शहरं
Join us  
Trending Stories
1
अण्णा, आतातरी उठा! मतांची चोरी होत असताना तुमच्यासारखा ज्येष्ठ गांधीवादी समाजसेवक शांत कसा?
2
ट्रम्प यांना नक्की हवे तरी काय? व्यापरविषयक टीमचा भारत दौरा लांबला; टॅरिफवरील चर्चा रखडणार!
3
किश्तवाडनंतर कठुआमध्ये ढगफुटीने प्रचंड नुकसान, ४ जणांचा मृत्यू; रेल्वे ट्रॅक आणि महामार्गाचेही नुकसान
4
सोन्याच्या किमतीत मोठी घसरण, खरेदी करण्याची सुवर्णसंधी! २४ कॅरेट सोन्याच्या १० ग्रॅमचा नवीन दर काय?
5
आजचे राशीभविष्य, १७ ऑगस्ट २०२५: अचानक धनलाभ, मान-सन्मान; सरकारी कामात यश, शुभ दिवस
6
एअर इंडियाच्या विमानाने लँडिंग करायचा प्रयत्न केला अन् प्रवाशांमध्ये पसरलं भीतीचं वातावरण! नेमकं काय झालं?
7
सहचारिणी झाली वैरिण! झोपेच्या ५ गोळ्या दिल्या, उशीनं पतीचं तोंड दाबलं; जीव गेल्याचं कळताच रस्त्यावर फेकून दिलं!
8
साप्ताहिक राशीभविष्य: ८ राशींना उत्तम, नोकरीत पदोन्नती योग; व्यापारात भरभराट, अनुकूल काळ!
9
सलमान, कपिल शर्मानंतर आता 'बिग बॉस' फेम एल्विश यादवच्या घराबाहेर गोळीबार, घबराटीचं वातावरण
10
एकीचं वय ४ अन् दुसरी अवघ्या आठ महिन्यांची, तरीही आईला कीव आली नाही! जन्मदात्रीनेच पोटच्या लेकींना का संपवलं?
11
डोनाल्ड ट्रम्प - व्लादिमीर पुतिन यांच्यातील महाबैठकीत युक्रेन शस्त्रसंधीबाबत करार नाही!
12
ऐतिहासिक दिवस; कोल्हापूर सर्किट बेंचचे आज उद्घाटन; सरन्यायाधीश भूषण गवई उद्घाटक
13
बीएसएनएलच्या कामास चेंबरमध्ये गेलेले तिघे ठार; स्वातंत्र्यदिनी पिंपरी-चिंचवडमधील घटना
14
गाळप क्षमतेबाबत धोरणाची गरज, कारखानदारीस सुरुंग: माजी केंद्रीय कृषिमंत्री शरद पवार
15
सीमाप्रश्नावर चर्चेसाठी चिनी परराष्ट्रमंत्री भारत दौऱ्यावर; सुरक्षा सल्लागार अजित डोवालांशी चर्चा करणार
16
उपराष्ट्रपतिपदासाठी भाजपची जोरदार तयारी, संघनिष्ठ व्यक्तीवर भर; ९ सप्टेंबरला होणार मतदान
17
परवडणाऱ्या घरांची संख्या वाढवण्यासाठी बिल्डरांना सवलती, तरीही किमती चढ्याच: मुख्यमंत्री
18
उंच इमारतीच्या बांधकामाबाबतचे सुरक्षा नियम राज्यासाठीही बंधनकारक; हायकोर्टाचे निर्देश
19
भारतावर दुय्यम शुल्क लावणार नाही; अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचे संकेत
20
राहुल गांधी यांची आजपासून 'व्होट अधिकार यात्रा'; गैरप्रकारांविरोधात जनता जागृत झाल्याचा दावा

काँग्रेससोबत रहा; ताकद देऊ

By admin | Updated: December 22, 2015 00:51 IST

रमेश बागवे : बजरंग देसाई, दीपक पाटील यांच्यासह अन्य नेत्यांना सतेज पाटील यांच्यासोबत राहण्याची सूचना

