शहरं
Join us  
Trending Stories
1
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
2
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
3
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
4
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
5
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
6
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
7
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
8
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
9
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
10
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
11
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
12
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
13
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
14
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
15
"जे काम करतील, तेच..."; कामचुकार पदाधिकाऱ्यांना एकनाथ शिंदेंनी दिली तंबी; बैठकीतील इनसाइड स्टोरी
16
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
17
Kalyan Crime: रश्मी म्हणाली, "वेगळं राहू नाही, तर भांडणं सहन कर", जेवणावरून वाद अन् पतीने धावत्या रेल्वेसमोर...
18
"...तर भारत वर्षाला ३०० प्लुटोनियम अणुबॉम्ब बनवेल!"; कलपक्कमच्या यशानं पाकिस्तानच्या पोटात गोळा, फक्त भीतीनंच हादरला
19
"जे काम भारताने करायला हवे होते, ते दहशतवाद पसरवणाऱ्या देशाने केले..."; मोदी सरकारवर ओवेसींचा निशाणा
20
अमेरिकेवर विश्वास नाही, रशिया-चीनने सुरक्षेची हमी द्यावी; इराणची मोठी मागणी...
Daily Top 2Weekly Top 5

अयोध्या टॉवरमध्ये सहा ठिकाणी चोरी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 31, 2017 16:29 IST

कोल्हापूर : दाभोळकर कॉर्नर येथील अयोध्या टॉवर मध्ये कडी-कोयंडा उचकटून तीन खासगी कार्यालय व तीन फ्लॅट अशा एकूण सहा ठिकाणी चोरी झाल्याची घटना गुरुवारी सकाळी उघडकीस आली. पण, यावेळी चोरट्यांच्या हाती फारसे काही लागले नसल्याचे समजते. ही घटना समजताच शाहूपुरी पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. या टॉवरमधील फ्लॅटमधील रहिवाशी गणेशोत्सवासाठी बाहेरगावी गेल्यामुळे नेमकी किती रक्कमेची चोरी झाली हे, समजू शकले नाही.

ठळक मुद्देगणेशोत्सवात चोरट्यांनी साधला डावफ्लॅटमधील रहिवाशी गणेशोत्सवासाठी बाहेरगावी किती रक्कमेची चोरी झाली समजू शकले नाहीमहाडिक कॉलनीत चोरीचा प्रयत्न...

कोल्हापूर : दाभोळकर कॉर्नर येथील अयोध्या टॉवर मध्ये कडी-कोयंडा उचकटून तीन खासगी कार्यालय व तीन फ्लॅट अशा एकूण सहा ठिकाणी चोरी झाल्याची घटना गुरुवारी सकाळी उघडकीस आली. पण, यावेळी चोरट्यांच्या हाती फारसे काही लागले नसल्याचे समजते. ही घटना समजताच शाहूपुरी पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. या टॉवरमधील फ्लॅटमधील रहिवाशी गणेशोत्सवासाठी बाहेरगावी गेल्यामुळे नेमकी किती रक्कमेची चोरी झाली हे, समजू शकले नाही.घटनास्थळावरुन मिळालेली माहिती अशी की, अयोध्या टॉवर येथे इमारत क्रमांक चार मधील ए-१०२ मध्ये सेवानिवृत्त शिक्षक बी. एम. घाटगे यांचा फ्लॅट आहे. ते येथे पत्नीसमवेत राहतात. गणेशोत्सवामुळे ते बेळगांव जिल्ह्यातील जनवाड (ता. चिकोडी) येथे आपल्या मूळ गांवी पत्नीसमवेत गेले आहेत.त्याचा फायदा घेत चोरट्यांनी त्यांच्या फ्लॅटच्या दरवाजाची कडी-कोयंडा उचकटून आणि लोखंडी शटर तोडून फ्लॅटमधील कपाट फोडले. त्यातील काय साहित्य चोरट्यांनी लंपास केले, हे समजू शकले नाही.दरम्यान, शेजारीच असलेल्या ए-१०१ मध्ये सांगली येथील सम्यक कबुरे हे एकटे राहतात. गणेशोत्सवानिमित्त ते घरी गेले आहेत. त्यांच्या घरातही चोरी झाली आहे. याच अपार्टमेंटमधील बी-२०३ मध्ये एका वृत्तवाहिनीचे कार्यालय आहे. या कार्यालयातील साहित्यही विस्कटले आहे. पण, याठिकाणी चोरट्यांचे हाती काही लागले नाही. त्याच्या शेजारी बी-२०४ एम. के.देशिंगकर यांचे ‘टॅक्स कन्सलटंट’ चे कार्यालय आहे. येथेही चोरट्यांच्या हाती काही लागले नाही. शेजारील असलेल्या इमारत क्रमांक -३ मधील पहिल्या मजल्यावर कॉन्ट्रक्टर राजू इनामदार यांचे ए-४ कार्यालय आहे. येथेही चोरट्यांना काही मिळाले नाही. तसेच ए-२ मध्ये नेवाळकर यांनी केतन देसाई यांना फ्लॅट भाड्याने दिला आहे. देसाई यांच्या घरातील साहित्य चोरट्यांनी विस्कटले आहे.महाडिक कॉलनीत चोरीचा प्रयत्न...रुईकर कॉलनीतील महाडिक कॉलनीमध्ये दोन ठिकाणी फ्लॅट फोडण्याचा प्रयत्न गुरुवारी उघडकीस आला.अयोध्या टॉवर मधील घटनेपाठोपाठ महाडिक कॉलनीतील फ्लॅट फोडल्याचा प्रयत्न झाल्याने शाहूपुरी पोलिसांची चांगलीच तारांबळ उडाली.अयोध्या टॉवरमधील या फ्लॅटमध्ये सध्या कोणी रहावयास नाही आहे. त्यामुळे याबाबतची चोरीची फिर्याद गुरुवारी दूपारपर्यंत आली नव्हती. त्यामुळे नेमकी किती रुपयांची चोरी झाली हे समजू शकले नाही.-संजय मोरे,पोलीस निरीक्षक, शाहूपुरी पोलिस ठाणे, कोल्हापूर.