शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणकडे थोडी थोडकी नव्हे, २०,००० मिसाईल, दिवसाला २०० जरी डागली...; धमकीने खळबळ
2
डोनाल्ड ट्रम्प यांच्या एका पोस्टने तेहरानमध्ये भीषण गर्दी, लोक शहर सोडून काढतायत पळ! पाहा व्हिडीओ
3
राजावर पहिला वार कुणी केला...? कुठे उभी होती सोनम...? क्राइम सीनवरून परतलेल्या मेघालय पोलिसांनी सगळंच सांगितलं
4
लेडी डॉन अनुराधा चौधरीला आई व्हायचेय; गँगस्टरने तिहारमधून शुक्राणू पाठविले...
5
"तू नाही, तुझी वहिनी आवडली"; मेहुण्याच्या बायकोवर जडला नवऱ्याचा जीव, लग्नाच्या एका महिन्यातच बायकोला सोडून पसार!
6
"त्यांना केवळ प्रसिद्धी हवी आहे...!"; G7 समिट अर्ध्यावर सोडून अमेरिकेत पोहोचताच फ्रान्सच्या राष्ट्रपतींवर भडकले ट्रम्प, नेमकं काय घडलं?
7
आता केवळ रामलला नाही, तर श्रीराम दरबाराचेही करा दर्शन; १ दिवसात किती भाविकांना पाहता येणार?
8
'संधी-साधूपणाच्या राजकारणाला प्रोत्साहित करायचे नाही,भाजपसोबत..' शरद पवार स्पष्टच बोलले
9
सुधाकर बडगुजर भाजपात येताच नितेश राणेंचे सूर बदलले; दहशतवादाबाबत केले होते आरोप
10
५०, १०० नाही, तब्बल ‘इतकी’ विमाने रद्द! ‘असा’ आहे एअर इंडियाचा ३ वर्षांचा रेकॉर्ड, आकडे पाहाच
11
व्हिसा नाकारल्याचा राग, तरुणाने अमेरिकन दूतावासाला बॉम्बने उडवण्याची धमकी दिली! पोलिसांकडून अटक
12
पीएमजीपी वसाहतीमधील रहिवाशांना ४५० फुटांचे घर मिळणार! म्हाडामार्फत कंत्राटदार नियुक्तीसाठी निविदा प्रक्रिया सुरू
13
'हुकूमशहा-पाकिस्तानचा खुनी..', अमेरिकेत गेलेल्या असीम मुनीरच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी
14
“सुधाकर बडगुजर यांच्या प्रवेशाने भाजपाची ताकद वाढली, आता महापालिका निवडणूक...”: गिरीश महाजन
15
राजा रघुवंशी हत्याकांडाची पुनरावृत्ती; पैसे देऊन गुंड बोलावले, पत्नीने प्रियकरासोबत मिळून पतीला संपवलं!
16
आम्ही मोसादचं हेडक्वार्टर उडवलं, इस्रायली मिलिट्री इंटेलिजन्सलाही निशाणा बनवलं; इराणचा मोठा दावा
17
IND vs ENG : तेंडुलकर-अँडरसन ट्रॉफीसह आता मालिका विजेत्या कर्णधाराला दिले जाणार 'पतौडी मेडल'
18
मस्करीची झाली कुस्करी! मित्राने चिडविले म्हणून ठोसा मारला, त्याने हॉस्पिटलमध्ये जीव सोडला
19
"आता आमची वेळ आलीय..."; इस्त्रायल-इराण युद्धाला नवं वळण, खामेनेईविरोधात पुकारला एल्गार
20
Kareena Kapoor : "मी २ महिने शाहिदच्या मागे लागलेली, खूप सारे SMS करायची, मी पहिली व्यक्ती होती, जी..."

राज्यात मटक्यातील २५० कोटींची उलाढाल ठप्प

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 7, 2019 00:25 IST

एकनाथ पाटील । लोकमत न्यूज नेटवर्क कोल्हापूर : महाराष्ट्रासह कर्नाटक, गोवा आणि गुजरात या राज्यांतील मटका-जुगाराचे कनेक्शन चालविणाऱ्या प्रमुख ...

