शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणच्या 'पीस प्लॅन'मध्ये मोठा घोळ! फारसी आणि इंग्रजी मसुद्यात आढळला फरक; युरेनियमच्या अटीवरून संभ्रम वाढला
2
'चमका हिंदुस्तान हमारा!'; अणुऊर्जा क्षेत्रात भारताचा 'करिश्मा'! रशियानंतर भारत दुसरा देश ठरला! ४०० वर्षांपर्यंत टेन्शन संपणार!
3
सस्पेन्स कायम! भारतीयांनो, इराण तात्काळ सोडा; युद्धविरामनंतर काही तासांत भारताने जारी केली सूचना
4
आयसीएल फिनकॉर्पचा नवीन एनसीडी इश्यू १० एप्रिल रोजी खुला होणार; १२.२५% पर्यंत परताव्याचा दावा
5
पाकिस्तानच्या मध्यस्थीचे 'डर्टी सीक्रेट'! १००० खोल्यांचा सौदा केला, आसिम मुनीर यांनी ट्रम्प यांना दिली ८,३०० कोटींची ऑफर
6
Ashok Kharat : अशोक खरातला न्यायालयीन कोठडी; उद्या पुन्हा नव्या गुन्ह्यात कोर्टात सादर करण्याचे आदेश
7
School bus Accident: काळजाचा ठोका चुकवणारा अपघात; ३५ विद्यार्थ्यांसह शालेय बस खड्ड्यात उलटली!
8
७ मिनिटांच्या बैठकीत निवडणूक आयुक्त म्हणाले, Get Lost...; डेरेक ओ ब्रायन यांचा गंभीर आरोप
9
नवऱ्याचे ९ महिलांसोबत संबंध, १४ वर्षांचा संसार मोडला; प्रसिद्ध अभिनेत्रीचा खुलासा, एकटीने करतेय मुलाचा सांभाळ
10
आसाराम बापूच्या मुलाचा घटस्फोट, पत्नीला द्यावी लागणार कोट्यवधी रुपयांची पोटगी, कोर्टाचे आदेश
11
Video : बॉयफ्रेंडला चीटिंग करताना रंगेहाथ पकडलं; भररस्त्यात गर्लफ्रेंडने धू-धू धुतलं, पण नंतर जे झालं…
12
इस्रायल तयार नव्हता...! ट्रम्प यांनी इराणला लुळा-पांगळा करण्याचा प्लॅन सांगितला; नेतान्याहू झटकन तयार झाले...
13
थायलंडच्या महाराजांना भेटायला गेले भारतीय राजदूत; समोर अधिकारी गुडघ्यावर बसले, कारण काय?
14
"बाबा, मला पोलीस नाही व्हायचं!" वडिलांचं स्वप्न बाजूला सारलं; आता स्विंगच्या जोरावर गाजवतोय आयपीएल
15
युद्धविराम १४ दिवसांचाच...! नंतर पुन्हा युद्ध सुरु होणार? ट्रम्प यांचा इशारा आणि नेतन्याहूंच्या अटी 
16
“PM मोदींचे अपयश, ट्रम्प यांनी इराण शस्त्रसंधीचे श्रेय चीन-पाकला दिले”; संजय राऊतांची टीका
17
RBI नं रद्द केला महाराष्ट्रातील 'या' बँकेचा परवाना; ग्राहकांच्या पैशांचं काय होणार? 
18
US Israel Iran War: युद्ध थांबलं? ट्रम्प यांची मोठी घोषणा, पण मोज्तबा खामेनेईंच्या एका वाक्याने पुन्हा खळबळ! म्हणाले..
19
Amravati Accident: कॅन्टीनला चहासाठी जाण्याच्या सवयीने चार युवकांचा घात; नागपूर-अकोला महामार्गावर ट्रकने कारला उडवले
20
इराणमधील संघर्ष थांबला, आता या दोन देशात तणाव वाढला, किम जोंगच्या सैन्याने डागली बॅलेस्टिक मिसाईल 
Daily Top 2Weekly Top 5

औद्योगिक सुरक्षेनिमित्त राज्यस्तरीय रॅली

By admin | Updated: March 5, 2016 00:36 IST

बुधवारी चिपळुणात : अडीच लाख कामगार सहभागी

कोल्हापूर : शासनाच्या औद्योगिक सुरक्षा व आरोग्य संचालनालयातर्फे (कामगार विभाग) राज्यस्तरीय औद्योगिक सुरक्षा रॅली काढण्यात येत आहे. नागपूरच्या बुटीबोरी औद्योगिक वसाहतीतून शुक्रवारी सुरू झाली. १२ मार्चपर्यंत राज्यातील विविध जिल्ह्यांतून ही रॅली जाणार आहे.कारखाने अधिनियम १९४८ या कायद्याच्या अंमलबजावणीस यावर्षी १३५ वर्षे पूर्ण होत आहेत. त्याचे औचित्य साधून राज्य शासनाचा औद्योगिक सुरक्षा विभाग, राष्ट्रीय सुरक्षा परिषद, विदर्भ अ‍ॅक्शन सेंटर व दी सेफ्टी कॉन्फिडरेशन आॅफ इंडियाच्या वतीने ही रॅली काढण्यात येत असल्याची माहिती कोल्हापूर विभागाचे सहसंचालक राजेंद्र खडामकर यांनी दिली. ही सुरक्षेची मशाल नागपूर, अकोला, नाशिक, औरंगाबाद, पुणे, कोल्हापूर, पालघर, ठाणे, रायगड विभागांतून जाणार आहे. प्रथमच आयोजिलेल्या रॅलीत राज्यभरातील सुमारे अडीच लाख कामगार सहभागी होत आहेत. औद्योगिक सुरक्षा व आरोग्य संचालनालयाच्या कोल्हापूर विभागात कोल्हापूरसह सांगली, रत्नागिरी, सिंधुदुर्ग जिल्ह्यांचा समावेश होतो. बुधवारी (दि. ९) चिपळूण येथे सुरक्षा मशालीचे आगमन होणार आहे. तिथे रॅली काढण्यात येणार आहे. त्यामध्ये कोल्हापूर विभागातील कामगार, अधिकारी सहभागी होणार आहेत. सुरक्षिततेच्या क्षेत्रात उत्कृष्ट काम केलेले कामगार, सुरक्षा अधिकाऱ्यांचा सत्कार होणार आहे.औद्योगिक क्षेत्रात सुरक्षेचे महत्त्व अनन्यसाधारण आहे. या रॅलीच्या माध्यमातून सुरक्षेची जाणीव वृद्धिंगत होण्याबरोबरच व्यवस्थापन व कामगार यांच्या प्रयत्नातून सुरक्षेचा संदेश पोहोचण्यास मदत होईल.- राजेंद्र खडामकर, सहसंचालक, औद्योगिक सुरक्षा व आरोग्य संचालनालय, कोल्हापूर विभाग