शहरं
Join us  
Trending Stories
1
IND vs ENG 5th Test : टीम इंडियानं हातून निसटलेली मॅच जिंकून दाखवली! मालिकेत बरोबरी
2
मंत्रिपद जाऊनही धनंजय मुंडेंनी सरकारी बंगला का सोडला नाही? भरावा लागणार दंड
3
"हे बंद करा"; परिणय फुकेंच्या विधानावर बोलताना CM फडणवीसांनी माध्यमांचे टोचले कान, काय म्हणाले?
4
मुंबई घडवण्यात हिंदी भाषिकांचं मोठं योगदान, मराठी केवळ ३० टक्के...: निशिकांत दुबेंनी पुन्हा डिवचलं
5
बाजारात जोरदार 'कमबॅक'! सेन्सेक्स-निफ्टीमध्ये मोठी वाढ, हिरो मोटर्ससह 'या' शेअर्सचा बंपर परतावा
6
एका शेअरवर १५६ रुपयांचा डिविडंड देणार ही कंपनी, रेकॉर्ड डेट १५ ऑगस्टपूर्वीच, तुमच्याकडे आहे का?
7
“आपला पक्ष मुंबईत सर्वांत जास्त बलवान आहे, यंदा महापालिकेत मनसेचीच सत्ता येणार”: राज ठाकरे
8
एक दिवस एमजी टाटाला मागे टाकणार? जुलैमध्ये एवढ्या विकल्या इलेक्ट्रीक कार... ह्युंदाई क्रेटा...
9
Viral Video: पाठीमागून आला अन् मिठी मारली, छातीलाही केला स्पर्श; भररस्त्यात महिलेसोबत घाणेरडं कृत्य!
10
भारतातील एकमेव रेल्वे स्टेशन, ज्याला नावच नाही, तरीही थांबते ट्रेन, लोक करतात प्रवास
11
पंतप्रधान मोदींनंतर चार तासांनी अमित शाह राष्ट्रपतींना भेटले; ५ ऑगस्टला काहीतरी मोठे घडणार....
12
IND vs ENG :मियाँ मॅजिक! बॅक टू बॅक ओव्हरमध्ये विकेट; KL राहुलनं एक कॅच सोडला
13
IND vs ENG : क्रिस वोक्सला सलाम! खांदा फॅक्चर असताना संघासाठी मैदानात उतरला (VIDEO)
14
शाहरुख खान अन् राणी मुखर्जीसाठी प्रिय मित्र करण जोहरची पोस्ट, म्हणाला, "३३ वर्षांचा हा काळ..."
15
थ्रेडिंगमुळे लिव्हर फेल? आयब्रो करणं पडेल चांगलंच महागात, डॉक्टरांचा धोक्याचा इशारा
16
१७,००० कोटींचा घोटाळा! अनिल अंबानींच्या डोकेदुखीत वाढ, ED आता 'या' लोकांची चौकशी करणार
17
Post Office ची ५० वर्ष जुनी सेवा होणार बंद, तुमच्यावर काय परिणाम होणार?
18
नव्या प्रभाग रचनेला आव्हान देणाऱ्या याचिका सुप्रीम कोर्टाने फेटाळल्या; स्थानिक निवडणुकांना हिरवा कंदील
19
६ ऑगस्टला बच्चू कडू राज ठाकरेंची भेट घेण्याची शक्यता; शेतकरी आंदोलनाला मनसेचं पाठबळ मिळणार?

पोलिसांसाठी १४00 घरांच्या प्रकल्पाचा जानेवारीत प्रारंभ

By admin | Updated: November 8, 2016 01:32 IST

चार मजली भव्य इमारत साकारणार : लक्ष्मीपुरी, बुधवार पेठ पोलिस वसाहतींत नवा प्रकल्प