एकनाथ पाटील ।लोकमत न्यूज नेटवर्ककोल्हापूर : महाराष्ट्रासह कर्नाटक, गोवा आणि गुजरात या राज्यांतील मटका-जुगाराचे कनेक्शन चालविणाऱ्या प्रमुख दहा बुकीचालकांच्या मुसक्या कोल्हापूर पोलिसांनी आवळल्याने महाराष्ट्रातील ‘मुंबई मटका’ ठप्प होऊन सुमारे २५० कोटींच्या उलाढालीला ब्रेक लागला आहे. गेले सात महिने मुंबई मटका पूर्णत: बंद आहे.मटका-जुगार बंद करणे हे पोलिसांपुढे मोठे आव्हान होते. या गुन्ह्यात जामीन असल्याने डझनभर कारवाया झाल्या तरी बुकीचालक पुन्हा मटका सुरू करीत होते. बोरिवली, मुंबई येथून प्रकाश ऊर्फ पप्पू हिरजी सावला हा आपल्या अन्य साथीदारांच्या मदतीने महाराष्ट्र, कर्नाटक, गोवा आणि गुजरात या राज्यांतील मुंबई मटक्याचे कनेक्शन हाताळत होता. या चारही राज्यांत बुकीचालक नेमून हजारो एजंटांचे जाळे विखुरले होते.कोल्हापुरातील यादवनगर-पांजरपोळ येथे ८ एप्रिल २०१९ च्या रात्री मटका अड्ड्यावर छापा टाकण्यासाठी गेलेल्या प्रशिक्षणार्थी पोलीस अधीक्षक ऐश्वर्या शर्मा यांच्यासह त्यांच्या पथकावर सलीम मुल्ला याच्यासह ४०० जणांच्या जमावाने हल्ला करीत बेदम मारहाण केली. अवैध व्यावसायिकांकडून पोलिसांवर हात उगारला गेल्याने राज्यभर खाकी वर्दीची नाचक्की झाली. कोल्हापूरचे पोलीस अधीक्षक डॉ. अभिनव देशमुख यांनी या हल्ल्याचे गांभीर्य लक्षात घेत मुल्ला गँगवर कठोर कारवाईचा पवित्रा घेऊन ‘मोक्का’ कारवाई केली. सलीमच्या संपर्कात असणाºया मटका-जुगाराचे मुंबईतील म्होरके प्रकाश सावला, जयेश शहा, वीरज सावला, जितेंद्र गोसालिया, राजेंद्र टोपी यांच्यासह स्थानिक सम्राट कोराणे, मनीष अग्रवाल यांच्यावर मोक्काअंतर्गत कारवाई केली. कोल्हापूरपासून मुंबई, गोवा, कर्नाटक आणि गुजरात येथील रॅकेटचे म्होरके अटक झाल्याने मुंबई मटका दीर्घकाळ बंद राहिला. गेले सात महिने तो बंद राहिल्याने सुमारे २५० कोटींच्या उलाढालीला ब्रेक लागला आहे.कोल्हापूरसह सांगली, सातारा, सोलापूर, पुणे ग्रामीण, बेळगाव या सहा जिल्ह्यांतील मटका-जुगाराचे म्होरके अग्रवाल, कोराणे आहेत. त्यांचे नेटवर्क सांभाळण्यासाठी सलीम मुल्लासह एक हजारच्या आसपास एजंटांचे जाळे विखुरलेले होते. ओसवालचे थेट मुंबईतून मटक्याचे कनेक्शन होते. त्याची एकट्याची दिवसाची उलाढाल १० कोटी असल्याचे पोलीस सांगत आहेत.राज्यातील मटक्यातील दहा म्होरकेसलीम यासीन मुल्ला (रा. यादवनगर, कोल्हापूर), मनीष किशोर अग्रवाल (इचलकरंजी), सम्राट बबन कोराणे (शिवाजी पेठ, कोल्हापूर), प्रकाश ऊर्फ पप्पू हिरजी सावला, जयेश सेवांतीलाल शहा, विरज प्रकाश सावला, शैलेश गुणवंतराव मणियार, जितेंद्र ऊर्फ जितू कांतीलाल गोसालिया, राजेंद्र ऊर्फ राजू धरमसी दवे ऊर्फ टोपी, जयेश हिरजी सावला (सर्व रा. बोरिवली पश्चिम, मुंबई).