शहरं
Join us  
Trending Stories
1
पुढील ४ आठवडे उन्हाच्या झळा; पूर्वेकडील वाऱ्यांचा प्रभाव, पारा चाळिशी पार जाण्याचा अंदाज
2
सुरुंग पेरलेला होर्मुझचा नकाशा जारी; इराणने पुन्हा भरवली जगाला धडकी; अमेरिकेवर दबाव
3
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
4
पंथ, संप्रदायांच्या आधारे मंदिरांमध्ये प्रवेश दिल्यास हिंदू धर्मावर नकारात्मक परिणाम: सुप्रीम कोर्ट
5
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
6
केरळ, आसाम व पुद्दुचेरीत विक्रमी मतदान! कुठे बोटीचा प्रवास, तर कुठे पावसातही हजेरी
7
हॅकर्स म्हणतात, युद्धविरामाशी आमचा संबंध नाही; ‘हंदाला’कडून हल्ल्याची अमेरिका-इस्रायलला भीती
8
अनकॅप्ड मुकुल चौधरीची अविश्वसनीय खेळी! KKR च्या तोंडचा घास हिसकावत LSG ला जिंकून दिली मॅच
9
मुंबईला भारतातील पहिली नॉन-एसी ‘बंद दरवाजांची’ लोकल ट्रेन; उपनगरीय सेवेत होणार दाखल  
10
Wife Killed Husband: पतीची हत्या, पत्नीचा आक्रोश; प्रियंकाच दुःख बघून सगळे हेलावले, पण तिच निघाली मास्टरमाईंड
11
"आमचे हात अजूनही ट्रिगरवरच आहेत", खवळलेल्या इराणची इस्रायलला खुली धमकी, लेबनाननंतर आक्रमक
12
कोण आहे Mukul Choudhary? ‘आर्मी मॅन’च्या भूमीतला २१ वर्षीय ‘जवान’ बिग हिटरच्या रुपात कसा घडला?
13
Video: मुंबई विमानतळाच्या टर्मिनल १ मध्ये आगीचा भडका; प्रवेशद्वार बंद, धुराचे लोट बघून प्रवासी घाबरले
14
Latest Marathi News LIVE: इराणने हल्ला केला, तर आम्हीही निष्ठुरपणे उत्तर देऊ; इस्रायलच्या संरक्षण मंत्र्याचा इशारा
15
बॉलिंगसाठी 'ग्रीन' सिग्नल! तब्बल २५ कोटींचा ऑलराउंडर अखेर गोलंदाजीला आला; पहिल्याच षटकात रिषभ पंतची शिकार
16
Pune Crime: प्रेमात सगळं विसरली अन् प्रियकराच्या मदतीने सहा वर्षांच्या लेकराची केली हत्या, कारण...; पुणे जिल्ह्यातील घटना
17
KKR vs LSG : अजिंक्य रहाणेचा भन्नाट सिक्सर! बॅट निसटली तरीही चेंडू थेट सीमारेषेबाहेर (VIDEO)
18
उपराष्ट्रपती जे.डी. व्हान्स यांना पाकिस्तानात जायला वाटतेय भीती; US-इराण चर्चा फिस्कटणार?
19
"...तोपर्यंत आम्ही हल्ले करत राहू", इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांचा इशारा; हल्ल्याचे व्हिडीओही दाखवले
20
22 वर्षाचा बॉयफ्रेंड, ३५ वर्षाची गर्लफ्रेंड; दोघे रुममध्ये गेले आणि नंतर 'बेड बॉक्स'मध्ये मिळाला तिचा मृतदेह
Daily Top 2Weekly Top 5

राज्यस्तरीय पदांची तहान जिल्हास्तरीय पदांवर

By admin | Updated: April 22, 2015 00:26 IST

जिल्हा बॅँक निवडणूक : पदे नसल्याने बॅँकेच्या संचालकपदासाठी दिग्गज नेत्यांची प्रतिष्ठा पणाला

