शहरं
Join us  
Trending Stories
1
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
2
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
3
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
4
IPL New Rule: शिस्त पाळा नाहीतर…आयपीएल दरम्यान BCCI चा कडक नियम; फक्त ५ खेळाडूंनाच बाउंड्रीजवळ परवानगी
5
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
6
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
7
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
8
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
9
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
10
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
11
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
12
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
13
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
14
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
15
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
16
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
17
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
18
"जे काम करतील, तेच..."; कामचुकार पदाधिकाऱ्यांना एकनाथ शिंदेंनी दिली तंबी; बैठकीतील इनसाइड स्टोरी
19
Kalyan Crime: रश्मी म्हणाली, "वेगळं राहू नाही, तर भांडणं सहन कर", जेवणावरून वाद अन् पतीने धावत्या रेल्वेसमोर...
20
"...तर भारत वर्षाला ३०० प्लुटोनियम अणुबॉम्ब बनवेल!"; कलपक्कमच्या यशानं पाकिस्तानच्या पोटात गोळा, फक्त भीतीनंच हादरला
Daily Top 2Weekly Top 5

बेताल आरोप थांबवा... अन्यथा मानहानीचा दावा

By admin | Updated: August 7, 2015 23:33 IST

गडहिंग्लज नगरपालिका : उपनगराध्यक्षांना सत्ताधाऱ्यांचा इशारा

गडहिंग्लज : फुकट प्रसिद्धीसाठी कोणतीही शहानिशा न करता बेताल आरोप करणे थांबवा. अन्यथा, प्रतिष्ठित नगराध्यक्ष व नगरसेवकांच्या मानहानीबद्दल योग्य ती कारवाई केली जाईल, असा इशारा सत्ताधारी जनता दल-जनसुराज्य-कॉंगे्रस आघाडीच्या नगरसेवकांनी राष्ट्रवादीच्या उपनगराध्यक्षा कावेरी चौगुलेंना प्रसिद्धीपत्रकातून दिला आहे.पत्रकात म्हटले आहे, महिन्यापूर्वी जनता दलाच्या राजेश बोरगावे यांची नगराध्यक्षपदी निवड झाली. त्यानंतर त्यांनी कामांचा सपाटा लावल्यामुळे अस्वस्थ झालेल्या राष्ट्रवादीच्या उपनगराध्यक्षांनी त्यांचा वचपा काढण्याचा मनसुबा रचला आहे.जनतेची गर्दी वाढल्यामुळेच खुल्या चर्चेसाठी, विकासासाठी व नागरिकांच्या समस्या सोडविण्यासाठी नगराध्यक्ष दालनाशेजारीच नागरिक व नगरसेवकांच्या बैठकीची व्यवस्था आणि उपनगराध्यक्षांची बैठक व्यवस्था पहिल्या मजल्यावरील तत्कालीन नगराध्यक्ष स्व. पेडणेकर यांनी निवडलेल्या दालनात केली आहे.जनतेची कामे करण्याचा हेतू असल्यास कोणतेही पद आणि बैठक व्यवस्थेची गरज नाही. मात्र, विकासाच्या मुद्द्यावर काम न करता बैठक व्यवस्थेवरून उपनगराध्यक्षा राजकारण करीत आहेत, असा आरोप पत्रकातून करण्यात आला आहे. पत्रकावर, नगराध्यक्ष राजेश बोरगावे, गटनेत्या प्रा. कोरी यांच्यासह सत्ताधारी सर्व नगरसेवकांच्या स्वाक्षऱ्या आहेत....तर ५0 लाखांसाठी काय केले असते?गेल्या नगराध्यक्ष निवडीवेळी ५० लाखांचे आमिष दाखवण्यासाठी आम्ही त्यांच्या माहेरी गेल्याचा त्यांचा हास्यास्पद आरोप आहे. तसे घडले असते, तर साध्या बैठक व्यवस्थेसाठी इतका काहूर माजविणाऱ्या उपनगराध्यक्षांनी काय-काय केले असते? असा टोमणा लगावतानाच बिनबुडाच्या आरोपाबद्दल कायदेशीर पावले उचलली जातील, असा इशारा पत्रकातून देण्यात आला आहे.महिला असल्याचा गैरफायदासर्व नागरिक व नगरसेवकांना चांगली वागणूक देण्याची गडहिंग्लज पालिकेची परंपराच आहे. मात्र, महिला शब्दाचा भांडवल ‘महिला’ असल्याचा गैरफायदा उपनगराध्यक्षा उठवित आहेत, असा पत्रकात आरोप आहे.महिलेच्या अवमानाचा विसर !राष्ट्रवादीच्या कारकिर्दीत नगराध्यक्षपदी महिला असतानाही तत्कालीन विरोधी पक्षनेत्या प्रा. स्वाती कोरी यांची बैठक व्यवस्था स्वच्छतागृहाशेजारीच केली होती. तरीदेखील त्यांनी विनातक्रार काम केले. याचा उपनगराध्यक्षांना सोयीस्कर विसर पडला आहे, असेही पत्रकात म्हटले आहे.