शहरं
Join us  
Trending Stories
1
"...तर भारत वर्षाला ३०० प्लुटोनियम अणुबॉम्ब बनवेल!"; कलपक्कमच्या यशानं पाकिस्तानच्या पोटात गोळा, फक्त भीतीनंच हादरला
2
अमेरिका-इराण युद्धविरामानंतर केंद्र सरकारचा मोठा निर्णय; LPG पुरवठ्याबाबत नवा फॉर्म्युला तयार
3
ही कसली सीझफायर? लावन रिफायनरीनंतर सिर्री बेटही स्फोटांनी हादरले; तेलाच्या साठ्यांवर हल्ले?
4
आगीतून फुफाट्यात! बाईक चोरली अन् ट्रॅफिक नियमही मोडला; चोराचा फोटो पोहोचला मालकाच्या मोबाईलवर
5
Tech Tips: कोणालाही न कळता कॉल रेकॉर्डिंग कसे करावे? ९९% लोकांना माहित नाही ही सोपी ट्रिक!
6
इराणसोबत युद्धविराम करून ट्रम्प यांनी युद्धातून अंग काढले; आता इस्रायलला चुकवावी लागणार किंमत
7
Health Tips: लघवीची दुर्गंधी म्हणजे केवळ उष्णता नव्हे, तुमच्या शरीराने दिलेला 'हा' गंभीर इशारा असू शकतो!
8
इराणसोबत धोका? सीझफायरनंतर काही तासांतच लावन बेटावरील तेल रिफायनरीमध्ये भीषण स्फोट, जगाचे कान टवकारले...
9
'स्ट्रेट ऑफ होर्मुझ'मध्ये ट्रॅफिकजाम; युद्धविरामानंतरही १०००+ जहाजे अडकून पडली...
10
इराण-अमेरिका युद्धबंदीने जग सुखावलं, पण 'हा' देश भडकला! पाकिस्तानच्या 'त्या' खेळीमुळे मित्रराष्ट्र नाराज
11
Summer Special: भेळ तर नेहमीच खाता, पण 'हा' सिक्रेट' मसाला वाढवेल सुकी भेळेची लज्जत
12
मोठी बातमी! इराण युद्धामुळे भारतीय अर्थव्यवस्थेसमोर निर्माण झाली ५ मोठी संकटे; आरबीआय गव्हर्नर संजय मल्होत्रांचा महागाईचा इशारा
13
‘तुमच्या बापात दम असेल तर आमच्याकडून वंदे मातरम् वदवून दाखवा’, काँग्रेस नगरसेविकेचं भाजपाला अव्हान, इंदूर महानगरपालिकेत गदारोळ
14
अवघ्या १५ वर्षांचा मुलगा जगाला नडतोय; मुंबई-राजस्थान सामन्यात भज्जीचा वैभव सूर्यवंशीला सॅल्यूट
15
सीजफायर लागू होताच पहिल्या देशाने आपली एअरस्पेस खुली केली, विमानतळही सुरु झाले...
16
Latest Marathi News Live: डहाणूला जाणाऱ्या लोकलची म्हशीला धडक; उपनगरीय रेल्वे सेवा विस्कळीत, गाड्या १५ मिनिटे उशिराने
17
IndiGo, Air India ला संजीवनी; 'या' शुल्कात मोठी कपात, तिकिटांचे दर कमी होणार?
18
'धुरंधर'साठी गौरव गेराचं असं झालं ऑडिशन, 'त्या' सीननंतर मिळाली आलम भाईची भूमिका
19
Akshaya Tritiya 2026 Date: यंदा अक्षय तृतीया कधी आहे? १९ की २० एप्रिल? 'या' शुभ मुहूर्तावर करा सोने खरेदी; वाचा सविस्तर
20
Car Gift: बक्षीस असावं तर असं...! चेन्नईतील कंपनीने १२ मेहनती कर्मचाऱ्यांना दिली लग्झरी AUDI भेट
Daily Top 2Weekly Top 5

बावड्यात पाण्यासाठी रास्ता रोको

By admin | Updated: August 24, 2016 01:00 IST

संतप्त महिलांचा ठिय्या : खराब पाईपलाईन बदलण्याच्या प्रारंभानंतरच आंदोलन मागे; पालिकेचे अधिकारी धारेवर

