शहरं
Join us  
Trending Stories
1
"आमचे हात अजूनही ट्रिगरवरच आहेत", खवळलेल्या इराणची इस्रायलला खुली धमकी, लेबनाननंतर आक्रमक
2
Video: मुंबई विमानतळाच्या टर्मिनल १ मध्ये आगीचा भडका; प्रवेशद्वार बंद, धुराचे लोट बघून प्रवासी घाबरले
3
KKR vs LSG : अजिंक्य रहाणेचा भन्नाट सिक्सर! बॅट निसटली तरीही चेंडू थेट सीमारेषेबाहेर (VIDEO)
4
Pune Crime: प्रेमात सगळं विसरली अन् प्रियकराच्या मदतीने सहा वर्षांच्या लेकराची केली हत्या, कारण...; पुणे जिल्ह्यातील घटना
5
उपराष्ट्रपती जे.डी. व्हान्स यांना पाकिस्तानात जायला वाटतेय भीती; US-इराण चर्चा फिस्कटणार?
6
Latest Marathi News LIVE: मुंबई विमानतळावर लागली आग, टर्मिनल १ मधून धुराचे लोट; सर्व गेट केले बंद
7
"...तोपर्यंत आम्ही हल्ले करत राहू", इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांचा इशारा; हल्ल्याचे व्हिडीओही दाखवले
8
22 वर्षाचा बॉयफ्रेंड, ३५ वर्षाची गर्लफ्रेंड; दोघे रुममध्ये गेले आणि नंतर 'बेड बॉक्स'मध्ये मिळाला तिचा मृतदेह
9
KKR vs LSG: Finn Allen खराब पंचगिरीचा शिकार? दिग्वेश राठीनं टिपलेल्या झेलवरुन वादंग (VIDEO)
10
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
11
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
12
रशियाच्या पाणबुड्या महिनाभर ब्रिटनच्या समुद्रात लपलेल्या, काय करत होत्या? ब्रिटीशांच्या दाव्याने खळबळ...
13
KKR vs LSG : अर्जुन तेंडुलकरची नुसतीच हवा! Playing XI मध्ये मिळाली नाही जागा; अजिंक्य रहाणेचा गेम प्लॅनही फसला
14
टी-२० सामन्यात तब्बल ९ विकेट्स, एका षटकांत ४ बळी; कधीही न तुटणारा वर्ल्ड रेकॉर्ड कुणी बनवला?
15
ट्रम्प यांच्या दाव्याने खळबळ, १०० मिसाईल...! 'शांतीदूत' म्हणवून घेणारा पाकिस्तान 'बेनकाब'; चीनचा बुरखा फाटला
16
अजबच विनोद...! अमेरिका-इराण सीजफायरनंतर पाकिस्तानची थेट 'नोबेल' शांतता पुरस्काराची मागणी
17
Fashion On Bike: बाईकवर लॉन्ग राईडचा प्लॅन आहे? फॉलो करा 'या' फॅशन टिप्स; दिसाल कूल आणि डॅशिंग!
18
“मला माफ कर, चूक झाली”; प्रेमासाठी तरुणाचा हायव्होल्टेज ड्रामा; कॉलेजच्या भिंतींवर लावले पोस्टर्स
19
सुरक्षित होर्मुझ पार केले...१५,४०० मेट्रिक टन LPG गॅस भरलेले 'ग्रीन आशा' जहाज भारतात दाखल
20
CBSE चा नवा अल्टीमेटम..! आता सहावीच्या वर्गापासून शिकावी लागणार तिसरी भाषा; काय आहे R3 नियम?
Daily Top 2Weekly Top 5

लसीकरणाचे राज्य सरकारला गांभीर्य नाही

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 1, 2021 04:18 IST

जयसिंगपूर : सर्वत्र लसीचा तुटवडा असला तरी केंद्र सरकारने ४५ पुढील सर्वांची जून अखेर लसीकरण करण्याची तयारी केली आहे. ...

जयसिंगपूर : सर्वत्र लसीचा तुटवडा असला तरी केंद्र सरकारने ४५ पुढील सर्वांची जून अखेर लसीकरण करण्याची तयारी केली आहे. अठरा वर्षांपुढील लसीकरणाची जबाबदारी राज्य सरकारवर देण्यात आली आहे. पण म्हणावे तितके गांभीर्य राज्य सरकारने न घेतल्याचा आरोप भाजपाचे प्रदेशाध्यक्ष आमदार चंद्रकांत पाटील यांनी केला.

जयसिंगपूर येथील डॉ. जे. जे. मगदूम ट्रस्टच्या होमिओपॅथिक व आयुर्वेदिक कॉलेजच्या रुग्णालयामध्ये कोविड उपचार केंद्राची पाहणी आमदार पाटील यांनी केली. याठिकाणी करण्यात आलेली सुविधा निश्चितच रुग्णांसाठी उपयुक्त असल्याचे सांगून ते म्हणाले, कोरोनाची दुसरी लाट कमी झाली असली तरी तिसरी लाट भयानक येण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे. त्यामुळे सर्वांनी काळजी घेण्याची गरज आहे.

प्रारंभी स्वागत ट्रस्टचे अध्यक्ष डॉ. विजयराज मगदूम यांनी केले. तर रुग्णालयाच्या कार्याची माहिती ट्रस्टच्या उपाध्यक्षा अ‍ॅड. सोनाली मगदूम यांनी दिली. यावेळी रुग्णालयात कार्यरत असलेल्या डॉक्टर व पारिचारिका यांचा सन्मान आमदार पाटील यांच्याहस्ते करण्यात आला. यावेळी नगराध्यक्षा डॉ. नीता माने, पृथ्वीराज यादव, राजवर्धन निंबाळकर, मंडल अध्यक्ष रमेश यळगुडकर, मिलिंद भिडे, नगरसेवक अरविंद माने, विठ्ठल पाटील यांच्यासह मान्यवर उपस्थित होते.

फोटो - ३१०५२०२१-जेएवाय-०१

फोटो ओळ - जयसिंगपूर येथे डॉक्टर व पारिचारिका यांचा आमदार चंद्रकांत पाटील यांच्या हस्ते सन्मान करण्यात आला. यावेळी डॉ. विजयराज मगदूम, अ‍ॅड. सोनाली मगदूम, विठ्ठल पाटील उपस्थित होते.