शहरं
Join us  
Trending Stories
1
समान नागरी संहिता, वन नेशन-वन इलेक्शन हे भाजपचे अजेंडे अद्याप अपूर्ण: पंतप्रधान मोदी
2
आजचे राशीभविष्य, ०७ एप्रिल २०२६: गूढ रहस्यमय विद्येचे आकर्षण राहील; प्रकृती उत्तम राहील
3
राष्ट्र समृद्ध आणि सुरक्षित असेल तरच वैयक्तिक समृद्धी शक्य- सरसंघचालक मोहन भागवत
4
धोक्याची घंटा! एआय डेटा सेंटर्समुळे वाढतोय पृथ्वीचा पारा; कोट्यवधींवर ओढावणार संकट
5
अनिल अंबानी समूहाच्या कर्ज प्रकरणात ७३ हजार कोटी रुपयांचा महाघोटाळा; CBIचा दावा
6
दिल्ली विधानसभेत थरार! कडक सुरक्षा व्यवस्थेला आव्हान देत बॅरिकेड तोडून SUV आत
7
आसाममध्ये हिमंता बिस्वा सरमा सत्ता टिकवणार की, गौरव गोगोई समीकरणे बदलणार?
8
इराणमधील अनेक शहरांवर बॉम्ब हल्ले; शैक्षणिक संस्थाही लक्ष्य, २५ हून अधिक नागरिक ठार
9
आयपीओंचा महापूर, ३८ ‘ड्राफ्ट पेपर’ दाखल! १२४ कंपन्या मुहूर्ताच्या प्रतीक्षेत, गुंतवणूकदारांची चांदी
10
तामिळनाडूमध्ये ७५ टक्के मंत्रिमंडळ भ्रष्टाचाराच्या खाईत अडकलेले : देवेंद्र फडणवीस
11
सोने दीड लाखावर, तरी खरेदी जोरात; आयात तुफान वाढली, भारताला स्वित्झर्लंडच्या सोन्याचा मोह
12
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
13
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
14
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
15
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
16
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
17
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
18
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
19
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
20
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
Daily Top 2Weekly Top 5

इचलकरंजीत रास्ता रोको

By admin | Updated: June 15, 2016 00:08 IST

पाणी प्रश्न : नगरसेविका व त्यांच्या पतीवर गुन्हा; नळपाणी पुरवठ्यासाठी ठिय्या आंदोलन

इचलकरंजी : येथील जवाहरनगर परिसरात आठवडाभर नळाला पाणी आले नसल्यामुळे संतप्त झालेल्या नागरिकांनी मंगळवारी स्टेशन रोडवरील सोनाली हॉटेलसमोर सुमारे दीड तास रास्ता रोको आंदोलन केले. बंदोबस्तासाठी आलेल्या आंदोलकांना नगरपालिकेत जाऊन चर्चा करण्याचे आवाहन पोलिसांनी केले. मात्र, आंदोलक रस्त्यावरच बसून राहिले. त्यामुळे नगरसेविका शकुंतला मुळीक व त्यांचे पती वसंत मुळीक यांच्यासह आठजणांवर शिवाजीनगर पोलिसांनी जमाव बंदी मोडल्याचा गुन्हा नोंद केला आहे.शहरास पाणीपुरवठा करणाऱ्या कृष्णा नळ योजनेला शिरढोण (ता. शिरोळ) येथे व इचलकरंजीतील जलशुद्धिकरण केंद्राजवळ लागलेली गळती दुरुस्त करण्याचे काम दोन दिवस सुरू होते. त्याचा परिणाम म्हणून शहरातील पाणीपुरवठा दोन दिवस खंडित होता. जवाहरनगर परिसरामध्ये गेल्या आठ दिवसांपासून पाणीपुरवठा झाला नाही. त्यामुळे पाणीटंचाईच्या निषेधार्थ त्या परिसरातील नागरिकांनी घागरी घेऊन स्टेशन रोडवर रास्ता रोको केला. त्यामुळे या मार्गावरील वाहतूक ठप्प झाली. शिवाजीनगर पोलिस ठाण्याचे पोलिस निरीक्षक सर्जेराव गायकवाड आंदोलनस्थळी गेले. त्यांनी आंदोलकांना ठिय्या आंदोलन मागे घेऊन नगरपालिकेत जाऊन चर्चा करण्याची विनंती केली. तरीही आंदोलकांनी आपले आंदोलन पुढे चालूच ठेवले. दरम्यान, पाणीपुरवठा विभागाकडील अभियंता बाजी कांबळे घटनास्थळी आले. त्यांनी पाणीपुरवठा पूर्ववत होईल, असे आश्वासन दिले. परंतु, नळाला पाणी आल्याशिवाय आंदोलन संपुष्टात येणार नाही, असे सांगत आंदोलकांनी आपला ठिय्या कायम ठेवला. अखेर पोलिसांनी जमावबंदीचा आदेश मोडल्याबद्दल गुन्हा नोंद करणार असल्याची माहिती दिल्यानंतर आंदोलन संपुष्टात आले.दरम्यान, येथील शिवाजीनगर पोलिस ठाण्यामध्ये नगरसेविका शकुंतला मुळीक, त्यांचे पती वसंत मुळीक, मुलगा सतीश मुळीक, विकास सांगले, मंगल पाटील, सिजाउद्दीन जैनापुरे, आदींवर जमावबंदीचा आदेश मोडून आंदोलन केल्याबद्दल गुन्हा नोंदविला आहे. (प्रतिनिधी)