शहरं
Join us  
Trending Stories
1
Uddhav Thackeray : "महाराष्ट्राच्या मनात जे आहे ते होईल, लवकरच..."; 'मनसे'सोबतच्या युतीवर उद्धव ठाकरेंचं मोठं विधान
2
"साहेब, परप्रांतियांची दादागिरी वाढली, ठाकरे ब्रँड टिकला पाहिजे", कार्यकर्त्यांची 'मनसे' भावना; राज ठाकरे काय म्हणाले?
3
मनात आले तर डोनाल्ड ट्रम्प मस्कना अमेरिकेबाहेरही घालवू शकतात? बड्या हस्तीने वर्मावर बोट ठेवले...
4
प्रामाणिकपणा काय असतो? ते या डॉगीकडून शिका! जीवाची पर्वा न करता मालकाच्या मुलाला वाचवलं; सापानं अनेक वेळा घेतला चावा, पण... 
5
ट्रम्प आणि मस्क यांच्यात वाद; Tesla चे शेअर्स जोरदार आपटले, १५२ अब्ज डॉलर्स बुडाले
6
Video : गर्लफ्रेंडसोबत रोमान्स करत होता नवरा, अचानक झाली बायकोची एन्ट्री! पुढे काय झालं बघाच
7
RCB चेंगराचेंगरी प्रकरणात पहिली अटक; कोण आहे न‍िख‍िल सोसाले? त्या घटनेत महत्वाची भूमिका
8
सदाशिव अमरापूरकर यांच्या मुलीने गाजवलंय बॉलिवूड! रितेश देशमुखसोबत 'या' सिनेमासाठी केलंय काम
9
"तो बागेत फिरायला गेलाय"... रोहित शर्मासंदर्भातील प्रश्न अन् पंतला आठवला हिटमॅनचा फेमस डायलॉग
10
“उद्धव यांनी एक फोन करावा, राज ठाकरे १०० पावले पुढे येतील, पण...”; मनसेची स्पष्ट भूमिका
11
IND vs ENG: आता रंगणार कसोटी मालिकेचा थरार! शुभमन गिलच्या नेतृत्वाखाली टीम इंडिया इंग्लंडला रवाना
12
"अमावस्येला नारळ चुकला अन्...", ऋतुजा बागवेने सांगितला भयावह अनुभव
13
विजय मल्ल्याच्या लेकासोबत होतं दीपिकाचं अफेअर; अभिनेत्रीला ताज हॉटेलमध्ये घेऊन गेला अन्...
14
ऐतिहासिक! १३४ वर्षांनी स्वप्नपूर्ती; PM मोदींनी श्रीनगर वंदे भारत ट्रेनला दाखवला हिरवा झेंडा
15
Corona Virus : सावधान! कोरोना वाढवतोय टेन्शन; १५ दिवसांत २० पटीने वाढली एक्टिव्ह रुग्णांची संख्या
16
NEET-PG Exam Date: अखेर नीट पीजी परीक्षेची तारीख निश्चित, सर्वोच्च न्यायालयाने NBEला दिली परवानगी
17
आधी घाबरवलं, मग जज बनून व्हिडीओ कॉल केला, विलेपार्ल्यातील महिलेच्या खात्यातून चोरट्यांनी उडवले 'इतके' कोटी!
18
जमिनीचे आरक्षण रद्द करून मुलाच्या मद्यउद्योगाला जागा; इम्तियाज जलीलांचा शिरसाटांवर आरोप
19
Vijay Mallya: "मी प्रणव मुखर्जींकडे गेलो होतो..," बँक कर्जावर विजय मल्ल्याचा मोठा दावा
20
“दोन शिवराज्याभिषेक सोहळे होताच कामा नयेत, तुम्हाला जनतेला एक होऊ द्यायचे नाही”: मनोज जरांगे

औषधांचा साठा जप्त

By admin | Updated: August 24, 2016 00:24 IST

वाई हत्याकांड : घोटवडेकर रुग्णालयाची कसून तपासणी; फार्म हाऊसचीही घेतली पुन्हा झडती

