निर्णय रद्द करा; मराठी भाषक अभ्यासकांनी मुख्यमंत्र्यांना पाठवले पत्र
19
आपने जिंकल्या विधानसभेच्या २ जागा; भाजपने लावली होती ताकद पणाला
20
MSRTC: एसटी गेली 'खड्ड्यात'; ३७ वर्षे तोट्याचा प्रवास, एसटी महामंडळाची श्वेतपत्रिका जाहीर

विधवासंबंधी अनिष्ट प्रथा बंद करणार

By admin | Updated: June 28, 2015 23:48 IST

स्वावलंबी बनविण्याचा उद्देश : विधवाश्रम विधवा संघटनेच्या मेळाव्यात निर्धार

कोल्हापूर : विधवांना अन्यायाची वागणूक देणाऱ्या अनिष्ट प्रथा बंद करण्याचा निर्धार विधवाश्रम विधवा संघटनेच्या मेळाव्यात रविवारी घेण्यात आला. गंगावेश येथील सत्यशोधक समाजाच्या हॉलमधील या मेळाव्यात ‘जगा आणि सन्मानाने जगू द्या,’ ‘कमवा आणि जगा’ या दोन तत्त्वांवर संघटनेच्या कार्याची उभारणी करण्याचे निश्चित करण्यात आले.विधवांनी हिरवी साडी, हिरवी कांकणे वापरायची नाहीत. केसांमध्ये फूल घालायचे नाही, अशा अनेक अनिष्ट प्रथा अजूनही समाजात सुरू आहेत. त्यांना अन्यायाची वागणूक देणाऱ्या प्रथा का आणि कशासाठी सुरू करण्यात आल्या, याची माहिती कोणालाही नाही. त्यामुळे अशा प्रथा बंद करण्याचा निर्धार मेळाव्यात करण्यात आला. विधवांनी स्वावलंबी बनावे यासाठी ‘कमवा व जगा’ असा उद्देश नजरेसमोर ठेवून छोटे-मोठे उद्योग-व्यवसाय सुरू करणे; साक्षर विधवांना नोकरी, रोजगार उपलब्ध करून देण्याचे ठरविण्यात आले. विधवा संघटनेकडून बोलतोय असे म्हणण्याऐवजी ‘जय सावित्री’ म्हणायचे आणि हेच संघटनेचे घोषवाक्य राहील, असे सर्वांनुमते ठरल्याची माहिती मेळाव्याचे अध्यक्ष बाळ घाटगे यांनी पत्रकाद्वारे दिली. या मेळाव्यास नितीन शेळके, सुभाष देसाई, शाम आडुरकर, राजू सावंत, गजानन लिंगम, अर्चना पांढरे, कुसुम देसाई, आदी उपस्थित होते. (प्रतिनिधी)