शहरं
Join us  
Trending Stories
1
अमरावती-अकोला महामार्गावर भीषण अपघात; चहा पिऊन परतणाऱ्या ४ तरुणांचा जागीच मृत्यू
2
चमत्कार, वशीकरण नाही तर ‘ही’ ट्रिक वापरून केलं महिलांचं शोषण, SITसमोर खरातने दिली कबुली
3
घरगुती गॅस सिलिंडर स्वस्त होणार? एलपीजी आणि पीएनजी 'टॅक्स फ्री' करण्याची मागणी; किती दिलासा मिळेल?
4
IPL 2026: नाव मोठं दर्शन खोटं! आयपीएलच्या पहिल्याच आठवड्यात फ्लॉप ठरले 'हे' स्टार खेळाडू
5
TATA Group: टाटा समूहाचे ‘हुकुमाचे एक्के’ फेल? २९ हजार कोटींच्या प्रचंड तोट्याचा अंदाज, काय आहेत डिटेल्स?
6
व्हायरल 'IIT बाबा'ने गुपचूप लग्न उरकलं अन् फ्यूचर प्लॅनिंगही सांगितलं! आता त्याची पत्नी म्हणते.. 
7
रेल्वे रुळावर गॅस सिलेंडर ठेवून प्रवाशांचा काळ बनणार होते 'ते' दहशतवादी; एटीएसचा मोठा खुलासा!
8
केंद्र सरकारचा मोठा निर्णय! ५ किलो सिलेंडरसंदर्भात सर्व राज्य सरकारांना पत्र; दिले महत्वाचे आदेश
9
मोजतबा खामेनेई कोमात, ना युद्धाची माहिती, ना..., अमेरिका-इस्राइलला ठावठिकाणाही कळला?
10
Gold Silver Price Today: सोनं-चांदी झाली स्वस्त... लग्नसराईच्या कालावधीत खरेदीची वाट पाहत असाल तर पाहा काय आहेत नवे दर?
11
वडील आणि मुलांचं अपहरण, पण वाटेत गाडीचा भीषण अपघात, तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू, तर...
12
Ghatkopar Crime: घाटकोपरमध्ये मराठी तरुणाला मारहाण; शौचालय वापरल्याचा राग, मनसे धडकताच गुजराती व्यावसायिक गायब
13
Baramati bypoll Election: बारामतीत सुनेत्रा पवारांविरुद्ध ५५ अर्ज; काँग्रेसच्या आकाश मोरेंचाही अर्ज दाखल, हाकेंची माघार
14
ट्रम्प यांची एक धमकी अन् जागतिक बाजारात भूकंप! तेलाचा भडका, सोन्यानंही दीड लाखांचा टप्पा गाठला; भारताचं टेन्शन वाढलं
15
लग्नानंतर ४ महिन्यांतच सूरज चव्हाण होणार बाबा? पत्नी संजनाचे बेबी शॉवरचे फोटो व्हायरल
16
एकल पदाच्या पदोन्नती, भरतीमध्ये आरक्षण नाहीच! आजवरचे सगळे आदेश रद्द करून काढला नवा शासन निर्णय
17
Home Cleaning Schedule: पाहुणे कधीही येऊ दे, तुमचं घर असेल नेहमी रेडी; फॉलो करा 'हे' साधे क्लीनिंग शेड्युल!
18
"तोपर्यंत इराणला पत्ताही नव्हता"; अमेरिकेतील 'त्या' खबऱ्यामुळे अडकले असते दोन सैनिक; ट्रम्प यांचा खुलासा
19
Stock Markets Today: Sensex मध्ये ७५० अंकांची मोठी घसरण, निफ्टी २०० अंकांनी घसरला; ऑटो-रियल्टी इंडेक्स १-१ टक्क्यांनी घसरले
20
‘भळाभळा रक्त वाहत होते, पण तो…’ ट्रम्प यांनी सांगितली इराणमध्ये अडकलेल्या ‘त्या’ सैनिकाच्या शौर्याची कहाणी  
Daily Top 2Weekly Top 5