कसबा बावडा : शहरात पाण्यासाठी अनेकवेळा ठिकठिकाणी रास्ता रोको, आंदोलने झाली, त्यावेळी महापालिकेच्या अधिकाऱ्यांनी आंदोलनस्थळी जाऊन काही तरी आश्वासन दिल्यानंतर हे आंदोलन मागे घेतले जात असल्याचा आजवरचा अनुभव; मात्र याला मंगळवारी कसबा बावड्यातील धनगर गल्लीतील महिलांनी पाण्यासाठी केलेले रास्ता रोकोचे आंदोलन अपवाद ठरले. महापौर अश्विनी रामाणे यांनी खराब पाईपलाईन बदलण्याच्या कामाचा श्रीफळ वाढवून प्रारंभ केल्यानंतरच संतप्त महिलांनी हे आंदोलन मागे घेतले. गेली अनेक वर्षे धनगर गल्ली, कवडे गल्ली, चौगले गल्ली, चव्हाण गल्ली, वाडकर गल्ली, आदी भागांत अपुरा व अनियमित पाणीपुरवठा होत आहे; मात्र याचा सर्वाधिक फटका धनगर गल्लीतील नागरिकांना बसत होता. या गल्लीतील नागरिकांनी पाणीपुरवठा सुरळीत व्हावा म्हणून आतापर्यंत महापौर, आयुक्त, जलअभियंता व नगरसेवक यांना वारंवार निवेदन दिली. तसेच दोनवेळा रास्ता रोकोही केला. परंतु, प्रत्येक वेळी या गल्लीतील नागरीकांना आश्वासनापलीकडे काहीच मिळाले नाही. मंगळवारपासून दररोज पाणीपुरवठा करण्याची घोषणा महापालिकेने सर्वसाधारण सभेत केली होती. मात्र, पहिल्याच दिवशी धनगर गल्लीत अपुरे व कमी दाबाने पाणी आल्याने येथील संतप्त महिलांनी नियमीत पाणी पुरवठ्याची मागणी करीत मुख्य रस्त्यावर तब्बल अडीच तास रास्ता रोको आंदोलन केले. सकाळी ११ वाजता आंदोलनास सुरुवात झाली. आंदोलनात महिला घागरी व पाण्याच्या बादल्या घेऊनच सहभागी झाल्या होत्या. पोलिसांनी त्यांना आंदोलन मागे घेण्याबाबत सांगितले; मात्र त्या जागच्या हालल्या नाहीत. यामुळे ऐन रहदारीवेळीच वाहतूक व्यवस्था पूर्ण कोलमडली. दुपारी एकच्या सुमारास महापौर अश्विनी रामाणे, उपायुक्त विजय खोराटे, जलअभियंता मनीष पोवार आंदोलनस्थळी आले. मात्र, त्यांच्यावर महिलांनी प्रश्नांचा भडिमार केला. दोन-अडीच हजार पाण्याचे बिल घेता, सांडपाणी चार्ज घेता; पण पाणी मात्र वेळेवर येत नाही, असा सवाल करताच सर्व अधिकारी निरुत्तर झाले. आंदोलकांना उपायुक्त, जलअभियंता यांनी पाणीपुरवठा सुरळीत करण्याचे लेखी आश्वासन दिले. मात्र, महापौर अश्विनी रामाणे यांनी खराब पाईपलाईन बदलण्याच्या कामाचा श्रीफळ वाढवून प्रारंभ केल्यानंतरच संतप्त महिलांनी हे आंदोलन मागे घेतले. यावेळी प्रभागाचे नगरसेवक अशोक जाधव यांनी यासाठी सात लाख रुपयांचा निधी उपलब्ध करून देत असल्याचे सांगितले.या आंदोलनात कल्पना वावरे, संगीता धामणे, मंगल करपे, वृत्तपत्र विक्रेते शंकर चेचर, अभिजित जाधव, आदींसह महिला मोठ्या संख्येने उपस्थित होत्या. (प्रतिनिधी)अधिकाऱ्यांची महिलांशी चर्चाआंदोलनस्थळी महापालिका पाणीपुरवठा विभागाचे अनेक अधिकारी दाखल झाले. त्यांनी आंदोलन मागे घेण्यासंदर्भात इतर नागरिकांशी चर्चा सुरू केली; मात्र संतप्त महिलांनी पाणी पुरुष भरत नाहीत, महिला भरतात. त्यामुळे महिलांशी चर्चा करा, असा सज्जड दमच दिला. त्यामुळे अधिकाऱ्यांना महिलांशी चर्चा करणे भाग पाडले.