वाई : कोल्ड ब्लडेड सीरियल किलर संतोष पोळच्या धक्कादायक खून सत्रात गाजत असलेल्या वाईच्या घोटवडेकर हॉस्पिटलची मंगळवारी सलग पाच तास पोलिसांनी कसून चौकशी केली. पंचनाम्यात आढळून आलेल्या अनेक आक्षेपार्ह वस्तू जप्तही करण्यात आल्या असून, यात काही वैद्यकीय फायली आणि औषधांचा साठा आहे.पोलिसांनी दुपारी सर्वप्रथम संतोष पोळ व ज्योती मांढरेला पुन्हा धोम येथील फार्म हाऊसवर नेऊन तपासणी केली़ त्यानंतर हे पथक पुन्हा वाईत आले. सायंकाळी चार ते रात्री उशिरापर्यंत या रुग्णालयातील संशयास्पद वस्तूंचा पंचनामा करण्यात आला.हे रुग्णालय पहिल्यापासूनच चर्चेत असून, प्रकरण उघडकीस आल्यापासून दुसऱ्यांदा पोलिसांनी या ठिकाणी चौकशी केली आहे. हे रुग्णालय संतोष पोळने केलेल्या खून सत्राचे केंद्रबिंदू ठरले आहे. त्यामुळे पोलिसांनी मंगळवारी दुपारी संतोष आणि ज्योती या दोघांनाही घेऊन घोटवडेकर रुग्णालयाची तपासणी केली. यावेळी पोलिसांना मोठ्या प्रमाणात संशयास्पद औषधांचा साठा सापडला. तसेच ‘संचित’ अतिदक्षता विभागातही पोलिसांनी कसून तपासणी केली असून, हा विभाग सील करण्याच्या दृष्टीने पोलिस चाचपणीही करत आहेत. स्थानिक गुन्हे शाखेचे अधिकारी व कर्मचारी तसेच वाई पोलिस ठाण्याचे अधिकारी व कर्मचारी मिळून पंधरा जणांचे पथक मंगळवारी सायंकाळी चार वाजता वाईतील घोटवडेकर हॉस्पिटलमध्ये दाखल झाले. यावेळी जिल्हा पोलिस अधीक्षक संदीप पाटील वाई पोलिस ठाण्यात ठाण मांडून होते. हॉस्पिटल, अतिदक्षता विभाग व मेडिकल स्टोअरची पोलिसांनी कसून तपासणी केली़ ही तपासणी सुरू असताना परिसरात बघ्यांनी मोठी गर्दी झाली होती़ गूढ उकलणार !घोटवडेकर रुग्णालयामध्ये वॉर्डबॉयचा संशयास्पद मृत्यू झाला होता. त्या अनुषंगानेही पोलिसांनी तपास सुरू केला असून, फार पूर्वीपासून रुग्णालयात असणारी काही महत्त्वाची कागदपत्रेही पोलिसांनी जप्त केली आहेत. त्यामुळे वॉर्डबॉयच्या संशयास्पद मृत्यूचे गूढ उकलण्याची शक्यता आहे.रुग्णवाहिका वाई ठाण्यातसंतोष पोळने विविध गुन्ह्यांत वापरलेली व तपासाच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाची असणारी रुग्णवाहिका आठ दिवसांपूर्वी मुंबई येथे पोलिसांनी जप्त केली होती. ही रुग्णवाहिका हस्तांतराची प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर वाई पोलिस ठाण्यात मंगळवारी आणण्यात आली.स्थानिक गुन्हे शाखेने संतोष पोळला वाई पोलिसांच्या ताब्यात दिले आहे. मात्र, वाईमध्ये आरोपींना ठेवण्यासाठी सध्या जागा नसल्याने सर्व आरोपींना साताऱ्यातच ठेवले जाते. त्यामुळे संतोष पोळलाही साताऱ्यातच कोठडीत ठेवले जाईल. - विनायक वेताळ, पोलिस निरीक्षक, वाई