शिंदेवाडीत राज्यस्तरीय कबड्डी स्पर्धेला प्रारंभ

By admin | Updated: January 30, 2015 00:16 IST

४० संघाचा सहभाग : ओमसाई, ताराराणी यांची विजयी सलामी

मुरगूड : महाराष्ट्र राज्य व कोल्हापूर जिल्हा कबड्डी असोसिएशनच्या मान्यतेने व शिंदेवाडी (ता. कागल) येथील नवजवान तरुण मंडळाच्यावतीने आयोजित केलेल्या पुरुष व महिला गटातील राज्यस्तरीय कबड्डी स्पर्धेला आज, गुरुवारी शानदार सुरुवात झाली. सर पिराजीराव घाटगे क्रीडा संकुलामध्ये चार मैदानांवर सामने सुरू असून, चार दिवस चालणाऱ्या या स्पर्धेत दोन्ही गटात चाळीस संघानी सहभाग घेतला आहे. उद्घाटनाच्या सामन्यात ओमसाई क्रीडा मंडळ, बोरीवली व ताराराणी स्पोर्टस्, कोल्हापूर यांनी विजयी सलामी दिली.क्रीडा ज्योत प्रज्वलित करून मिरवणूक क्रीडा संकुलामध्ये आणली. यावेळी क्रीडा ध्वजारोहण वरळी तालुका राष्ट्रवादी कॉँग्रेसचे उपाध्यक्ष बाळासाहेब गुजर यांच्या हस्ते झाले. दीपप्रज्वलन सुनीलराज सूर्र्यवंशी, शाहू कारखान्याचे संचालक अमरसिंह घोरपडे, आर. के. पाटील, बिद्रीचे संचालक वसंत पाटील, शाहू दूध संघाचे संचालक संजय पाटील, अनंत फर्नांडीस, विलास गुरव, प्रा. चंद्रकांत जाधव, दिगंबर परीट, रविराज सावडकर यांच्या हस्ते पार पडले.स्पर्धेचे संयोजक व बिद्री कारखान्याचे संचालक दत्तात्रय खराडे यांनी प्रास्ताविक केले. यावेळी सुनीलराज सूर्यवंशी, प्रा. चंद्रकांत जाधव, दिगंबर परीट, रविराज सावडकर यांनी मनोगत व्यक्त केले. रामचंद्र खराडे यांनी आभार मानले.दरम्यान, क्रीडांगण एकवर झालेला महिलांचा सामना ताराराणी, कोल्हापूर या संघाने एकहातीच जिंकला, मध्यंतरापर्यंत या संघाने आजरा महाविद्यालयाच्या संघावर ३९-०७ अशा गुण फरकांनी तब्बल ८२ गुणांची आघाडी घेतली होती. ताराराणीकडून राष्ट्रीय खेळाडू अरुणा सावंत, शुभदा माने, पूजा पाटील यांनी उत्कृष्ट चढाया केल्या. आजरा संघाकडून वर्षा साबळे, भाग्यश्री पाटील, सोनाली होलम यांंनी ताराराणीचे आक्रमण थोपवण्याचा प्रयत्न केला; पण शेवटी ५१-१३ अशा अंतिम गुणांनी ताराराणी संघाने हा सामना जिंकून विजयी सलामी दिली.पुरुष गटामध्ये ओमसाई, बोरीवली या संघाने पहिल्यापासूनच सामन्यावर चांगली पकड ठेवली होती. या संघातील किरण घाटगे, कुलदीप माईनकर, ओंकार रुंदाणे, प्रथमेश मांजरेकर या खेळाडूंनी चांगला खेळ केल्याने मध्यंतरापर्यंत युवा स्पोर्टस्, आणजे संघाला केवळ १ गुणच मिळवता आला. तब्बल १७ गुणांची आघाडी घेतलेल्या बोरीवलीच्या खेळाडूंना रोखण्यासाठी आणाजेच्या सतीश जाधव, विनायक पाटील, महेश जाधव, मोहन पाटील या खेळाडूंनी प्रयत्न केला; पण शेवटी २४ गुणांनी ओमसाई, बोरीवली या संघाने हा सामना जिंकत विजयी सलामी दिली. रात्री उशिरापर्यंत चारही मैदानावर सामने सुरू होते.सामान्यांना प्रो-कबड्डीचाच रंगढंगशिंदेवाडी या छोट्याशा गावात सामने भरवल्याने खेळाडू व प्रशिक्षकांनी मंडळाचे कौतुक केले. अगदी प्रो-कबड्डी सामन्याच्या मैदानाला लाजवेल अशी मैदाने, आकर्षक व्यासपीठ, प्रेक्षकांसाठी मोठ्या गॅलरी या सर्वांमुळे सर पिराजीराव घाटगे क्रीडानगरी सजली आहे. मुरगुड येथे सुरू असलेल्या राज्यस्तरीय कबड्डी सामन्यातील क्षण.