शहरं
Join us  
Trending Stories
1
या देशामध्ये राष्ट्रपतींच्या हत्येचा प्रयत्न, जमावाने कारवर फेकले दगड, केला गोळीबार
2
मनोज जरांगे राहुल गांधींना म्हणाले 'दिल्लीचा लाल्या', काँग्रेसची संतप्त प्रतिक्रिया, पाटलांना दिलं असं नाव  
3
IPS पूरन कुमार यांच्या पत्नीचे गंभीर आरोप, हरियाणाचे DGP आणि SPविरोधात दिली तक्रार   
4
VIDEO: पंतप्रधान मोदी नवी मुंबई विमानतळाच्या उद्घाटनावेळी मराठीत काय बोलले? ऐका...
5
थायलंडमध्ये मसाज घेण्यासाठी जाणं होणार महाग, जाणून घ्यावा हा नियम, अन्यथा ऐनवेळी बसेल भुर्दंड   
6
मुंबईवरील हल्ल्यानंतर कुणाच्या सांगण्यावरून गुडघे टेकले? चिदंबरम यांच्या विधानावरून मोदींनी काँग्रेसला घेरले 
7
रोहित शर्मा पुन्हा बनला कर्णधार, मिळाला नवा 'ओपनिंग पार्टनर'; Playing XI मध्ये आणखी कोण?
8
नवी मुंबई विमानतळाचा उदघाटन सोहळा मंत्री राममोहन नायडूंनी गाजवला, केलं मराठीतून भाषण, म्हणाले... 
9
AUS W vs PAK W : वर्ल्ड चॅम्पियन ऑस्ट्रेलिया टॉपला; पराभवाच्या हॅटट्रिकसह पाकिस्तान रसातळाला!
10
VIDEO: शत्रूवरही अशी वेळ नको रे देवा... नवरदेवाची भर लग्नमंडपात होणाऱ्या बायकोसमोर 'फजिती'
11
"त्या सरकारनं 'हे' कामच थांबवलं होतं, हे एखाद्या पापापेक्षा कमी नाही!", PM मोदी 'ठाकरे' सरकारवर बरसले
12
सैराटची पुनरावृत्ती! पाच भावांनी मिळून केली बहीण आणि भाओजींची हत्या, घरी बोलावले आणि...  
13
‘मेस्मा’ लागू, सात वीज कर्मचारी संघटनांचा संप बेकायदेशीर
14
Beth Mooney Incredible Hundred : अविस्मरणीय सेंच्युरी! पाक संघाला रडवणारी 'रन'रागिणी ठरली बेथ मूनी
15
नवी मुंबई विमानतळ प्रवाशांच्या सेवेत! कधीपासून उड्डाणे सुरू होणार? कुठे-कुठे जाता येणार?
16
नवी मुंबई विमानतळ आशियातील सर्वात मोठे 'कनेक्टिव्हिटी हब' बनणार; पंतप्रधान मोदींना विश्वास
17
तुमच्या आयफोनची चार्जिंग लवकर संपतेय? बॅटरी लाईफ वाढवण्यासाठी 'या' टिप्स वापरा!
18
"तडजोड कर नाहीतर तुझीच बदनामी होईल"; छेडछाड करणाऱ्यालाच पीडितेच्या घरी घेऊन गेले पोलीस!
19
Cough Syrup : "डॉक्टरवर चुकीचा..."; कफ सिरप मृत्यू प्रकरणी मेडिकल असोसिएशनच्या सरकारकडे मोठ्या मागण्या
20
नवी मुंबई विमानतळाचे उद्घाटन होताच CM फडणवीसांची मोठी घोषणा, म्हणाले, “आता चौथी मुंबई...”

महाविद्यालयांचा जातीय कारभार थांबवा

By admin | Updated: January 14, 2016 00:23 IST

आंबेडकरी संघटनांचे जनआंदोलन : मागासवर्गीय प्राध्यापक, कर्मचाऱ्यांच्या प्रश्नांवर चर्चा

