शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War: युद्ध थांबलं? ट्रम्प यांची मोठी घोषणा, पण मोज्तबा खामेनेईंच्या एका वाक्याने पुन्हा खळबळ! म्हणाले..
2
नाशिकचा 'भोंदू' अशोक खरात कोठडीत ढसाढसा रडला; पोलिसांना शाप देणारा बाबा आता नरमला!
3
समरजित घाटगे यांची भाजपात घरवापसी, शरद पवार गटाला धक्का, कागलमधील समीकरणं बदलणार
4
शहबाज शरीफ यांना डच्चू! ट्रम्प यांनी या दोन जणांना केले कॉल? वाचा युद्धविरामापूर्वीच्या फोन कॉलची संपूर्ण 'इनसाईड स्टोरी'
5
"जी व्यक्ती मालिकेतच नव्हती...", 'लक्ष्य'मधून बाहेर काढण्याच्या दिगंबर नाईकांच्या आरोपांवर आदेश बांदेकरांचं उत्तर
6
RBI MPC Meeting Update: रेपो दर 'जैसे थे'; जागतिक अनिश्चिततेदरम्यान रिझर्व्ह बँकेचा सावध पवित्रा
7
SHOCKING! इराण-अमेरिका युद्धातून डोनाल्ड ट्रम्पची दोन्ही मुलंच उकळताहेत प्रचंड पैसा!
8
RR vs MI: मुंबईच्या रणनीतीचा पालापाचोळा! पराभवानंतर जयवर्धने यांनी सांगितलं नेमकं कुठं गणित बिघडलं?
9
शस्त्रसंधी केली तरी ट्रम्प यांची खुर्ची धोक्यात? ८५ खासदारांनी मागितला राजीनामा; विरोध कायम
10
वैभव-यशस्वीने मुंबईला धू धू धुतले, कॅप्टन हार्दिक पांड्याने ‘या’ खेळांडूंवर पराभवाचे खापर फोडले  
11
Mumbai Local: मध्य रेल्वेची कमाल, १६४ कोटी प्रवाशांचा प्रवास; ८.१६ लाख ट्रेन, १ वर्षांत किती सेवा वाढल्या?
12
अमेरिका-इराणमध्ये अखेर तह! ट्रम्प कडाडले, पाकिस्तानने मध्यस्थी केली की चीनने? वाचा काय घडलंय...
13
Palmistry: आत्ताच आपला तळहात तपासा! 'अशी' भाग्यरेषा असणारे लोक होतात प्रचंड श्रीमंत
14
युद्ध थांबलं, सोनं चांदी महागली; Silver मध्ये ११,५६० रुपयांची तर Gold ३,०२७ रुपयांची तेजी; पाहा १८ ते २४ कॅरेटचे दर
15
ट्रम्प झुकले, इराणसमोर सरेंडर केले, युद्धविरामावरून सिनेटर भडकले, अमेरिकेत संतापाची लाट
16
इथे युद्ध थांबलं, तिथे शेअर बाजार सुस्साट... Sensex २६०० अंकांनी वधारला, Nifty मध्ये ७०० अंकांची तेजी
17
अग्रलेख: भाजपला सत्तेपासून दूर ठेवण्यासाठी एकत्र आलेली 'महाविकास आघाडी' संपुष्टात?
18
“शस्त्रसंधी वगैरे काही नाही”; इस्रायलने केले स्पष्ट, अमेरिका-इराण युद्ध खरेच थांबणार का?
19
अमेरिकेने रोखली क्षेपणास्त्रे, इराणही भूमिकेवर ठाम, अखेर ‘या’ देशाची एंट्री, अन् झाला युद्धविराम
20
भय इथले संपत नाही! अमेरिका-इराण शस्त्रसंधी झाली तरी आखाती देश हाय अलर्टवर; तणाव कायम
Daily Top 2Weekly Top 5

लाभार्थ्यांची चौकशी थांबवा

By admin | Updated: January 3, 2015 00:02 IST

तहसील कार्यालय : कागलमध्ये राष्ट्रवादीचा विराट मोर्चा

म्हाकवे : संजय गांधी निराधार, श्रावण बाळ, इंदिरा गांधी राष्ट्रीय वृद्धापकाळ निवृत्ती योजनेतील लाभार्थ्यांची घरोघरी जाऊन सुरू असणारी अन्यायकारक चौकशी थांबवावी, यासाठी कागल तालुका राष्ट्रवादी कॉँग्रेस पक्षाच्यावतीने तहसीलदार कार्यालयावर विराट मोर्चा काढण्यात आला.यावेळी वयोवृद्धांसह पात्र लाभार्थ्यांनी गरिबांची पेन्शन बंद करण्याचा युती शासनासह चौकशीला येणाऱ्या अधिकाऱ्यांचा धिक्कार असो, अशा घोेषणांनी तहसील कार्यालय परिसर दणाणून सोडला.कागल बससस्थानक समोरून या मोर्चास सुरूवात झाली. तहसीलदार कार्यालयामोर हा मोर्चा आल्यानंतर शासनाच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी झाली. तालुक्याच्या कानाकोपऱ्यांत वयोवृद्ध महिलांसह लाभार्थी मोठ्या संख्येने उपस्थित झाले होते.मोर्चाचे नेतृत्व राष्ट्रवादीचे कागल तालुकाध्यक्ष शिवानंद माळी, म्हाकवेकर, नगराध्यक्षा आशाकाकी माने, राष्ट्रवादीचे तालुकाध्यक्ष विकास पाटील, कागल शहराध्यक्ष रघुनाथ जकाते, प्रकाश गाडेकर, रमेश माळी, संजय हेगडे, सूर्यकांत पाटील, पांडुरंग सोनुले, बळवंत माने, आदींनी केले.प्रमुख शिष्टमंडळात तहसीलदार शांताराम सांगडे यांना मागण्यांचे निवेदन दिले आणि चौकशी तत्काळ थांबवण्याची मागणी केली. यावेळी मागणीचा सहानुभूतीपूर्वक विचार करण्याचे आश्वासन तहसीलदार सांगडे यांनी दिले असल्याचे शिवानंद माळी यांनी सांगितले.....तर कार्यालय बंद पाडूकागल तालुक्यातील लाभार्थ्यांची राधानगरी तालुक्यातील अधिकाऱ्यांमार्फत चौकशी केली जात आहे, असा सवाल करत शिवानंद माळी म्हणाले, आमदार मुश्रीफांनी तालुक्यातील हजारो लाभार्थ्यांना योजनेत सहभागी करून लाभ दिला आहे. या पोटशुळातून विरोधकांनी निष्कारण चौकशीचा ससेमिरा गरीब लाभार्थ्यांच्या पाठीमागे लावला आहे. मात्र, एका लाभार्थ्यांची पेन्शन बंद करून दाखवा, तहसीलदार कार्यालय बंद पाडू, असा इशाराही देण्यात आला.... तर मोदींना काळे झेंडे दाखवूगरिबांना मिळणाऱ्या नाममात्र पेन्शनरवही युती शासनाने बंदी घालण्याच्या उद्देशाने लाभार्थ्यांच्या चौकशीचे नाटक केले आहे. ही चौकशी तत्काळ बंद करावी, अन्यथा मंत्र्याना कोल्हापूर बंद करू. तसेच उद्या, शनिवारी कोल्हापुरात येणाऱ्या पंतप्रधान नरेंद्र मोदी व मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना काळे झेंडे दाखवून निषेध व्यक्त करू, असा इशाराही माजी नगराध्यक्ष प्रकाश गाडेकर यांनी दिला.