शहरं
Join us  
Trending Stories
1
युद्धविराम १४ दिवसांचाच...! नंतर पुन्हा युद्ध सुरु होणार? ट्रम्प यांचा इशारा आणि नेतन्याहूंच्या अटी 
2
US Israel Iran War: युद्ध थांबलं? ट्रम्प यांची मोठी घोषणा, पण मोज्तबा खामेनेईंच्या एका वाक्याने पुन्हा खळबळ! म्हणाले..
3
"होर्मुझच्या समुद्रधुनीत अमेरिका...!"; युद्धविरामानंतर ट्रम्प यांचा इराणला नवा संदेश; तेहरानमध्ये पुन्हा उभ्या राहणार इमारती?
4
युद्ध संपले, आता मदतीचा हात! २४ तासांत ट्रम्प यांचा 'यू-टर्न'; इराणच्या पुनर्निर्माणासाठी अमेरिका करणार सहकार्य
5
नेपाळमध्ये भारतीय वाहनांसाठी नवा नियम, सीमेवरून वाहतुकीला निर्बंध; स्थानिकांमध्ये संताप
6
नाशिकचा 'भोंदू' अशोक खरात कोठडीत ढसाढसा रडला; पोलिसांना शाप देणारा बाबा आता नरमला!
7
विकृतीचा कळस! महिलांची अंतर्वस्त्रे चोरून कॅमेऱ्यासमोरच करायचा अश्लील कृत्य; रहिवाशांनी सीसीटीव्ही पाहिला अन्...
8
IPL 2026: मुंबईविरुद्धच्या सामन्यात जयस्वालची 'स्पेशल' सेंच्युरी; याआधी असं फक्त तिघांनाच जमलंय!
9
लवकरच येणार स्वस्त मोबाईल प्लॅन! केवळ कॉल आणि एसएमएस करणाऱ्यांना मिळणार गिफ्ट; कंपन्या दिलासा देणार?
10
समरजित घाटगे यांची भाजपात घरवापसी, शरद पवार गटाला धक्का, कागलमधील समीकरणं बदलणार
11
तुमच्या नगरसेवकांना नियम शिकवा; अधिकारी, विरोधकांनी गणेश नाईकांना घेरले, नेमके काय घडले?
12
शहबाज शरीफ यांना डच्चू! ट्रम्प यांनी या दोन जणांना केले कॉल? वाचा युद्धविरामापूर्वीच्या फोन कॉलची संपूर्ण 'इनसाईड स्टोरी'
13
"जी व्यक्ती मालिकेतच नव्हती...", 'लक्ष्य'मधून बाहेर काढण्याच्या दिगंबर नाईकांच्या आरोपांवर आदेश बांदेकरांचं उत्तर
14
RBI MPC Meeting Update: रेपो दर 'जैसे थे'; जागतिक अनिश्चिततेदरम्यान रिझर्व्ह बँकेचा सावध पवित्रा
15
SHOCKING! इराण-अमेरिका युद्धातून डोनाल्ड ट्रम्पची दोन्ही मुलंच उकळताहेत प्रचंड पैसा!
16
RR vs MI: मुंबईच्या रणनीतीचा पालापाचोळा! पराभवानंतर जयवर्धने यांनी सांगितलं नेमकं कुठं गणित बिघडलं?
17
शस्त्रसंधी केली तरी ट्रम्प यांची खुर्ची धोक्यात? ८५ खासदारांनी मागितला राजीनामा; विरोध कायम
18
वैभव-यशस्वीने मुंबईला धू धू धुतले, कॅप्टन हार्दिक पांड्याने ‘या’ खेळांडूंवर पराभवाचे खापर फोडले  
19
Mumbai Local: मध्य रेल्वेची कमाल, १६४ कोटी प्रवाशांचा प्रवास; ८.१६ लाख ट्रेन, १ वर्षांत किती सेवा वाढल्या?
20
अमेरिका-इराणमध्ये अखेर तह! ट्रम्प कडाडले, पाकिस्तानने मध्यस्थी केली की चीनने? वाचा काय घडलंय...
Daily Top 2Weekly Top 5

