शहरं
Join us  
Trending Stories
1
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
2
"...तर भारत वर्षाला ३०० प्लुटोनियम अणुबॉम्ब बनवेल!"; कलपक्कमच्या यशानं पाकिस्तानच्या पोटात गोळा, फक्त भीतीनंच हादरला
3
"जे काम भारताने करायला हवे होते, ते दहशतवाद पसरवणाऱ्या देशाने केले..."; मोदी सरकारवर ओवेसींचा निशाणा
4
अमेरिकेवर विश्वास नाही, रशिया-चीनने सुरक्षेची हमी द्यावी; इराणची मोठी मागणी...
5
अमेरिका-इराण युद्धात सहभागी न होताच एका मुस्लीम देशाचा झाला तगडा फायदा; कमावणार पैसाच पैसा
6
"डोनाल्ड ट्रम्प असे व्यक्ती नाहीत ज्यांच्याशी...!"; शस्त्रसंधीनंतर काही तासांतच अमेरिकेचा इराणला इशारा, तणाव कायम
7
"अशोक खरातसोबत असलेली कोणती महिला बेशुद्ध वाटते?", शर्मिला ठाकरे संतापल्या, महिलांना सुनावले
8
Jasprit Bumrah Unwanted Records : बुमराहच्या नावे लाजिरवाणी 'हॅटट्रिक'! ८ वर्षांनी आली 'ही' वेळ
9
अमेरिका, इस्रायलचे हल्ले सुरु झाले, इराणमध्ये ३००० भारतीय विद्यार्थी होते...; भारतातील राजदुतांनी पै-पाहुण्यांना, ओळखीच्यांना फोन करायला सुरुवात केली...
10
अमेरिका-इराण युद्धविरामानंतर केंद्र सरकारचा मोठा निर्णय; LPG पुरवठ्याबाबत नवा फॉर्म्युला तयार
11
ही कसली सीझफायर? लावन रिफायनरीनंतर सिर्री बेटही स्फोटांनी हादरले; तेलाच्या साठ्यांवर हल्ले?
12
आगीतून फुफाट्यात! बाईक चोरली अन् ट्रॅफिक नियमही मोडला; चोराचा फोटो पोहोचला मालकाच्या मोबाईलवर
13
Tech Tips: कोणालाही न कळता कॉल रेकॉर्डिंग कसे करावे? ९९% लोकांना माहित नाही ही सोपी ट्रिक!
14
इराणसोबत युद्धविराम करून ट्रम्प यांनी युद्धातून अंग काढले; आता इस्रायलला चुकवावी लागणार किंमत
15
Health Tips: लघवीला दुर्गंधी म्हणजे केवळ उष्णता नव्हे, तुमच्या शरीराने दिलेला 'हा' गंभीर इशारा असू शकतो!
16
इराणसोबत धोका? सीझफायरनंतर काही तासांतच लावन बेटावरील तेल रिफायनरीमध्ये भीषण स्फोट, जगाचे कान टवकारले...
17
'स्ट्रेट ऑफ होर्मुझ'मध्ये ट्रॅफिकजाम; युद्धविरामानंतरही १०००+ जहाजे अडकून पडली...
18
इराण-अमेरिका युद्धबंदीने जग सुखावलं, पण 'हा' देश भडकला! पाकिस्तानच्या 'त्या' खेळीमुळे मित्रराष्ट्र नाराज
19
Summer Special: सुकी भेळ करायची तर 'हा' सिक्रेट' मसाला हवाच, वाढवतो सुक्या भेळेची लज्जत
20
मोठी बातमी! इराण युद्धामुळे भारतीय अर्थव्यवस्थेसमोर निर्माण झाली ५ मोठी संकटे; आरबीआय गव्हर्नर संजय मल्होत्रांचा महागाईचा इशारा
Daily Top 2Weekly Top 5

कदम खूनप्रकरण; सख्ख्या भावांना जन्मठेप

By admin | Updated: January 7, 2015 00:27 IST

सांगलीवाडीतील प्रकरण : माजी नगरसेविकेसह दोघे निर्दोष

सांगली : सांगलीवाडी येथील उदय आकाराम कदम (वय २४) या तरुणाच्या खूनप्रकरणी चार संशयितांपैकी दोघांना दोषी धरून जन्मठेप व दोन हजार रुपये दंडाची शिक्षा सुनावण्यात आली. परशुराम बाबू बलवाड (३०) व रमेश बाबू बलवाड (रा. शिरहट्टी, ता. अथणी) अशी त्यांची नावे आहेत. दोघेही सख्खे भाऊ आहेत. अतिरिक्त जिल्हा व सत्र न्यायाधीश डी. जी. धमाळ यांनी आज, मंगळवारी हा निकाल दिला. सरकारतर्फे विशेष सरकारी वकील अ‍ॅड. भगतसिंग राजपूत यांनी काम पाहिले. यात मुख्य संशयित संजय हंबीरराव कदम (वय ३२) व त्याची आई माजी नगरसेविका कुसूम कदम (५८, सांगलीवाडी) यांची न्यायालयाने सबळ पुराव्याअभावी निर्दोष मुक्तता केली आहे. परिस्थितीजन्य पुराव्यावर आधारित असलेल्या या खटल्याचा निकाल काय लागतो, याकडे सर्वांचे लक्ष लागून राहिले होते. निकाल ऐकण्यासाठी सांगलीवाडीतील नागरिकांनी गर्दी केली होती. सकाळी साडेअकराला न्यायालयाने निकाल दिला. त्यानंतर बलवाड बंधूंना पोलीस बंदोबस्तात तातडीने सांगलीच्या कारागृहात हलविण्यात आले.अनैतिक संबंधाच्या संशयावरून उदय कदम याचा २१ मार्च २००९ रोजी भरदिवसा खून करण्यात आला होता. उदयच्या शेतातच त्याचा मृतदेह आढळून आला होता. त्याच्या अंगावरील दागिने गायब झाले होते. अत्यंत गुंतागुंत व आव्हानात्मक बनलेल्या या खुनाचा छडा लावण्यासाठी पोलिसांना आठ दिवस लागले होते. त्यानंतर बलवाड बंधू, कुसूम कदम, संजय कदम यांची नावे निष्पन्न झाली होती. या चौघांना अटक केली होती. बलवाड बंधू संशयित कदम यांच्याकडे शेतगडी म्हणून काम करीत होते. कुसूम व संजय कदम काही दिवसांनंतर जामिनावर बाहेर आले होते, तर बलवाड बंधूंना जामीन मिळाला नाही. खटल्यात २६ साक्षीदार तपासण्यात आले. घटनेनंतर बलवाड बंधूंनी उदयच्या अंगावरील लंपास केलेले दागिने पोलिसांनी जप्त केले होते. उदयचा मोबाईलही त्यांनी लंपास केला होता. यामध्ये त्यांनी स्वत:चे सीमकार्ड घालून त्यावरून संशयित संजय कदम याच्याशी संभाषण केल्याचा महत्त्वाचा पुरावा अ‍ॅड. राजपूत यांनी न्यायालयात सादर केला होता. तत्कालीन पोलीस निरीक्षक अशोक सातपुते यांनी याचा तपास केला होता. (प्रतिनिधी)