शहरं
Join us  
Trending Stories
1
रशियाच्या पाणबुड्या महिनाभर ब्रिटनच्या समुद्रात लपलेल्या, काय करत होत्या? ब्रिटीशांच्या दाव्याने खळबळ...
2
ट्रम्प यांच्या दाव्याने खळबळ, १०० मिसाईल...! 'शांतीदूत' म्हणवून घेणारा पाकिस्तान 'बेनकाब'; चीनचा बुरखा फाटला
3
अजबच विनोद...! अमेरिका-इराण सीजफायरनंतर पाकिस्तानची थेट 'नोबेल' शांतता पुरस्काराची मागणी
4
सुरक्षित होर्मुझ पार केले...१५,४०० मेट्रिक टन LPG गॅस भरलेले 'ग्रीन आशा' जहाज भारतात दाखल
5
CBSE चा नवा अल्टीमेटम..! आता सहावीच्या वर्गापासून शिकावी लागणार तिसरी भाषा; काय आहे R3 नियम?
6
एका मॅचसाठी मिळतात फक्त ७५० रुपये; बांगलादेशी खेळाडूची व्यथा ऐकून बीसीबी प्रमुख झाले शॉक!
7
खाकी वर्दीतला 'हा' चेहरा ओळखला का?; ज्यानं टीम इंडियाला पहिला टी-२० वर्ल्डकप जिंकवला
8
"दहशतवादी संघटनेशी संबंध”; कुटुंब ९ तास डिजिटल अरेस्टमध्ये; मुलाच्या हुशारीने वाचले ६ लाख
9
समुद्री चाचे लुटूनही सोबत घेऊन जाऊ शकले नाहीत, एवढा खजिना भारताच्या जहाजावर सापडला; हिरे, सोने, चांदी...
10
शस्त्रसंधी धोक्यात, भारताच्या चिंतेत वाढ! होर्मुझ सामुद्रधुनीत सध्या परिस्थिती काय आहे?
11
Travel : रात्री चमकणारा समुद्र अन् काचेची वाळू; जगातील सर्वात हटके बीचेस, भारतातील 'या' किनाऱ्याचाही समावेश!
12
अवघ्या २४ तासांतच फुस्सं झाला पाकिस्तानचा प्लॅन?; २५० मृत्यूनंतर तुर्कीनं इस्रायलला फटकारलं
13
Latest Marathi News LIVE: ...म्हणून मी माघार घेण्याचा निर्णय रद्द केला; करूणा मुंडेंचा दावा, बारामतीत लढणारच
14
"मुनीर आपले हिरो, आज अल्लाहने..."; अमेरिका-इराण युद्धविरामाचं श्रेय घेण्यासाठी शहबाज शरीफ यांचा आटापिटा
15
Hyundai Creta Summer Edition: कमी किंमतीत प्रीमिअम फीचर्स! ह्युंदाई क्रेटा समर एडिशन लॉन्च, पाहून स्पर्धकांना फुटला घाम
16
सिलिंडरच्या OTP मुळे वाचला जीव, विहिरीत ३ दिवस मृत्यूशी झुंज; आजोबांसोबत काय घडलं?
17
इराण-अमेरिका बैठकीपूर्वी २ दिवस सुट्टी जाहीर, हॉटेलही केले रिकामे; पाकिस्तानात खास तयारी
18
जगातील अजब देश! या १० देशांकडे स्वतःचे 'सैन्य'च नाही; मग संरक्षणाची जबाबदारी कोणाची?
19
सावधान! स्मार्टफोनमध्ये चुकूनही ठेवू नका 'असे' व्हिडिओ, अन्यथा थेट घरून उचलून नेतील पोलीस
20
फक्त ३ सोप्या स्टेप्समध्ये घरीच तयार करता येईल वर्षभर टिकणारी चटपटीत आमचूर पावडर
Daily Top 2Weekly Top 5

शिक्षण खासगीकरणाविरोधात राज्यभर आंदोलन

By admin | Updated: June 19, 2014 01:14 IST

कपिल पाटील यांची माहिती : सरकारी धोरणाविरोधात राज्यभर राबविणार सह्यांची मोहीम

कोल्हापूर : खासगी विद्यापीठांची दोन विधेयके व स्वयंअर्थशासित शाळा या विरोधात शुक्रवारी (दि. २०) राज्यभर आंदोलन करणार असल्याची माहिती ‘लोकभारती’चे अध्यक्ष आमदार कपिल पाटील यांनी बुधवारी येथे पत्रकार परिषदेत दिली. शिक्षण क्षेत्राच्या परिवर्तनासाठी पुणे शिक्षक मतदारसंघातून ‘शिक्षकभारती’चे उमेदवार शिवाजी खांडेकर यांना उभे केल्याचेही त्यांनी सांगितले.आमदार पाटील म्हणाले, गेल्या अधिवेशनात अमिटी व स्पायसर अ‍ॅडवेनटिस्ट या दोन स्वयंअर्थशासित विद्यापीठांची विधेयके शेवटच्या क्षणी मंजूर करण्याचे काम सरकारने केले आहे. या विधेयकांना विरोध केला; पण बहुमताच्या जोरावर मंजूर केले. विरोधक मतदानावेळी आपल्या पाठीशी राहिले; पण त्यांनी ताकदीने विरोध केला असता, तर कदाचित हे विधेयक मंजूर होऊच शकले नसते. दोन वर्षांपूर्वी असेच एक विधेयक मंजुरीसाठी विधान परिषदेमध्ये आले होते. त्यावेळीही एकमेव आपणच विरोध केला होता. या विधेयकात दलित, आदिवासी व ओबीसींसाठी आरक्षण नसल्याने सामान्य गरीब मुलांना प्रवेशच मिळणार नसल्याने विरोध केला. याच मुद्द्यावर राज्यपाल के. शंकर नारायणन यांनी ते विधेयक सरकारकडे परत पाठविले होते. आता दोन नव्या विद्यापीठांची विधेयके मंजूर करताना गरीब विद्यार्थ्यांच्या फीचे कोणतेही दायित्व स्वीकारलेले नाही. शासनाच्या या धोरणाविरोधात शुक्रवारी आंदोलन करणार आहे. राज्यभर या धोरणाविरोधात सह्यांची मोहीम, निवेदने व अमरावती, पुणे विभागात सरकारच्या विरोधात मतदान असा कार्यक्रम शिक्षकभारतीने जाहीर केला आहे. ज्या शाहू महाराजांनी मोफत व सक्तीच्या शिक्षणाची सुरुवात केली, तो विचार पुसून टाकण्याचे काम सरकार करीत आहे. अशा प्रवृत्तीला विरोध करण्यासाठी पुणे शिक्षक मतदारसंघातील ही निवडणूक लढविण्याचा निर्णय घेतल्याचे आमदार पाटील यांनी सांगितले. (प्रतिनिधी)