शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणचा 'डिजिटल' बॉम्ब! जगाचा इंटरनेट संपर्क तोडण्याची धमकी; समुद्राखालील केबल्स कापल्यास महाभयंकर संकट?
2
"दादांचं स्वप्न, बारामतीचा ध्यास... दुःख तळघरात कोंडलं अन्...!"; उमेदवारी अर्ज भरण्यापूर्वी सुनेत्रा पवार भावुक, दिलं मोठं वचन
3
इराणच्या होर्मुझमधून निघालं भारताचं ८वं जहाज, २० हजार टन LPG घेऊन 'ग्रीन आशा' मायदेशात येणार!
4
राहुरीत शरद पवार गटाचा उमेदवार ठरला, गोविंद मोकाटे निवडणूक लढवणार, प्राजक्त तनपुरेंची माघार?
5
७ दिवसांत दुप्पट झाला 'हा' शेअर; १००% पेक्षा अधिक वाढली किंमत, IPL टीमची मालक आहे कंपनी
6
इराण-इस्रायल संघर्षाचा भारतीय PMI वर परिणाम! सर्व्हिस सेक्टरची गती मंदावली; महागाईने कंबरडे मोडणार?
7
सलग तीन पराभवनानंतर CSK साठी गुड न्यूज, धोनी आणि ब्रेव्हिस ‘या’ सामन्यातून करणार पुनरागमन 
8
Petrol Price In US: ट्रम्प यांच्या निर्णयाचा अमेरिकेच्या लोकांनाच फटका; पेट्रोलच्या दरात जून २०२२ नंतरची सर्वात मोठी वाढ
9
लग्नाच्या पहिल्याच रात्री नववधूला...! नवरदेवाने थेट गाठले पोलीस स्टेशन; आग्र्यातील धक्कादायक घटना
10
बंगळुरू-चेन्नई लढतीत पाण्याच्या बाटलीवरून वाद, RCBचा कर्णधार पंचावर भडकला, नेमकं घडलं काय?
11
अमेरिका-इराणमध्ये आजच युद्धविराम?, ४८ तास महत्त्वाचे; पाकिस्तानचा पुढाकार, रातोरात सूत्रे हलली
12
Ashok Kharat : भोंदू अशोक खरातच्या 'तृप्तबाला'वर लक्ष ठेवण्यासाठी समर्थकांची खतरनाक 'मोडस ऑपरेंडी'
13
सोन्या-चांदीच्या दरात मोठी तेजी; Gold २ हजारांपेक्षा, तर Silver ६ हजारांपेक्षा अधिकनं महागलं; टेक करा नव्या किमती
14
गोरेगावात तुफान राडा, पोलिसांची थेट बुलडोझर कारवाई; सोमय्या घटनास्थळी 'हनुमान चालीसा' पठण करणार
15
टोयोटा 'इनोव्हा क्रिस्टा' कायमची बंद होणार? डिझेल MPV प्रेमींना मोठा धक्का; खरेदीसाठी शेवटची संधी!
16
हात-पाय गमावले, जिद्द सोडली नाही; 18 वर्षीय पायल नागने वर्ल्ड पॅरा आर्चरी सीरिजमध्ये जिंकले 'गोल्ड'
17
राष्ट्रवादी काँग्रेस विलीनीकरणाच्या चर्चांना पूर्णविराम! खासदार अमर काळे यांनी स्पष्ट केली भूमिका; विलीनीकरणाचा विषय आता बंद?
18
"तू फक्त माझाच आहेस, पत्नीला घटस्फोट दे"; प्रेयसीचा हट्ट, कंटाळून शिक्षकाने केली आत्महत्या
19
Ashok Kharat : राजकारण तापलं! भोंदू अशोक खरातचे कॉल डिटेल्स कसे काय बाहेर आले?
20
Reliance Industries च्या शेअर्समध्ये जोरदार घसरण, गुंतवणूकदारांना ३५ हजार कोटींचा फटका; कारण काय?
Daily Top 2Weekly Top 5

कोल्हापूर सेंट झेव्हिअर्समध्ये जुन्या आठवणींचा दरवळ : हीरक महोत्सव दिमाखात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 10, 2017 01:04 IST

कोल्हापूर : येथील सेंट झेव्हिअर्स या शाळेचा हीरकमहोत्सवी सोहळा शनिवारी अत्यंत दिमाखदारपणे साजरा झाला.

