शहरं
Join us  
Trending Stories
1
“इराणच्या १० कलमी प्रस्तावाला ट्रम्प यांनी दाखवली केराची टोपली”; व्हाइट हाऊसने सगळे सांगितले
2
Gold Silver Price Today: बाजार उघडताच सोन्या-चांदीच्या दरात मोठी घसरण; Silver ₹४,७०० नं स्वस्त, Gold चे दर काय?
3
केजचे तहसीलदार राकेश गिड्डे यांचा अपघाती अंत; कार्यक्षम अधिकाऱ्याच्या मृत्यूने बीड जिल्हा सुन्न!
4
३९ दिवसांच्या युद्धानंतर इराण, अमेरिका, इस्रायल... कुणी काय कमावले, काय गमावले?
5
STतील सफाईचा प्रवाशांना भूर्दंड; आधी दरवाढ केली, आता ‘स्वच्छता अधिभार’ लावला, प्रवास महागला
6
Post Office च्या 'या' स्कीममध्ये व्याजाद्वारेच मिळतील ४.४० लाख; ३०० रुपयांच्या बचतीतून तयार होईल १५ लाखांचा फंड
7
Share Market: शेअर बाजारात घसरण: सेन्सेक्स ५०० हून अधिक अंकांनी घसरला, निफ्टी २३,९०० च्या खाली
8
नाशिकमध्ये नामांकित कंपनीतील ८ जणींचा विनयभंग; एकीवर 'अतिप्रसंग'; ६ जणांना अटक
9
एक डॉलर प्रति बॅरल, त्यासोबत..., होर्मुझवरील टोलसाठी इराणने तयार केला असा नियम   
10
आजचे राशीभविष्य, ०९ एप्रिल २०२६: योग्य क्षेत्रातील गुंतवणूक आज लाभदायक; रागावर नियंत्रण ठेवावं लागेल
11
पाकला बळीचा बकरा बनवले, इराणला राजी करायला भाग पाडले, ट्रम्प यांनाच हवा होता युद्धविराम?
12
NATO देशांना ट्रम्प यांनी सुनावले, मदत न केल्याने व्यक्त केली तीव्र खंत; इशारा देत म्हणाले...
13
राज्य निर्मितीआधीपासूनच मराठा आरक्षण; उच्च न्यायालयात राज्य सरकारचा युक्तिवाद
14
१० मिनिटं, १०० ठिकाणं अन् १६० बॉम्ब; लेबनॉनवर इस्रायलचा सर्वात मोठा हल्ला; बेरूतमध्ये रक्ताचा सडा
15
शस्त्रसंधीमुळे अदानी-अंबानींवर डॉलर्सचा पाऊस; जगातील श्रीमंतांच्या यादीत स्थान वधारले
16
युद्ध की शांतता? अमेरिकेला काहीतरी एक निवडावं लागेल, इराणचा थेट इशारा; लेबनॉनवरून पेच वाढला!
17
अजूनही ५०% जुन्या वाहनांना HSRP नंबर प्लेट नाही; कालमर्यादेबाबत स्पष्टता नसल्याने अनेकांची पाठ
18
एलिफंटा उत्खननात दोन विशाल साठवण भांड्यांचा शोध; ऐतिहासिक महत्त्वात भर
19
शिखर बँक घोटाळा: रोहित पवारांच्या अर्जावर गुणवत्तेनुसार निर्णय घ्या! EDची विशेष न्यायालयाला विनंती
20
१२,३०० हल्ल्यांनंतरही इराणची ताकद कायम कशी? 'ही' आहेत यामागची कारणं
Daily Top 2Weekly Top 5

