इचलकरंजी : शहरातील अन्यायकारक घरफाळा व पाणीपट्टी वसुली थांबवावी तसेच त्यामध्ये नागरिकांना सवलत द्यावी, भटक्या श्वानांचा बंदोबस्त करावा, या मागणीचे निवेदन मनसेने उपमुख्याधिकारी केतन गुजर यांना दिले.
या निवेदनात, लॉकडाऊन काळातील घरफाळा व पाणीपट्टी माफ करावी; अन्यथा त्यामध्ये सवलत द्यावी. शहरातील दिव्यांग नागरिकांची नोंदणी पालिकेकडे झाली आहे, त्यांना नगरपालिकेकडून निधी देण्यास टाळाटाळ केली जाते. यामुळे त्यांची निधीसाठी फरपट होत आहे. दिव्यांगांना निधी लवकर देऊन त्यांना न्याय मिळवून द्यावा, अशी मागणी करण्यात आली. या मागण्या मान्य न झाल्यास मनसेतर्फे तीव्र आंदोलन करण्यात येईल, असा इशाराही देण्यात आला. मनसेच्या शिष्टमंडळात प्रताप पाटील, रवी गोंदकर, नितीन कटके, मनोहर जोशी, सौरभ संकपाळ, आदींचा समावेश होता.