ठळक मुद्देमाजी विद्यार्थ्यांचा स्नेहमेळावा, आवाज द्या शाळेसाठी धावून येऊ, मान्यवर उपस्थितजुने मित्र-मैत्रिणी भेटल्यावर जीवनाच्या त्या टप्प्यावर अनेकजण रेंगाळले.

कोल्हापूर : येथील सेंट झेव्हिअर्स या शाळेचा हीरकमहोत्सवी सोहळा शनिवारी अत्यंत दिमाखदारपणे साजरा झाला. त्यानिमित्त गेल्या साठ वर्षांतील माजी विद्यार्थ्यांचा स्नेहमेळावा भरला. जुन्या-नव्या आठवणींनी शाळेचा परिसर पुन्हा एकदा पुलकित झाला. यावेळी ‘झेसाकॉप’ या माजी विद्यार्थी संघटनेच्या वतीने शाळेसाठी दहा लाख रुपयांचा धनादेश देण्यात आला. शाळेच्या मदतीसाठी नुसता आवाज द्या, आम्ही सगळे धावून येऊ, अशी ग्वाही माजी विद्यार्थी संघटनेचे अध्यक्ष उद्योगपती दिलीप मोहिते यांनी दिली.

शाळा व माजी विद्यार्थी संघटनेच्या वतीने या सोहळ्याचे आयोजन करण्यात आले. सकाळी दहा वाजता त्याची सुरुवात झाली. सर्व माजी विद्यार्थी ढोल-ताशांच्या गजरात वाजतगाजत मिरवणुकीनेच शाळेत आले. त्यानंतर सामुदायिक प्रार्थना झाली. सुमारे अडीच हजार विद्यार्थी या सोहळ्यास उपस्थित होते. त्यामुळे शाळेचा परिसर निळी जर्सी घातलेल्या विद्यार्थ्यांनी फुलून गेला. त्यामध्ये विद्यार्थिनींची संख्याही लक्षणीय होती. शाळेचे ते जुने दिवस, त्यावेळच्या आठवणी व एकमेकांबद्दलच्या भावनांना सर्वांनीच पुन्हा उजाळा दिला. जुने मित्र-मैत्रिणी भेटल्यावर जीवनाच्या त्या टप्प्यावर अनेकजण रेंगाळले.

माजी विद्यार्थी संघटनेचे चीफ पेट्रन व दैनिक ‘पुढारी’चे मुख्य संपादक प्रतापसिंह जाधव यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. या शाळेचे सारेच विद्यार्थी चमकणाºया ताºयाप्रमाणे असून, या शाळेमुळेच आमचे जीवन घडल्याची भावना त्यांनी व्यक्त केली. शाळेच्या १९७७ चे माजी मुख्याध्यापक फादर बर्टी रोझारिओ यांनीही या शाळेचा विद्यार्थी कायमच देशाचे नाव उज्ज्वल करील अशा भावना व्यक्त केल्या. या शाळेत झालेल्या चांगल्या संस्कारांमुळे आम्ही जीवनात यशस्वी झाल्याचे मोहिते यांनी सांगितले.यावेळी डॉ. डी. वाय. पाटील शिक्षण समूहाचे प्रमुख डॉ. संजय पाटील, आमदार सतेज पाटील, त्यांची बहीण भाग्यश्री पाटील, ऋतुराज पाटील यांच्यासह उद्योगपती विजय मेनन, भरत जाधव, भरत ओसवाल, दीपक गदे्र, शिवप्रसाद पाटील, अमरदीप पाटील, आदी मान्यवर उपस्थित होते.कोल्हापुरातील सेंट झेव्हिअर्स शाळेचा शनिवारी हीरकमहोत्सव साजरा झाला. त्यावेळी सर्व माजी विद्यार्थी मिरवणुकीने या सोहळ्यात सहभागी झाले. दुसºया छायाचित्रात शाळेचे माजी विद्यार्थी असलेले आमदार सतेज पाटील हे यावेळी फुटबॉल खेळण्यात चांगलेच रंगले होते.