शहरं
Join us  
Trending Stories
1
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
2
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
3
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
4
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
5
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
6
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
7
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
8
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
9
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
10
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
11
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलरचा ट्रेंड; ब्लू, रेड, गोल्डन केसांवरुन जाणून घ्या व्यक्तिमत्वाचं रहस्य
12
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
13
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
14
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
15
सख्ख्या आतेभावानेच बहिणीवर केला अत्याचार; नराधम मुलाला धडा शिकवण्यासाठी आईनेच गाठले पोलीस स्टेशन
16
भूमिपूजन झालं, पण 'पॉड टॅक्सी' नेमकी असणार तरी कशी? फायदा काय? इत्थंभूत माहिती समजून घ्या २ मिनिटांत!
17
"मीरा भाईंदरला ३० टक्के जागा मेहतांच्या मालकीची, १० टक्के..."; मेट्रो उद्घाटनात रंगला संवाद
18
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
19
धोक्याची घंटा! तुम्हीही जेवताना फोन वापरताय? एका चुकीमुळे आतड्यांचं होतं गंभीर नुकसान
20
Travel : हिमालयातील निळ्याशार पाण्याचा स्वर्ग! 'चंद्रताल'ला जाण्याचा प्लॅन करताय तर 'हे' नक्की वाचा
Daily Top 2Weekly Top 5

‘क्लीन चिट’ची एक खिडकी योजना सुरूच

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 12, 2018 01:13 IST

कोल्हापूर : भाजप-शिवसेनेच्या मंत्र्यांच्या भ्रष्टाचाराचे अनेक पुरावे दिले; परंतु त्यांच्यावर कारवाई करण्याऐवजी मुख्यमंत्र्यांनी ‘क्लीन चिट’ देण्याची एक खिडकी योजना सुरू केली असल्याची खरमरीत टीका विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे-पाटील यांनी केली आहे.बुधवारी कोल्हापूरच्या दौऱ्यावर आलेल्या विखे-पाटील यांनी पत्रकारांशी बोलताना राज्यातील सद्य:स्थितीवर कोरडे ओढले. ते म्हणाले, अहमदनगरचा प्रकारहा पूर्ववैमनस्यातून असला तरी निषेधार्ह ...

कोल्हापूर : भाजप-शिवसेनेच्या मंत्र्यांच्या भ्रष्टाचाराचे अनेक पुरावे दिले; परंतु त्यांच्यावर कारवाई करण्याऐवजी मुख्यमंत्र्यांनी ‘क्लीन चिट’ देण्याची एक खिडकी योजना सुरू केली असल्याची खरमरीत टीका विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे-पाटील यांनी केली आहे.बुधवारी कोल्हापूरच्या दौऱ्यावर आलेल्या विखे-पाटील यांनी पत्रकारांशी बोलताना राज्यातील सद्य:स्थितीवर कोरडे ओढले. ते म्हणाले, अहमदनगरचा प्रकारहा पूर्ववैमनस्यातून असला तरी निषेधार्ह आहे. त्याचे समर्थन कुणी करणार नाही.मात्र त्यामध्ये राजकीय सूडबुद्धीने कारवाई होता कामा नये. पोलीस अधिकाºयांच्या हातात अधिकार राहिले नसून, ते सरकारच्या हातातील बाहुले झाले आहेत. राज्यात कायद्याचा धाक राहिलेला नाही.जिल्हा पोलीसप्रमुखांच्या कार्यालयावर हल्ला करण्याचा प्रकार धक्कादायक असून, विशेष पथकाद्वारे या प्रकाराची चौकशी व्हावी.शिवसेनेचा समाचार घेताना विखे-पाटील म्हणाले, एकीकडे मुंबईत महापालिकेमध्ये सत्ता असताना ज्या दुर्घटना घडल्या, तेथे कोणतीही कारवाई करायची नाही आणि दुसरीकडे अहमदनगरला जेव्हा काही होते तेव्हा कारवाईची मागणी करायची हे दुटप्पी धोरण आहे. शिवसेनेकडून मुंबई, ठाण्यामध्ये केवळ बिल्डरांचे हितसंबंध जोपासत आर्थिक हितसंबंध जपण्याचे काम सुरू आहे. आम्ही सरकारच्या कारभाराची लक्तरे वेशीवर टांगली म्हणूनच राज्यात सरकारविरोधी वातावरण तयार झाले आहे. मुंबई महापालिकेवेळी एकमेकांची औकात काढणाºयांची आता बदललेल्या वातावरणामुळे भाषा बदलली आहे. सुरुवातीला ‘एकला चलो रे’ची भाषा बोलणारे भाजपचे नेते आता शिवसेनेला युतीचे आवाहन करीत आहेत.जागरण यात्रेची कोल्हापुरातून सुरुवातकेंद्र आणि राज्य सरकारच्या कारभाराविरोधात महाराष्ट्रात जागरण यात्रा काढण्यात येणार आहे. कोल्हापुरातूनच या यात्रेची सुरुवात करण्याचे नियोजन असून त्यासाठी कॉँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष राहुल गांधी यांना येण्याची विनंती केली आहे. अखिल भारतीय कॉँग्रेस कमिटीकडे हा प्रस्ताव गेला असून, लवकरच त्यावर शिक्कामोर्तब होईल. राज्यातील प्रत्येक मतदारसंघात ही यात्रा नेली जाणार आहे, असे विखे-पाटील यांनी सांगितले.