कोल्हापूर : शिवाजी विद्यापीठ कार्यक्षेत्रातील महाविद्यालयांमध्ये मागासवर्गीय प्राध्यापक, कर्मचारी यांचे विविध गंभीर प्रश्न निर्माण झाले आहेत. त्यांच्यावरील अन्याय आणि या महाविद्यालयांमधील जातीय कारभार थांबवा, अशी मागणी विविध आंबेडकरी समाज, पक्ष, संघटना व जनआंदोलनाच्या शिष्टमंडळाने बुधवारी कुलगुरू डॉ. देवानंद शिंदे यांच्याकडे केली. यावेळी शिष्टमंडळाने दोन तास १९ मागण्यांबाबत डॉ. शिंदे यांच्याशी चर्चा केली. मागण्यांबाबत विद्यापीठ प्रशासनाने एका महिन्यात कार्यवाही करावी अन्यथा तीव्र आंदोलन करण्यात येईल, असा इशारा दिला. जनआंदोलनाचे शिष्टमंडळ व कुलगुरू डॉ. शिंदे, प्रभारी कुलसचिव डॉ. व्ही. एन. शिंदे, बीसीयूडी संचालक डॉ. डी. आर. मोरे यांच्यातील चर्चा दुपारी तीनच्या सुमारास सुरू झाली. यात प्रारंभी शिष्टमंडळातर्फे रिपब्लिकन पार्टी आॅफ इंडियाचे (ए) पश्चिम महाराष्ट्र अध्यक्ष प्रा. शहाजी कांबळे यांच्या हस्ते विविध मागण्यांचे निवेदन कुलगुरू डॉ. शिंदे यांना देण्यात आले. यावेळी रिपब्लिकन पार्टी आॅफ इंडियाचे (जी) चे जिल्हाध्यक्ष प्रा. विश्वासराव देशमुख, विजय काळेबाग, आदी उपस्थित होते. यानंतर प्रा. शहाजी कांबळे म्हणाले, काही महाविद्यालयांचे प्राचार्य, संस्थाचालकांकडून मागासवर्गीय प्राध्यापक, कर्मचारी यांना विविध स्वरूपातील त्रास दिला जात आहे. संंबंधित अन्याय व जातीय कारभार थांबविण्यासाठी विद्यापीठाने अधिसत्तेने हस्तक्षेप करून योग्य ती कारवाई करावी. प्रा. देशमुख म्हणाले, मागासवर्गीय प्राध्यापक, कर्मचाऱ्यांवरील अन्याय होणे हे गंभीर आहे. याबाबतच्या तक्रारींबाबत लक्ष देऊन संबंधितांना न्याय देण्याचे काम विद्यापीठाने लवकर करावे. बैठकीत विविध १९ मागण्यांनिहाय चर्चा करण्यात आली. यातील काही मागण्यांबाबत कुलगुरू डॉ. शिंदे यांनी सकारात्मक कार्यवाहीची ग्वाही दिली. शिवाय मागण्यांच्या अनुषंगाने विद्यापीठाकडून होणाऱ्या कार्यवाहीची माहिती दिली जाईल असे सांगितले. दरम्यान, मागण्यांबाबत कुलगुरू डॉ. शिंदे यांनी शिष्टमंडळाशी सकारात्मक चर्चा केली. जनआंदोलनाने संबंधित मागण्यांच्या अनुषंगाने सकारात्मक कार्यवाही करण्याबाबत विद्यापीठ प्रशासनाला एक महिन्यांचा कालावधी दिला आहे. या कालावधीत कार्यवाही न झाल्यास् तीव्र आंदोलन करण्याचा इशारा दिला असल्याचे प्रा. शहाजी कांबळे यांनी सांगितले. बैठकीस प्रा. राजरतन जाधव, विकास क्षीरसागर, जी. बी. अंबपकर, ब्लॅक पँथरचे सुभाष देसाई, लोकजनशक्ती पार्टीचे बाळासाहेब भोसले, बहुजन रयत पार्टीचे दिलीप मोहिते, पिपल्स् रिपब्लिकन पार्टीचे सोमनाथ घोडेराव, समता प्रबोधिनीचे वसंत लिंगनूरकर, फास्टाचे जिल्हाध्यक्ष एम. ए. कांबळे, महिला अन्याय निवारण समितीच्या रूपाताई वायदंडे, निर्मलाताई धनवडे, स्वप्निल कांबळे, प्रताप नागवंशी, संभाजी कागलकर, जेलित कांबळे, सर्जेराव पदमाकर, बबन कांबळे, भीमराव कांबळे, आर. जी. कांबळे, सतीश राठोड, मधुकर धत्तुरे, डॉ. प्रविण कोडोलीकर उपस्थित होते.