शहरं
Join us  
Trending Stories
1
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
2
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
3
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
4
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
5
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
6
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
7
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
8
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
9
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
10
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
11
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
12
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
13
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
14
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
15
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
16
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
17
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
18
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
19
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
20
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
Daily Top 2Weekly Top 5

इटे ग्रामस्थ करणार ठिय्या आंदोलन

By admin | Updated: December 14, 2014 23:54 IST

उपोषणाचा इशारा : रास्तभाव धान्य दुकानाचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर

आजरा : इटे (ता. आजरा) येथील रास्तभाव धान्य दुकानदार मंगल शिवाजी कांबळे अंत्योदय व अन्न सुरक्षा लाभार्थ्यांचे धान्य परस्पर काळ्या बाजारात विकत असल्याचा आरोप करीत इटे ग्रामस्थांनी तहसीलदारांना २२ डिसेंबरला तहसील कार्यालयासमोर लाक्षणिक उपोषणासह ठिय्या आंदोलनाचा इशारा दिला आहे.गेले १३ दिवस मुक्ती संघर्ष समितीचे आजरा तहसीलसमोर दाभिल येथील रास्तभाव धान्य दुकानदाराचा परवाना रद्द करावा यासाठी आंदोलन सुरू आहे. पाठोपाठ इटे ग्रामस्थांनी दिलेला इशारा ‘महसूल’ विभागाची डोकेदुखी ठरत आहे.इटेच्या पार्श्वभूमीवर बोलताना सरपंच विलास पाटील म्हणाले, गावातील अन्य दुकानदारांबाबत ग्रामस्थांमध्ये नाराजी आहे. या धान्य दुकानदाराच्या धान्य वितरणामध्ये अनेक त्रुटी आहेत. ग्रामस्थांच्या तक्रारींच्या पार्श्वभूमीवर तहसीलदार श्रीमती शिल्पा ठोकडे यांनी ८ डिसेंबरला दुकानास भेट देऊन शिधापत्रिकाधारकांशी थेट संवाद साधला होता. यावेळी धान्य वितरणात अनेक त्रुटी आढळल्या. माहे नोव्हेंबरचे धान्य अनेक शिधापत्रिका धारकांना मिळालेले नाही. दुकानदार कांबळे यांना कार्डधारकांबाबत कोणतीही माहिती नाही.ग्रामस्थांच्या तक्रारींचा विचार करून रास्त धान्य दुकानदारावर कारवाई करून परवाना रद्द करावी, अशी मागणी केली. यावेळी शिवाजी पाटील, महादेव पाटील, संजय शेणवी उपस्थित होते. (प्रतिनिधी)