इचलकरंजी : येथे राज्यस्तरीय आंतरमहाविद्यालयीन वक्तृत्व स्पर्धा आयोजित केली आहे. ही स्पर्धा रविवारी (दि.२०) सकाळी दहा वाजता दगडूलाल मर्दा मानव सेवा केंद्र, निरामय हॉस्पिटलजवळ होणार आहे. मनोरंजन मंडळ, श्री दगडूलाल मर्दा चॅरिटेबल व रिसर्च फौंडेशन, रोटरी क्लब सेंट्रल व इनरव्हिल क्लबच्यावतीने या स्पर्धेचे आयोजन केले आहे.
वक्तृत्व स्पर्धेकरीता नवे राष्टीय शैक्षणिक धोरण, स्वच्छ भारताचे वास्तव, निर्भया अजूनही भयग्रस्तच, कोरोनाकाळात काय कमावले काय गमावले, बदलत्या युगातील धार्मिक सहिष्णुता, रत्नाकर मतकरी-साहित्य आणि व्यक्तिमत्त्व हे विषय आहेत. ही स्पर्धा ज्युनियर, सिनीयर कॉलेज आणि पदव्युत्तर विद्यार्थ्यांना खुली राहील. नावनोंदणीची अंतिम मुदत १८ डिसेंबर आहे. इच्छुकांनी मनोरंजन मंडळ, दाते मळा, इचलकरंजी येथे संपर्क साधावा, असे आवाहन करण्यात आले आहे.