पन्हाळा : पर्यटकांवर अवलंबून असणारे किल्ले पन्हाळा गडावरील छोटे व्यावसायिक धारक व किल्ले पन्हाळगड मार्गदर्शक गाईड यांचा उदरनिर्वाहाचा प्रश्न तत्काळ मार्गी लावावा याबाबत पन्हाळगड येथे रास्ता रोको आंदोलन करण्यात आले. सुमारे दीड तास आंदोलन सुरू होते. जनतेच्या उपासमारीला स्थानिक प्रशासन जबाबदार असून पन्हाळगड लवकरात लवकर पर्यटकांसाठी सुरू करावा, या मागणीचे निवेदन मुख्याधिकारी स्वरूप खारगे यांना देण्यात सुमारे दीड तासाच्या आंदोलनामुळे सरकारी कर्मचाऱ्यांची पन्हाळ्यावर येण्याची चांगलीच गोची निर्माण झाली. निवेदन दिल्यानंतर आंदोलन मागे घेण्यात आले. यावेळी राष्ट्रीय बहुजन महासंघाचे अध्यक्ष राजीव सोरटे, उपाध्यक्ष तुकाराम कांबळे, संदीप कांबळे, शीतल गवंडी, अर्जुन कासे, मारुती माने, प्रकाश राऊत, शहाबाज मुजावर, शक्ती सोरटी, सचिन कासे, केवल कांबळे, प्रवीण शिंदे, कुलदीप बच्चे, शशिकांत बच्चे, संग्राम बनकर, सर्जेराव पाटील, भगवान भाकरे, माजी नगरसेवक रवींद्र धडेल, पोलीस निरीक्षक ए.डी. फडतरे आधी उपस्थित होते.
फोटो------- रास्ता रोकोमुळे वाहनांच्या लागलेल्या रांगा.
दुसऱ्या फोटोत निवेदन स्वीकारताना मुख्याधिकारी स्वरूप खारगे व मान्यवर.