अद्याप ५०० रोजंदारी कर्मचारी अधांतरीच

By admin | Updated: November 5, 2014 00:30 IST

न्याय देण्याची मागणी : शुक्रवारच्या सर्वसाधारण सभेत वादळी चर्चेची शक्यता

संतोष पाटील - कोल्हापूर -न्यायालयाच्या दणक्यामुळे महापालिका प्रशासनाने १५३ कर्मचाऱ्यांना कायम नेमणुकीची पत्रे दिली. ३१४ रोजंदारी कर्मचाऱ्यांनी त्यासाठी कामगार न्यायालयात धाव घेतली होती. मात्र, मनपा प्रशासनावर विश्वास ठेवून ३५०हून अधिक रोजंदारी कर्मचारी न्यायालयात गेले नाहीत. आता या सर्वच ५०० पेक्षा अधिक रोजंदारी कर्मचाऱ्यांना प्रशासन कधी न्याय देणार, असा सवाल उपस्थित केला जात आहे.महापालिका कर्मचारी संघाने ३१४ रोजंदारी कर्मचाऱ्यांना कायम सेवेत घ्या, या मागणीसाठी २८ जून २००४ रोजी कामगार न्यायालयात दाद मागितली होती. २ फेबु्रवारी २०११ रोजी कामगार न्यायालयाने ३१४ कर्मचाऱ्यांना कायम करण्याचे आदेश महापालिकेला दिले. या निकालाविरोधात उच्च न्यायालयातील महापालिकेचा दावा १० एप्रिल २०१२ रोजी फेटाळला गेला. ३१४ पैकी अद्याप १५३ कर्मचाऱ्यांना कायम सेवेत घेतले. कामगार न्यायालयाने दिलेल्या आदेशानुसार २००४ पासूनचा वेतनफरक देऊन निवृत्तिवेतन योजनेसह कायम आदेश द्या, अशी कर्मचाऱ्यांची मागणी आर्थिक भार सोसणार नसल्याने आयुक्तांनी फेटाळली होती. तत्कालीन महापौर सुनीता राऊत यांनी मध्यस्थी करून ५ फेब्रुवारी २०१४ रोजी बैठक घेऊन याबाबत तोडगा काढण्याचा प्रयत्न केला. यानंतर न्यायालयाच्या निर्णयानंतर महापालिकेकडे १४ वर्षांपासून रोजंदारीवर काम करणाऱ्या १५३ कर्मचाऱ्यांना कायम करण्याचा निर्णय स्थायी समितीने घेतला. या सर्व कर्मचाऱ्यांना २०११ पासूनच्या फरकाची रक्कम देऊ न सोमवारी (दि. ३) नेमणूकपत्रे देण्यात आली. या निर्णयाच्या आधारे इतरही रोजंदारी कर्मचाऱ्यांना स्थायी समितीच्या निर्णयाच्या आधारे न्यायालयात कायम करण्याबाबत आदेश आणणे सोपे होणार आहे. या दृष्टीनेही इतर रोजंदारी कर्मचाऱ्यांनी प्रयत्न सुरू केले आहेत. मात्र, प्रशासनावर विश्वास ठेवून न्यायालयात न गेलेल्या रोजंदारी कर्मचाऱ्यांनाही न्याय मिळावा, अशी मागणी जोर धरू लागली आहे. शुक्रवारच्या सभेत चर्चा होणारन्यायालयाच्या आदेशाप्रमाणे १५३ रोजंदारी कर्मचाऱ्यांना कायम सेवेत घेत असतानाच २००० सालापूर्वी सेवेत असलेल्या इतर कर्मचाऱ्यांना हाच न्याय लावत कायम करण्याचा निर्णय २८ जुलै २०१४ च्या सर्वसाधारण सभेत घेण्यात आला होता. आता शुक्रवारी (दि.७) होणाऱ्या सर्वसाधारण सभेत या उर्वरित रोजंदारी कर्मचाऱ्यांना कायम सेवेत घेण्याबाबतचा विषय पुन्हा चर्चेसाठी घेतला आहे. मनपाची आर्थिक स्थिती चांगली नाही. तरीही याबाबत सकारात्मक निर्णय होण्यासाठी प्रयत्न करू. - राजेश लाटकर, गटनेता