शहरं
Join us  
Trending Stories
1
नाशिकमध्ये नामांकित कंपनीतील ८ जणींचा विनयभंग; एकीवर 'अतिप्रसंग'; ६ जणांना अटक
2
शस्त्रसंधीमुळे अदानी-अंबानींवर डॉलर्सचा पाऊस; जगातील श्रीमंतांच्या यादीत स्थान वधारले
3
आजचे राशीभविष्य, ०९ एप्रिल २०२६: योग्य क्षेत्रातील गुंतवणूक आज लाभदायक; रागावर नियंत्रण ठेवावं लागेल
4
युद्ध की शांतता? अमेरिकेला काहीतरी एक निवडावं लागेल, इराणचा थेट इशारा; लेबनॉनवरून पेच वाढला!
5
अजूनही ५०% जुन्या वाहनांना HSRP नंबर प्लेट नाही; कालमर्यादेबाबत स्पष्टता नसल्याने अनेकांची पाठ
6
NATO देशांना ट्रम्प यांनी सुनावले, मदत न केल्याने व्यक्त केली तीव्र खंत; इशारा देत म्हणाले...
7
एलिफंटा उत्खननात दोन विशाल साठवण भांड्यांचा शोध; ऐतिहासिक महत्त्वात भर
8
शिखर बँक घोटाळा: रोहित पवारांच्या अर्जावर गुणवत्तेनुसार निर्णय घ्या! EDची विशेष न्यायालयाला विनंती
9
१२,३०० हल्ल्यांनंतरही इराणची ताकद कायम कशी? 'ही' आहेत यामागची कारणं
10
वैमानिकांच्या नव्या वेळापत्रकाला स्थगिती; मनुष्यबळ कमतरतेमुळे डीजीसीएचा निर्णय
11
एक लाख तीन हजार कोटींची वीजग्राहकांकडे थकबाकी; कृषी ग्राहकांनी थकवले ८० हजार कोटी
12
विशेष लेख: चला, सगळे मिळून स्त्री-शक्तीला सक्षम करूया!
13
विशेष लेख: पंजाबमधल्या भगव्या छावणीत आता ‘काँग्रेसयुक्त भाजप’!
14
अग्रलेख: स्वल्पविरामाचा पूर्णविराम व्हावा! तात्पुरत्या युद्धविरामाची घोषणा अन् अख्ख्या जगाला दिलासा
15
होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! तेल जहाजांची वाहतूक थांबली, इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराणचा दणका
16
DC vs GT : मिलरची एक चूक नडली! दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध गुजरात टायटन्सनं शेवटच्या चेंडूवर मारली बाजी
17
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
18
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
19
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
20
DC vs GT, David Miller retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना किलर मिलरनं सोडलं मैदान; मग...
Daily Top 2Weekly Top 5

आजऱ्यात राज्य नाट्यमहोत्सव

By admin | Updated: December 31, 2015 00:35 IST

८ ते १४ जानेवारीला आयोजन : शंकर टोपले, आय. के. पाटील यांची माहिती

आजरा : आजरा येथील ज्येष्ठ नाट्य दिग्दर्शक कै. रमेश टोपले यांच्या स्मृतिप्रीत्यर्थ नवनाट्य मंडळ आजरा यांच्यावतीने ८ ते १४ जानेवारीअखेर दुसऱ्या राज्यस्तरीय नाट्यमहोत्सवाचे आयोजन करण्यात आल्याची माहिती संयोजन समितीचे अध्यक्ष शंकर टोपले व कार्यवाह आय. के. पाटील यांनी दिली.या नाट्यमहोत्सवामध्ये पुढील नाट्य प्रयोगांचे सादरीकरण करण्यात येणार आहे. शुक्रवारी (दि. ८) ‘आनंदडोड’ सादरकर्ते राजयोग, पुणे. शनिवारी (दि. ९) ‘संगीत ययाती आणि देवयानी’ सादरकर्ते अ‍ॅक्टिव्ह गु्रप सांगली. रविवारी (दि १०) ‘विच्छा माझी पुरी करा’ सादरकर्ते सुगुण कोल्हापूर. सोमवारी (दि. ११) ‘याच दिवशी याच वेळी’ सादरकर्ते सिद्धांत कुडाळ, मंगळवारी (दि. १२) ‘साखर खाल्लेला माणूस’, चिन्मय कोल्हापूर. बुधवारी ( दि. १३) ‘अजून यौवनात मी’, सादरकर्ते पी. आय. कमिटी, पुणे, गुरुवारी (दि. १४) ‘सारे प्रवासी घडीचे’ सादरकर्ते बाबा वर्दम थिएटर्स कुडाळ.सादर होणाऱ्या सात नाटकांतून प्रेक्षकांच्या पसंदीने काढण्यात येणाऱ्या प्रथम तीन क्रमांकांच्या नाटकांना रसिक पसंदी मानचिन्ह, प्रमाणपत्र देण्यात येणार आहे. सर्वोत्कृष्ट तीन दिग्दर्शकांना रोख ३००१, २००१, १००१ मानचिन्ह व प्रमाणपत्र दिले जाणार आहे. सर्वोत्कृष्ट अभिनयाकरिता तीन पारितोषिके असून ३००१, २००१, १००१ मानचिन्ह, प्रमाणपत्र देण्यात येणार आहे. पारितोषिक वितरण समारंभ शुक्रवारी (दि.१५) सायंकाळी ६.३० वाजता होणार आहे. यावेळी ‘आमची माती आमची माणसं’ या कार्यक्रम होणार आहे, असेही टोपले व पाटील यांनी स्पष्ट केले.यावेळी डॉ. श्रद्धानंद ठाकूर, प्रा. सुधीर मुंज, मंदार बापट, राकेश करमळकर यांच्यासह मान्यवर उपस्थित होते. (प्रतिनिधी)