दुग्धोत्पादनात राज्य दोन वर्षांत अग्रस्थानी : जानकर

By admin | Updated: May 19, 2017 23:26 IST

दुग्धोत्पादनात राज्य दोन वर्षांत अग्रस्थानी : जानकर

लोकमत न्यूज नेटवर्कवैभववाडी : दुग्ध उत्पादनात एकेकाळी देशात पहिल्या क्रमांकावर असणारा महाराष्ट्र आधीच्या सरकारने अंग काढून घेतल्यामुळे सातव्या क्रमांकावर घसरला आहे. परंतु, आमच्या सरकारने दुग्ध व्यवसायात पुन्हा सहभाग घेतला असून, येत्या दोन वर्षांत आपले राज्य परत पहिल्या क्रमांकावर असेल, असा विश्वास दुग्ध विकास व पशुसंवर्धन मंत्री महादेव जानकर यांनी पत्रकार परिषदेत व्यक्त केला.एडगाव येथील तानाजी गुरव यांच्या निवासस्थानी मंत्री जानकर यांनी पत्रकारांशी संवाद साधला. यावेळी तहसीलदार संतोष जाधव, गटविकास अधिकारी श्रीराम शिरसाट, सभापती लक्ष्मण रावराणे, भाजपचे जिल्हा सरचिटणीस प्रमोद रावराणे, शिवसेनेचे विधानसभा मतदारसंघ प्रमुख जयेंद्र रावराणे, भाजप तालुकाध्यक्ष राजेंद्र राणे, जिल्हा परिषद सदस्यसुधीर नकाशे, माजी महिला व बालकल्याण सभापती स्नेहलता चोरगे, भाजप महिला जिल्हाध्यक्ष स्नेहा कुबल, प्रज्ञा ढवण, आदी उपस्थित होते.मंत्री जानकर म्हणाले की, शेतकऱ्यांनी दुग्धोत्पादन वाढवून संपूर्ण दूध शासकीय संघांना घालणे गरजेचे आहे. शासकीय संस्था भक्कम झाल्या तरच शेतकऱ्यांच्या गायीच्या दुधाला भविष्यात प्रतिलिटर ६५ रुपये दर मिळणार आहे. ते पुढे म्हणाले की, पशुसंवर्धन विभागातील अनेक पदे रिक्त आहेत. एमपीएससीद्वारे राज्यात पशुसंवर्धन अधिकारी पदे भरली जाणार असून, त्यातून जिल्ह्याला नेमणुका दिल्या जातील. तसेच शेतकऱ्यांच्या जनावरांवर तातडीने शस्त्रक्रिया होण्यासाठी व्हेटर्नरी व्हेईकल प्रत्येक तालुक्याला दिली जाणार आहे.चौकटधनगर समाजाला निश्चित आरक्षण मिळणारसरकारला धनगर समाजाला आरक्षण देण्याची इच्छा आहे का? असे विचारले असता, धनगर समाजाला निश्चितपणे आरक्षण मिळेल यात शंका नाही. मात्र, विरोधकांनी या मुद्याचे उगाच राजकारण करू नये. आरक्षणाचे राजकारण करणाऱ्यांनी किती वर्षे राज्य केले. तेव्हा त्यांना आरक्षण द्यावेसे का वाटले नाही? असा सवाल करीत एनडीएच्या बैठकीत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनीही आपणास धनगर समाजाच्या आरक्षणाबाबत आश्वासन दिले आहे. केवळ धनगरच नव्हे मराठ्यांनाही हे सरकार आरक्षण देण्यास कटिबद्ध आहे, असे महादेव जानकर यांनी सांगितले.माझं खातं लकी आहे!महादेव जानकर म्हणाले की, या खात्याचा कारभार करताना मुक्या प्राण्याची सेवा करायला मिळते. त्यामुळे पुण्यही लाभते. यापूर्वी या खात्याचा कारभार नारायण राणे, स्वर्गीय विलासराव देशमुख, बॅ. ए. आर. अंतुले यांनी पाहिला आहे. त्यांना प्राणिमात्रांचा आशीर्वाद (मुख्यमंत्रिपद) लाभला आहे. त्यामुळे माझं खातं लकी आहे, असे मिश्किल विधान करीत माझा पक्ष खूप लहान आहे. तरीही मला जे मिळालंय ते मित्रांमुळे, असे त्यांनी शेवटी सांगितले.