शहरं
Join us  
Trending Stories
1
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
2
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
3
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
4
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
5
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
6
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
7
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
8
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
9
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
10
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
11
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
12
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
13
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
14
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
15
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
16
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
17
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
18
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
19
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
20
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
Daily Top 2Weekly Top 5

शेतकऱ्यांची ऊसतोडीतून होणारी लुट थांबवा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 19, 2021 04:25 IST

लोकमत न्यूज नेटवर्क कोल्हापूर : शेतकऱ्यांनी मोठ्या कष्टाने पिकवलेला ऊस कारखान्याला पाठवताना ऊसतोड मजूर व ट्रॅक्टर मालक शेतकऱ्यांची प्रचंड ...

लोकमत न्यूज नेटवर्क

कोल्हापूर : शेतकऱ्यांनी मोठ्या कष्टाने पिकवलेला ऊस कारखान्याला पाठवताना ऊसतोड मजूर व ट्रॅक्टर मालक शेतकऱ्यांची प्रचंड पिळवणूक करत आहेत. साखर सहसंचालक, कारखानदार, ऊस तोडणी-वाहतूक मंड‌ळ व शेतकऱ्यांची तातडीने बैठक घेऊन ही लूट थांबवावी, अशी मागणी जय शिवराय किसान संघटना व आंदोलन अंकुश या संघटनांनी सोमवारी केली. ‘लोकमत’मध्ये ‘खुशाली की खंडणी’ या मालिकेद्वारे शेतकऱ्यांवरील अन्यायाला वाचा फोडण्यात आली होती, त्याचाच आधार घेत ही मागणी करण्यात आली आहे.

निवासी उपजिल्हाधिकारी भाऊसाहेब गलांडे यांना निवेदन देऊन यावर तोडगा काढण्याची विनंती करण्यात आली आहे. या निवेदनात कोल्हापुरात सध्या साखर कारखान्यांचा हंगाम सुरु असून, मजूर एकरी ५ ते ७ हजार रुपये घेतल्याशिवाय ऊस तोडत नाहीत. चंदगड, आजरा, गडहिंग्लज भागात तर खेपेला ३ ते ४ हजार रुपये घेतले जातात. ट्रॅक्टर मालकही खेपेला ड्रायव्हरला ३०० रुपये एन्ट्री घेत आहेत. कोरोनामुळे मजूर कमी आल्याचे सांगितले जाते. मजूर कमी आले असतील तर साखर कारखाने पूर्ण क्षमतेने कसे सुरु आहेत, याचा अर्थ कारखानेसुद्धा या प्रकारात सामील आहेत का, अशी शंका शेतकऱ्यांना आहे. वास्तविक ऊस कारखान्याला गेल्यानंतर शेतकऱ्यांच्या बिलातून तोडणी, वाहतूक मजुरांना व ट्रॅक्टर मालकांना पैसे दिले जात असताना शेतकऱ्यांकडून खुशालीच्या नावाखाली खंडणी उकळली जात असल्याचे म्हटले आहे. यावेळी संघटनेचे अध्यक्ष शिवाजी माने, धनाजी चुरमुंगे, धनाजी पाटील, राजेश पाटील, नारायण थोरवत, बजरंग अवघडे, प्रताप चव्हाण, भैरवनाथ मगदूम, शिवाजी शिंदे यांच्यासह कार्यकर्ते उपस्थित होते.

---

फोटो नं १८०१२०२१-कोल-जय शिवराय निवेदन

ओळ : ‘लोकमत’मधील ‘खंडणी की खुशाली’ या वृत्त मालिकेची दखल घेत सोमवारी कोल्हापुरातील जय शिवराय किसान संघटना व आंदाेलन अंकुश यांच्यावतीने निवासी उपजिल्हाधिकारी भाऊसाहेब गलांडे यांना निवेदन देण्यात आले.

--