शहरं
Join us  
Trending Stories
1
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
2
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
3
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
4
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
5
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
6
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
7
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
8
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
9
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
10
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
11
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलरचा ट्रेंड; ब्लू, रेड, गोल्डन केसांवरुन जाणून घ्या व्यक्तिमत्वाचं रहस्य
12
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
13
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
14
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
15
सख्ख्या आतेभावानेच बहिणीवर केला अत्याचार; नराधम मुलाला धडा शिकवण्यासाठी आईनेच गाठले पोलीस स्टेशन
16
भूमिपूजन झालं, पण 'पॉड टॅक्सी' नेमकी असणार तरी कशी? फायदा काय? इत्थंभूत माहिती समजून घ्या २ मिनिटांत!
17
"मीरा भाईंदरला ३० टक्के जागा मेहतांच्या मालकीची, १० टक्के..."; मेट्रो उद्घाटनात रंगला संवाद
18
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
19
धोक्याची घंटा! तुम्हीही जेवताना फोन वापरताय? एका चुकीमुळे आतड्यांचं होतं गंभीर नुकसान
20
Travel : हिमालयातील निळ्याशार पाण्याचा स्वर्ग! 'चंद्रताल'ला जाण्याचा प्लॅन करताय तर 'हे' नक्की वाचा
Daily Top 2Weekly Top 5

वाडेंना पायघड्या; हाळवणकर वाऱ्यावर जिल्ह्यातून हद्द

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 8, 2021 05:16 IST

इचलकरंजीतील दोघांच्या कार्यकर्त्यांत संभ्रम अतुल आंबी लोकमत न्यूज नेटवर्क इचलकरंजी : विधानसभेचे विरोधी पक्षनेते तथा राज्याचे माजी मुख्यमंत्री देवेंद्र ...

इचलकरंजीतील दोघांच्या कार्यकर्त्यांत संभ्रम

अतुल आंबी

लोकमत न्यूज नेटवर्क

इचलकरंजी : विधानसभेचे विरोधी पक्षनेते तथा राज्याचे माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या आवाडे भेटीनंतर राजकीय हालचाली गतिमान झाल्या आहेत. त्यातून विद्यार्थिदशेपासून भाजपसोबत निष्ठावंत असलेले माजी आमदार सुरेश हाळवणकर यांना पक्षाकडून वाऱ्यावर सोडले जात असल्याची भावना कार्यकर्त्यांतून व्यक्त होत आहे. त्यामुळे हाळवणकरांना आता अस्तित्वासाठी संघर्ष करावा लागणार आहे.

गतवर्षी झालेल्या विधानसभा निवडणुकीपूर्वीपासूनच आमदार प्रकाश आवाडे निवडून आल्यानंतर भाजपमध्ये जाणार, अशी चर्चा सुरू होती. त्यावर प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांच्याकडून कार्यकर्त्यांचा अग्रसेन भवन येथे मेळावा घेऊन सारवासारव करण्यात आली. त्यावेळी त्यांनी कार्यकर्त्यांनी ‘‘घोडा गिळल्याची कथा’’ सांगून तो घोडा पोटातून बाहेर काढण्यासाठी मी आलो असल्याचे स्पष्ट केले होते, परंतु त्यावेळची चर्चाच सत्यात उतरली आणि आवाडे यांनी निवडून आल्यानंतर भाजपला पाठिंब्याचे पत्र दिले.

या घडामोडींनंतरही हाळवणकरांच्या कार्यकर्त्यांची समझोता एक्स्प्रेस थोड्याफार प्रमाणात सुरळीत चाललेली ती गाडी आता घसरू लागली आहे. फडणवीस यांनी इचलकरंजीत येऊन आमदार आवाडे यांची त्यांच्या निवासस्थानी जाऊन भेट घेतली. त्यावेळी पत्रकारांशी बोलताना आवाडे यांच्या अधिकृत प्रवेशाबाबत तांत्रिक अडचण असल्याचे बोलून दाखविले होते. ही तांत्रिक अडचण म्हणजे हाळवणकर असल्याची चर्चा कार्यकर्त्यांत जोर धरली आहे. त्यावेळी फडणवीस यांनी हाळवणकर यांच्या घरीही भेट दिली, परंतु कोणतीही राजकीय चर्चा केली नाही. त्यांच्यासोबत कार्यकर्त्यांच्या पोटातून ‘‘घोडा’’ बाहेर काढणारे चंद्रकांत पाटील हेही होते. त्यांनी देखील खूप वेळ झाला असल्याचे सांगून बोलणे टाळले. या संपूर्ण घडामोडींमुळे हाळवणकरांना पक्षातून डावलले जात असल्याची भावना कार्यकर्त्यांतून व्यक्त होत आहे.

चौकट

आवाडेंना दोन्ही पक्षांत मागणी

आमदार प्रकाश आवाडे यांची राजकीय कारकीर्द, अनुभव व पकड यामुळे कॉँग्रेसमध्ये परत आणण्याची जबाबदारी पालकमंत्री सतेज पाटील यांनी पी. एन. पाटील यांच्याकडे सोपविल्याचे सांगितले होते. त्यामुळे त्यांना दोन्ही पक्षांत घेण्यासाठी पायघड्या घालून रस्सीखेच सुरू आहे. त्यामुळे त्यांच्या कार्यकर्त्यांतही उत्साही वातावरण आहे.