शहरं
Join us  
Trending Stories
1
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
2
"...तर भारत वर्षाला ३०० प्लुटोनियम अणुबॉम्ब बनवेल!"; कलपक्कमच्या यशानं पाकिस्तानच्या पोटात गोळा, फक्त भीतीनंच हादरला
3
"जे काम भारताने करायला हवे होते, ते दहशतवाद पसरवणाऱ्या देशाने केले..."; मोदी सरकारवर ओवेसींचा निशाणा
4
अमेरिकेवर विश्वास नाही, रशिया-चीनने सुरक्षेची हमी द्यावी; इराणची मोठी मागणी...
5
अमेरिका-इराण युद्धात सहभागी न होताच एका मुस्लीम देशाचा झाला तगडा फायदा; कमावणार पैसाच पैसा
6
"डोनाल्ड ट्रम्प असे व्यक्ती नाहीत ज्यांच्याशी...!"; शस्त्रसंधीनंतर काही तासांतच अमेरिकेचा इराणला इशारा, तणाव कायम
7
"अशोक खरातसोबत असलेली कोणती महिला बेशुद्ध वाटते?", शर्मिला ठाकरे संतापल्या, महिलांना सुनावले
8
Jasprit Bumrah Unwanted Records : बुमराहच्या नावे लाजिरवाणी 'हॅटट्रिक'! ८ वर्षांनी आली 'ही' वेळ
9
अमेरिका, इस्रायलचे हल्ले सुरु झाले, इराणमध्ये ३००० भारतीय विद्यार्थी होते...; भारतातील राजदुतांनी पै-पाहुण्यांना, ओळखीच्यांना फोन करायला सुरुवात केली...
10
अमेरिका-इराण युद्धविरामानंतर केंद्र सरकारचा मोठा निर्णय; LPG पुरवठ्याबाबत नवा फॉर्म्युला तयार
11
ही कसली सीझफायर? लावन रिफायनरीनंतर सिर्री बेटही स्फोटांनी हादरले; तेलाच्या साठ्यांवर हल्ले?
12
आगीतून फुफाट्यात! बाईक चोरली अन् ट्रॅफिक नियमही मोडला; चोराचा फोटो पोहोचला मालकाच्या मोबाईलवर
13
Tech Tips: कोणालाही न कळता कॉल रेकॉर्डिंग कसे करावे? ९९% लोकांना माहित नाही ही सोपी ट्रिक!
14
इराणसोबत युद्धविराम करून ट्रम्प यांनी युद्धातून अंग काढले; आता इस्रायलला चुकवावी लागणार किंमत
15
Health Tips: लघवीला दुर्गंधी म्हणजे केवळ उष्णता नव्हे, तुमच्या शरीराने दिलेला 'हा' गंभीर इशारा असू शकतो!
16
इराणसोबत धोका? सीझफायरनंतर काही तासांतच लावन बेटावरील तेल रिफायनरीमध्ये भीषण स्फोट, जगाचे कान टवकारले...
17
'स्ट्रेट ऑफ होर्मुझ'मध्ये ट्रॅफिकजाम; युद्धविरामानंतरही १०००+ जहाजे अडकून पडली...
18
इराण-अमेरिका युद्धबंदीने जग सुखावलं, पण 'हा' देश भडकला! पाकिस्तानच्या 'त्या' खेळीमुळे मित्रराष्ट्र नाराज
19
Summer Special: सुकी भेळ करायची तर 'हा' सिक्रेट' मसाला हवाच, वाढवतो सुक्या भेळेची लज्जत
20
मोठी बातमी! इराण युद्धामुळे भारतीय अर्थव्यवस्थेसमोर निर्माण झाली ५ मोठी संकटे; आरबीआय गव्हर्नर संजय मल्होत्रांचा महागाईचा इशारा
Daily Top 2Weekly Top 5

पंजे प्रतिष्ठापनेला प्रारंभ

By admin | Updated: October 29, 2014 00:12 IST

भाविकांची गर्दी : बाबूजमालचा ‘नाल्या हैदर’ शनिवारी भेटीला

कोल्हापूर : संस्थानकालीन गुरुवार पेठेतील बाबूजमाल तालीम मंडळाचा ‘हजरतपीर नाल्या हैदर कलंदर’ या पीरपंजाची विधीवत पद्धतीने प्रतिष्ठापना झाली. शहरात आज, सोमवारपासून पीरपंजा प्रतिष्ठापनेला सुरुवात झाली. आज दुसऱ्या दिवशी बाबूजमाल येथील पंजाचा नवस फेडण्यासाठी भाविकांची रेलचेल सुरू होती. दरम्यान, उद्या मंगळवारी तिसऱ्या दिवशी बहुतांश: शहरातील पीरपंजाची प्रतिष्ठापना होते.हिंदू-मुस्लिम ऐक्याचे प्रतीक असलेला मोहरम सणास काल(रविवार)पासून प्रारंभ झाला. आज दुसऱ्या दिवशी शुक्रवार पेठ खोलखंडोबा तालीम येथील सूर्यवंशी बंधू यांचा ‘चाँदसाहेब (वल्ली) यांच्या पंजाची प्रतिष्ठाना रात्री करण्यात आली तसेच अनेक तालीम संस्था व घरगुती पीरपंजे बसविण्याची तयारी सुरू होती. एकंदरीत, शहरात शिवाजी चौकातील घुडणपीर दर्ग्यातील पीरपंजासह दिलबहार, फिरंगाई, बजापराव माजगांवकर,जुना बुधवार तालीम आदी तालीम संस्थांमध्ये प्रतिवर्षी प्रतिष्ठापना होते. या सणानिमित्त बाबूजमाल तालीम मंडळ येथे विद्युत रोषणाई करण्यात आली आहे. या तालीम मंडळाचा ‘हजरतपीर नाल्या हैदर कलंदर’ पीरपंजा शनिवारी (दि.१) रविवारी (दि.२) भेटीस जाणार आहे. तीन नोव्हेंबरला मोहरमचा मुख्य दिवस असून त्या दिवशी रात्री दहा वाजता ‘खत्तलरात्र’ होणार आहे.