अशोक पाटील - इस्लामपूरतब्बल ६३ वर्षांपासून सुरू असलेली सांगली जिल्ह्यातील मंत्रिपदाची परंपरा राज्यातील यंदाच्या सत्ताबदलानंतर खंडित झाली. महामंडळे व अन्य मानाच्या पदांपासूनही जिल्हा वंचितच आहे. त्यामुळे राज्यस्तरीय पदांची ही तहान आता जिल्ह्यातील दिग्गज नेत्यांना जिल्हा बॅँकेच्या संचालकपदावर भागवावी लागत आहे. आजी-माजी आमदार, माजी मंत्री यांनी त्यासाठीच धडपड सुरू केली आहे. राज्याच्या राजकारणात कधीकाळी दबदबा निर्माण करणारे नेतेही जिल्हा बॅँकेच्या संचालकपदासाठी धडपडत असल्याचे चित्र आहे. जिल्ह्यात वसंतदादा पाटील, राजारामबापू पाटील, आर. आर. पाटील, माजी मंत्री एन. डी. पाटील, जयंत पाटील, मदन पाटील, पतंगराव कदम, शिवाजीराव नाईक, प्रतीक पाटील यांनी मंत्री म्हणून जिल्ह्याची ही परंपरा अखंडित ठेवली होती. राज्यातील सत्तांतरानंतर सांगली जिल्हा मंत्रिपदापासून वंचित राहिला आहे. आघाडी काँग्रेसमधील नेत्यांचे अनेक पिढ्यांपासून सहकारी संस्थांवर वर्चस्व आहे. सध्या त्यांच्याकडे मंत्रीपद, सत्ता नसल्याने या सर्वांनाच जिल्हा बँकेच्या सत्तेचे वेध लागले आहेत.वसंतदादा पाटील यांनी राज्यस्तरीय राजकारणात पाऊल टाकल्यानंतर कधीच जिल्हा पातळीवरील सहकारी संस्थेत लक्ष घातले नाही. कार्यकर्त्यांना न्याय देण्याच्या भूमिकेतून सांगली जिल्हा मध्यवर्ती बँकेवर गुलाबराव पाटील, बाजीराव बाळाजी पाटील यांना सलग ११ वर्र्षांची संधी दिली. या काळात जिल्हा मध्यवर्ती बँक नफ्यात होती. अलीकडील काही वर्षांत राज्य पातळीवरील नेत्यांनीही बँकेच्या निवडणुकीत हस्तक्षेप केल्याने बँकेचा कारभार एकहाती राहिला नाही. त्यामुळे बँक तोट्याच्या दिशेने वाटचाल करीत राहिली. केंद्रात आणि राज्यात भाजप-शिवसेनेचे सरकार आहे. सांगली जिल्ह्यात मात्र आ. डॉ. पतंगराव कदम, माजी मंत्री मदन पाटील, प्रतीक पाटील, शिवाजीराव देशमुख यांच्या नेतृत्वाखाली काँग्रेसची वाटचाल सुरू आहे. त्यांच्या सहकारी संस्था काही अपवाद वगळता सुरळीत सुरू आहेत. राष्ट्रवादीचे जयंत पाटील, विलासराव शिंदे, मानसिंगराव नाईक या दिग्गज नेत्यांसह इतर तालुक्यातील राष्ट्रवादी नेत्यांच्या काँग्रेसला तोडीस तोड सहकारी संस्था आहेत.आजची परिस्थिती पाहता मंत्रिपदापासून सांगली जिल्हा पोरका झाला आहे. त्यामुळेच की काय जिल्हा पातळीवरील बँकेच्या निवडणूक रिंगणात आजी, माजी आमदार, माजी मंत्री मोठ्या हिरीरीने उतरले आहेत.भाजप-सेनेच्या नेत्यांची धडपडखासदार संजय पाटील, आमदार अनिल बाबर, आमदार शिवाजीराव नाईक हे भाजपमध्ये दाखल झाले आहेत. ते यापूर्वी सर्वच पक्षांची चाचपणी करून आलेले आहेत, तर आमदार सुरेश खाडे हे भाजपचे एकनिष्ठ आहेत. त्यांच्याकडे सहकारी संस्थांचे जाळे नाही. अनिल बाबर यांनी आमदार असतानाही बँकेवर निवडून जाण्यासाठी अर्ज दाखल केला आहे.