शहरं
Join us  
Trending Stories
1
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
2
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
3
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
4
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
5
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
6
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
7
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
8
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
9
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
10
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
11
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
12
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
13
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
14
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
15
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
16
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
17
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
18
महाकुंभमेळ्यातून चर्चेत आलेल्या IIT बाबाने बांधली लगीनगाठ; पत्नी काय करते? जाणून घ्या...
19
IPL 2026: "धोनीनं सांगूनही सीएसकेच्या गोलंदाजांनी त्याच चुका केल्या" आरसीबीविरुद्धच्या पराभवानंतर रायडू भडकला!
20
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
Daily Top 2Weekly Top 5

‘सुकाणू’ नव्हे सुकलेली समिती : सदाभाऊ खोत यांची टीका

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 18, 2017 18:51 IST

 कर्जमाफीवर टीका करणाºया सुकाणू समितीमधील काही सदस्यांची इतर राज्यांत सत्ता आहे, त्यांनी तिथे कर्जमाफी द्यावी आणि मग येथे येऊन शहाणपण शिकवावे, असा इशारा देत सुकाणू समिती म्हणजे सुकलेली समिती असल्याची टीका कृषी व पणन राज्यमंत्री सदाभाऊ खोत यांनी पत्रकारांशी बोलताना केली.

ठळक मुद्दे कोणी म्हणते म्हणून नव्हे तर साखरेच्या भावावरच उसाचा दर‘स्वाभिमानी’चे नेते खासदार राजू शेट्टी यांच्यावर टीकाजिल्हाधिकारी कार्यालयात कर्जमाफीतील शेतकऱ्याचा सत्कार ऊस दराबाबत लवकरच बैठकयोग्य तोडगा न निघाल्यास संघर्ष

कोल्हापूर , दि. १८ :  कर्जमाफीवर टीका करणाºया सुकाणू समितीमधील काही सदस्यांची इतर राज्यांत सत्ता आहे, त्यांनी तिथे कर्जमाफी द्यावी आणि मग येथे येऊन शहाणपण शिकवावे, असा इशारा देत सुकाणू समिती म्हणजे सुकलेली समिती असल्याची टीका कृषी व पणन राज्यमंत्री सदाभाऊ खोत यांनी पत्रकारांशी बोलताना केली.

कर्जमाफीतील शेतकऱ्याचा सत्कार मंगळवारी जिल्हाधिकारी कार्यालयात झाला. त्यानंतर पत्रकारांशी बोलताना राज्यमंत्री खोत यांनी सुकाणू समितीसह स्वाभिमानी शेतकरी संघटनेवर टीका केली.

खोत म्हणाले, राज्य सरकारने कर्जमाफीचे पैसे दिवाळीपर्यंत शेतकऱ्याच्या खात्यावर वर्ग करण्याबाबतचा ‘शब्द’ पाळला आहे. एकराची अट नाहीच सरसकट दीड लाखांपर्यंतचे कर्जमाफ होणार आहे, पण सुकाणू समितीला ते मान्य नसल्याची चर्चा आहे.

या समितीमधील काही सदस्यांची इतर राज्यांत सरकार आहेत. त्यांनी तिथे कर्जमाफी करावी आणि मग येथे येऊन शहाणपण शिकवावे. तिथे दमडीही दिलेली नाही, काही न करता उगीच टीका करायची, डोळ्यावर काळा चष्मा घातलेल्यांना उजेड कसा दिसणार. कर्जमाफीबाबत निर्णय घ्यायला सुकाणू समिती सरकार नसल्याची टीकाही त्यांनी केली.

ज्या कारखान्यांनी अंतिम ऊस बिले दिलेली नाहीत, त्यांना गाळप परवाना दिला जाणार नाही. त्यामुळे अंतिम बिलाचा प्रस्ताव त्यांना सादर करावाच लागेल. यंदा देशाला जेवढी साखरेची गरज आहे, तेवढेच उत्पादन होणार आहे, त्यात साखरेचे दर सध्या तरी चांगले असल्याने यंदा एफआरपीपेक्षा जादा पैसे उत्पादकांना मिळतील असे अपेक्षित आहे.

ऊसदर कोणी मागतो म्हणून नव्हे तर साखरेचा बाजारातील भावावर मिळतो. मी म्हणेल तेवढा दर द्यायचा म्हटला तर कारखान्यांचे काय होईल, हे सगळ्यांना माहिती असल्याची टीकाही त्यांनी ‘स्वाभिमानी’चे नेते खासदार राजू शेट्टी यांच्यावर केली.

ऊस दराबाबत लवकरच बैठकमहाराष्ट्रतील ऊस गळीत हंगाम १ नोव्हेंबरपासून सुरू होत आहे. ऊस दराबाबत चर्चा करण्यासाठी तत्पूर्वी साखर कारखानदार, शेतकरी संघटनेच्या प्रतिनिधींची बैठक बोलवावी, अशी मागणी रयत संघटनेच्या वतीने सहकारमंत्री सुभाष देशमुख यांच्याकडे केली आहे.

योग्य तोडगा न निघाल्यास संघर्षऊस दराबाबत तोडगा काढण्यासाठी आमचा प्रयत्न राहील; पण योग्य तोडगा निघाला नाही तर रयत संघटना संघर्ष करण्यास रस्त्यावर उतरेल, असा इशाराही खोत यांनी दिला.