कोल्हापूर : पक्षाविरोधात कोणतीही भूमिका घेऊ नका. तुमच्या अडचणी व प्रश्न निश्चितच समजून घेतले जातील. पक्षासोबत राहिल्यास तुम्हाला ताकद देऊ, असा कॉँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण यांचा निरोप पक्षनिरीक्षक रमेश बागवे व सत्यजित देशमुख यांनी जिल्ह्यातील काँग्रेसच्या नेत्यांना सोमवारी दिला. तसेच माजी आमदार बजरंग देसाई, ‘गोकुळ’चे संचालक दीपक पाटील यांच्यासह अन्य नेत्यांशी चर्चा करून विधान परिषद निवडणुकीत पक्षाचे उमेदवार सतेज पाटील यांच्यासोबत राहण्याची सूचना त्यांनी केली.विधान परिषद निवडणुकीची रणधुमाळी सुरू आहे. कोल्हापूर जिल्ह्यातील वातावरण तर दिवसेंदिवस तापत चालले आहे. कॉँग्रेसचे उमेदवार सतेज पाटील यांच्याविरोधात बंडखोरी केलेल्या आ. महादेवराव महाडिक यांच्यामुळे ही लढत चुरशीची झाली आहे. कॉँग्रेसचे काही पदाधिकारी उघडपणे महाडिक यांच्यासोबत दिसत आहेत. याची गंभीर दखल कॉँग्रेसच्या वरिष्ठांनी घेतली आहे. कोणत्याही परिस्थितीत कॉँग्रेसची जागा जिंकायचीच, ही पक्षाची भूमिका आहे. त्यामुळे कोणतीही ‘रिस्क’ घ्यायला पक्षश्रेष्ठी तयार नाहीत. त्यामुळे पक्षनिरीक्षक बागवे व प्रदेश सरचिटणीस देशमुख कोल्हापुरात दाखल झाले. यानंतर त्यांनी सकाळी आठच्या सुमारास माजी मंत्री भरमूअण्णा पाटील यांचे चिरंजीव व ‘गोकुळ’चे संचालक दीपक पाटील यांची नागाळा पार्क येथील जिल्हा परिषदेच्या निवासस्थानी भेट घेतली. यावेळी बागवे व देशमुख यांनी पाटील यांच्याशी सविस्तर चर्चा केली. आम्ही प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण यांच्या आदेशानुसार येथे आलो असून, आपण पक्षविरोधात कोणतीही भूमिका घेऊ नये. पक्ष तुम्हाला ताकद देईल, असे सांगितले. तुमचे पक्षांतर्गत काही वाद असतील तर तेही सोडविले जातील; परंतु तुम्ही विरोधी भूमिका घेऊ नका. यावर दीपक पाटील यांनी आम्ही पक्षासोबतच असल्याची ग्वाही निरीक्षकांना दिली.यानंतर निरीक्षकांनी बजरंग देसाई यांची कळंबा येथील निवासस्थानी भेट घेतली. यावेळी त्यांच्यासोबत जिल्हाध्यक्ष पी. एन. पाटील, तौफिक मुल्लाणी, संजय पोवार-वाईकर होेते. यावेळी देसाई यांच्याबरोबर सविस्तर चर्चा करण्यात आली. त्यांनी आपल्याकडून पक्षविरोधी कोणतेही काम होणार नसून, आपण पक्षासोबतच असल्याचे सांगितले. त्यानंतर कॉँग्रेसचे जिल्हा परिषदेचे पक्षप्रतोद शहाजी पाटील यांच्याशी निरीक्षकांनी फोनवरून चर्चा केली. यावेळी पाटील यांनी आपण कॉँग्रेससोबतच असल्याचे सांगितले.दरम्यान, सोमवारी दुपारी सतेज पाटील यांनी माजी केंद्रीय कोळसा मंत्री प्रतीक पाटील यांची भेट घेतली. त्यानंतर सतेज पाटील, प्रतीक पाटील व आमदार हसन मुश्रीफ यांची अजिंक्यतारा कार्यालयात निवडणुकीसंदर्भात चर्चा झाली. +विधान परिषद निवडणूक : ‘व्हिप’ काढणारकॉँग्रेसचे सर्व जिल्हा परिषद सदस्य रविवारी (दि. २७) एकत्रित पक्षनिरीक्षकांसोबत मतदानासाठी येतील, अशा पद्धतीने नियोजन करण्यात आले आहे. गुरुवारी (दि. २४) पक्षनिरीक्षक पुन्हा कोल्हापुरात येऊन विधान परिषद निवडणुकीचा आढावा घेणार आहेत. पक्षाच्या सर्व मतदारांना ‘व्हिप’ लागू करण्यात येणार आहे.