मनुष्यबळ विकास अकादमीचे अध्यक्ष अॅड. कृष्णजी जगदाळे यांच्या हस्ते संस्थेचे अध्यक्ष अरविंद मजलेकर, उपाध्यक्ष मधुकर काळेल यांनी हा पुरस्कार स्वीकारला. यावेळी अध्यक्ष मजलेकर म्हणाले, साने गुरुजी शिक्षण संस्थेकडून नेहमीच सामाजिक बांधीलकी जोपासली जाते. वर्धापनदिनी संस्थेने दिव्यांगांना साहित्याचे वितरण, शहीद जवानांच्या कुटुंबांना आर्थिक मदत, वृक्षारोपण, आरोग्य तपासणी, शिबिर व मार्गदर्शन, शिक्षण परिषद, गुणवंतांचा सन्मान, अनाथ बालगृहाला मदत, महापूर व कोरोना काळात मदत यांसह विविध कार्यक्रम राबविले आहेत. या सामाजिक कार्यामुळे संस्था प्रगतिपथावर आहे. २७ कोटी ठेवी असून, संस्थेस ‘अ’ वर्ग दर्जा मिळाला असल्याचे त्यांनी सांगितले.
याप्रसंगी संस्थापक अध्यक्ष आदगोंडा पाटील, राजगोंडा हुलिकिरे, सुरेश पाटील, सुरेखा कुंभार, शरद सुतार, मेहबुब मुजावर, संपत कोळी, प्रकाश नरुटे, लक्ष्मण कबाडे, दत्तात्रय कमते, जयश्री माने, नीता पाटील, महादेव कांबळे, मनीषा पाटील उपस्थित होते.