एकनगथ पाटील -- कोल्हापूर --इंग्रजांच्या काळात सुमारे पाच एकरांत लक्ष्मीपुरी व बुधवार पेठ परिसरात पोलिसांना राहण्यासाठी १७० घरे (क्वार्टर्स) बांधण्यात आली आहेत. या घरांची आयुष्यमर्यादा संपली आहे. पहिल्या टप्प्यात लक्ष्मीपुरी व बुधवार पेठ वसाहतीमधील घरे पाडून त्या ठिकाणी ४०० घरांची चारमजली भव्य इमारत बांधण्यात येणार आहे. या प्रकल्पाचा प्रारंभ १ जानेवारी २०१७ रोजी करण्यात येणार आहे. त्यानंतर दोन टप्प्यांत पोलिस मुखालय परिसरातील घरे पाडून नव्याने १४०० घरे बांधली जाणार आहेत. त्यासाठी २९ कोटी ४७ लाखांचा निधी मंजूर केला आहे. पोलिस वसाहतींना सध्या अवकळा प्राप्त झाली आहे. या वसाहती विविध समस्यांच्या भोवऱ्यात अडकल्याने तेथील घरे सोडून काही पोलिस भाड्याच्या घरांत निघून गेले आहेत. पोलिसांच्या घरांची बिकट अवस्था पाहून गृहखात्याने पोलिसांना नवीन घरे देण्याची घोषणा यापूर्वी केली होती. नवीन घरांचे स्वप्न उराशी बाळगून संसाराची मोट बांधलेल्या पोलिसांसह कुटुंबीयांचे पडझड झालेल्या छोटेखानी घरांमध्ये मरणयातना भोगणारे विदारक चित्र सर्वप्रथम ‘लोकमत’ने प्रसिद्ध केले होते. या वृत्ताची दखल घेत राज्याच्या गृहविभागाचे अप्पर मुख्य सचिव के. पी. बक्षी यांनी या घरांची पाहणी केली. त्यानंतर घरांचा नवीन प्रस्ताव मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासमोर ठेवला. या प्रस्तावानंतर राज्यात पोलिसांसाठी २९ हजार निवासस्थाने बांधण्याचा निर्णय शासनाने घेतला. त्यामध्ये कोल्हापूरसाठी १४०० निवासस्थाने मंजूर केली. पहिल्या टप्प्यात लक्ष्मीपुरी व जुना बुधवार पेठ येथील घरे पाडून चार मजली आरसीसी इमारत उभी केली जाणार आहे. त्याचा प्रारंभ जानेवारीमध्ये होत आहे. या ठिकाणी राहणाऱ्या कुटुंबीयांना पोलिस मुख्यालय वसाहतीमध्ये हलविण्यात येणार आहे. काही खासगी घरांमध्ये राहिल्यास त्याचे भाडे शासन देणार आहे. शासनाच्या या निर्णयामुळे शाहूकालीन शंभर वर्षे पूर्ण झालेल्या पोलिसांच्या घरांना नवसंजीवनी मिळाली आहे. कुटुंबीयांची वेदना... अडगळीचा संसारकौलारू आणि दहा बाय दहाच्या दोन खोल्या असून, यामध्ये स्वयंपाकखोली आणि बैठ्या खोलीसह अंघोळीसाठी छोटेसे बाथरूम अशी या घरांची रचना आहे. विश्रांती घ्यायची म्हटली तरीही हक्काच्या घरातील अडचणींमुळे ते त्यांच्या पदरी पडत नाही. प्रत्येकाच्या घरात पत्नी, मुले, आई-वडील असे मिळून सहा ते सात जणांचे कुटुंब आहे. मुलांना अभ्यास करायला जागा नाही. स्वयंपाकघरातच जेवण करून झोपावे लागते. एखादा पाहुणा आला तर मोठी गोची होते. जागेअभावी राहायची इच्छा असूनही त्यांना राहता येत नसल्याची खंत काही कुटुंबीयांनी ‘लोकमत’कडे व्यक्त केली. पोलिसांच्या घरांची अवस्था बिकट आहे. हा प्रश्न मार्गी लावण्यासाठी राज्य शासनाने पुढाकार घेतला आहे. कोल्हापूरसाठी २९ कोटी ४७ लाखांचा निधी मंजूर केला असून नवीन घरांचा प्रारंभ लक्ष्मीपुरी वसाहतीमधून १ जानेवारी २०१७ रोजी केला जाणार आहे. - चंद्रकांतदादा पाटील, पालकमंत्री चार खोल्यांचे घर मिळणार पोलिस मुख्यालय ७१८, लक्ष्मीपुरी पोलिस लाईन ६०, रिसाला पोलिस लाईन - कसबा बावडा ५१, जुना बुधवार पोलिस लाईन ८४ अशी ९१३ घरे उपलब्ध आहेत. पोलिस गृहनिर्माण कल्याण महामंडळातर्फे १४०० घरांना मंजुरी मिळाली आहे. पहिल्या टप्प्यात जुना बुधवार पोलिस लाईन २००, लक्ष्मीपुरी २०० अशी ४०० घरे बांधणार आहेत. इचलकरंजीत अधिकारी व कर्मचाऱ्यांसाठी कलानगर येथील पोलिस खात्याच्या रिकाम्या जागेवर २४२ घरांच्या बांधकामाबाबत कार्यवाही सुरू आहे. नव्या घरात तीन ते चार खोल्यांचे घर मिळणार आहे. पाच कोटींचा निधी मंजूर पोलिस मुख्यालय ७१८ व रिसाला पोलिस लाईन-कसबा बावडा ५१ अशा ७६९ घरांच्या दुरुस्तीसाठी शासनाने पाच कोटींचा निधी मंजूर केला आहे. मे २०१७ अखेर या घरांच्या दुरुस्तीची कामे केली जाणार आहेत. त्यामध्ये शौचालये, सांडपाणी व्यवस्था, पाणीपुरवठा, घरांची दुरुस्ती व रंगरंगोटीचा समावेश आहे.