शहरं
Join us  
Trending Stories
1
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
2
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
3
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
4
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
5
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
6
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
7
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
8
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
9
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
10
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
11
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
12
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
13
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
14
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
15
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
16
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
17
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
18
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
19
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
20
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
Daily Top 2Weekly Top 5

कोल्हापुरात चिल्लर पार्टीच्या समांतर चित्रपट चळवळीस प्रारंभ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 6, 2017 19:36 IST

कोल्हापूर : चिल्लर पार्टी विद्यार्थी चळवळीतर्फे बालचित्रपट चळवळीबरोबरच आता मोठ्यांसाठी समांतर चित्रपट चळवळीस रविवारी प्रारंभ करण्यात आला. या चळवळीअंतर्गत दाखविण्यात आलेल्या पहिल्याच चित्रपटास उदंड प्रतिसाद मिळाला. बर्थ आॅन नेशन हा सत्य घटनेवर आधारीत चित्रपटाने या चळवळीला कोल्हापुरात प्रारंभ झाला.

ठळक मुद्दे पहिल्याच चित्रपटास प्रतिसाद बर्थ आॅफ नेशनने सुरुवात

कोल्हापूर : चिल्लर पार्टी विद्यार्थी चळवळीतर्फे बालचित्रपट चळवळीबरोबरच आता मोठ्यांसाठी समांतर चित्रपट चळवळीस रविवारी प्रारंभ करण्यात आला. या चळवळीअंतर्गत दाखविण्यात आलेल्या पहिल्याच चित्रपटास उदंड प्रतिसाद मिळाला. बर्थ आॅन नेशन हा सत्य घटनेवर आधारीत चित्रपटाने या चळवळीला कोल्हापुरात प्रारंभ झाला.लहान मुलांमध्ये देश-विदेशांतील चित्रपट पाहण्याची आवड जोपासावी म्हणून दर महिन्याच्या शेवटच्या रविवारी चिल्लर पार्टी विद्यार्थी चळवळीमार्फत बालचित्रपट दाखविण्यात येतात. याला यश मिळाल्यानंतर माणसाने माणसाशी माणसासारखे वागो असा हेतू घेउन ही समांतर चित्रपटाची चळवळ चिल्लर पार्टीतर्फे सुरु करण्यात आली.

साळोखेनगर येथील कोपार्डेकर शाळेत रविवारी समांतर चित्रपट चळवळीला बळ देण्यासाठी अनेक चित्रपट रसिकांनी उपस्थिती लावली.ज्येष्ठ रंगकर्मी पवन खेबुडकर यांच्या हस्ते या चळवळीस प्रारंभ करण्यात आला. यावेळी प्रभाकर आरडे, कोपार्डेकर शाळेचे संस्थापक मिलिंद कोपार्डेकर, डॉ. अनमोल कोठडिया, रविंद्र शिंदे, टी. आर. गुरव, भोजने, चंद्रकांत निकाडे, सुधाकर सावंत, मिलिंद नाईक उपस्थित होते.पवन खेबुडकर यांनी समांतर चित्रपट चळवळीमुळे चित्रपट पाहण्याच्या अभिरुचीत बदल होईल, अशी अपेक्षा व्यक्त करुन या चळवळीला शुभेच्छा दिल्या. यावेळी प्रभाकर आरडे यांनीही या समांतर चित्रपट चळवळीला भरभरुन प्रतिसाद मिळेल, अशी अपेक्षा व्यक्त केली.चिल्लर पार्टीचे मिलिंद यादव यांनी एेंशीच्या दशकात थांबलेल्या या समांतर चित्रपट चळवळीमुळे नव्या चळवळीला प्रारंभ होईल. मानवी समाजाला काळिमा फासणाºया इतिहासकाली घटनांची पुनरावृत्ती होउ नये, म्हणून वेगवेगळ्या क्षेत्रात प्रयत्न सुरु आहेत. स्वार्थीपणा, ढोंंगीपणा, भ्रष्टाचार, धर्मवाद, दहशतवाद या मुळे समाज पोखरुन निघाला आहे, अशा प्रवृत्तीला रोखण्यासाठी चित्रपट माध्यमातील चांगल्या चित्रपटांची अभिरुची उपयोगात येईल, अशी अपेक्षा व्यक्त केली.गुलामांना स्वातंत्र्यप्राप्तीची आशा दाखविणाºया नेट टर्नर या साक्षर गुलामाच्या उद्रेकाचा आणि एका देशाच्या जन्माची कथा सांगणारा हा सत्य घटनेवरील आधारित २0१६ मधील चित्रपट यावेळी दाखविण्यात आला.