शहरं
Join us  
Trending Stories
1
भारतावरील 'टॅरिफ' रशियन तेलामुळे नाही, तर ट्रम्प यांच्या नाराजीमुळे; अमेरिकन कंपनीचा दावा
2
आरक्षण द्यायचं, आंदोलन मोडायचं, की मला गोळ्या घालायच्या...; मनोज जरांगे-पाटील यांचा थेट इशारा
3
जेवणात भाजी का बनवली नाही? पतीने पत्नीला रागात विचारलं; चिडलेल्या पत्नीने टोकाचं पाऊल उचललं!
4
ऐन गणेशोत्सवात लालबागला जाणाऱ्या प्रवाशांचा होणार खोळंबा : ब्लॉकमुळे चिंचपोकळी, करीरोड स्टेशनवर लोकल नसणार!
5
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची इच्छा पूर्ण होणार, प्रत्येक कोपऱ्यात मराठे दिसणार! मनोज जरांगे-पाटील काय म्हणाले?
6
५० कोटींची अत्याधुनिक इमारत; CM योगी आदित्यनाथ यांच्या हस्ते उत्तर प्रदेश निवडणूक आयोगाच्या नवीन कार्यालयाचे भूमीपूजन!
7
उधारीच्या वादातून वाहन विक्रेत्याचे अपहरण, मारहाणीचा व्हिडीओ स्नॅपचॅटवर अपलोड!
8
नागपूर हादरले! चाकू काढला आणि छातीवर सपासप वार; दहावीतील विद्यार्थिनीची शाळेसमोरच हत्या
9
Maratha Morcha Mumbai: मनोज जरांगेंना दिलासा, पण एका दिवसाचाच! पोलिसांचा निर्णय काय?
10
'तुमचं तोंड भाजेल'; CM फडणवीसांचा उद्धव ठाकरेंवर पलटवार, आरक्षणाच्या मुद्द्यावरून सुनावलं
11
मुंबईतील 'या' ठिकाणी लोक पैसे देऊन तासभर रडतात, प्रवेशासाठी होते गर्दी; काय आहे रुईकात्स?
12
Asia Cup 2025 : सिंग इज किंग! हरमनप्रीतची हॅटट्रिक; अखेरच्या टप्प्यात चीनचा करेक्ट कार्यक्रम
13
Manoj Jarange Patil Morcha Update Live: मराठ्यांना आरक्षण देऊन टाकावं, मनं जिंकण्याची हीच संधी : मनोज जरांगे-पाटील
14
"मला माझ्या नवऱ्यापासून वाचवा..."; महिलेने कारमधून मारली उडी, रस्त्यावरच घातला गोंधळ
15
"नुसती आश्वासने देऊन चालणार नाही, कायदेशीर..."; जरांगेंचे उपोषण, CM फडणवीसांनी मांडली सरकारची भूमिका
16
चांद्रयान-5, तंत्रज्ञान , हायस्पीड रेल्वे अन् 10 ट्रिलियनची गुंतवणूक...भारत-जपानमध्ये १३ करार
17
सरिता हिची आत्महत्या नव्हेतर हत्याच... पती पुरुषोत्तम खानचंदानी यांचा आरोप
18
पंतप्रधान मोदींना जपानमध्ये मिळाली 'दारुम डॉल'; काय आहे या बाहुलीचा भारताशी संबंध?
19
"१९९१ मध्ये फसवणूक करूनच..."; सिद्धरामय्यांच्या एका विधानानं काँग्रेसच्या 'मतचोरी' प्रकरणाची 'लंका' लावली; भाजपला मिळाला आयता मुद्दा!
20
राहुल गांधींना बदनाम करण्यासाठी भाजप कोणत्याही थराला जाईल; संजय राऊतांची टीका

स्टार ११५३...शेतकऱ्यांच्या डोक्याला ‘ई-पीक’ पाहणीचा ताप

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 9, 2021 04:31 IST

राजाराम लोंढे, लोकमत न्यूज नेटवर्क कोल्हापूर : महापुरामुळे झालेली दलदल, पाऊस, ॲप लवकर ओपन होत नसल्याने राज्य सरकारची ‘ई-पीक’ ...

राजाराम लोंढे,

लोकमत न्यूज नेटवर्क

कोल्हापूर : महापुरामुळे झालेली दलदल, पाऊस, ॲप लवकर ओपन होत नसल्याने राज्य सरकारची ‘ई-पीक’ पाहणी म्हणजे शेतकऱ्यांच्या डोक्याला ताप झाला आहे. तांत्रिक अडचणीमुळे एकीकडे शेतकरी हैराण असताना सरकारने मात्र ते लवकर पूर्ण करण्याचा तगादा लावल्याने शेतकरी हैराण झाले आहेत. जिल्ह्यात ६ सप्टेंबरपर्यंत केवळ ४६ हजार ७२६ शेतकऱ्यांनीच ही माहिती भरली आहे.

शेतकऱ्यांनी आपल्या जमिनीमध्ये काय पीक केले, त्यासाठी पाण्याची काय व्यवस्था आहे याबाबत वर्षाला माहिती जमा केली जाते. आतापर्यंत तलाठी संबंधित शेतकऱ्याला कार्यालयात बोलावून माहिती घेत होते. मात्र, राज्य सरकारने ‘ई-पीक’च्या माध्यमातून ही माहिती शेतकऱ्यांनीच भरून देण्याचा निर्णय घेतला आहे. त्यातही शेतकऱ्यांनी संबंधित गट नंबरमध्ये जाऊन मोबाईल ॲपव्दारे ही माहिती भरायची आहे. आपला देश किती तंत्रज्ञानाच्या पातळीवर प्रगत झाल्याच्या आपण गप्पा मारत असलो तरी अजूनही शेतकरी या ज्ञानापासून चार हात लांबच आहेत. अनेक शेतकऱ्यांकडे ॲन्ड्राईड मोबाईल नाहीत. त्यामुळे ही माहिती भरायची कशी या पेचात शेतकरी आहे. त्यातच महापुरामुळे अजूनही नदीकाठच्या शिवारात दलदल आहे, त्यात गेल्या चार-पाच दिवसांपासून पावसाने पुन्हा सुरुवात केल्याने नद्यांचे पाणी पुन्हा पात्राबाहेर पडल्याने शिवारात जाऊन माहिती भरताना अग्निदिव्य पार पाडावे लागत आहेत. त्यातही अनेक तांत्रिक अडचणींना शेतकऱ्यांना सामोरे जावे लागत आहे. १५ सप्टेंबरपर्यंतची सरकारने मुदत दिली आहे. विहीत वेळेत केले नाहीतर पीक विम्यासह इतर सुविधा दिल्या जाणार नसल्याचा फतवा सरकारने काढल्याने शेतकरी हवालदिल झाले आहेत.

वाड्यावस्त्यांवर रेंज कशी येणार....

जिल्ह्यात तीन-चार तालुके सोडले तर इतर तालुक्यात वाड्यावस्त्या व डोंगर कपारीमध्ये गावे आहेत. तिथे मोबाईलची रेंजही पोहोचत नाही. अशा ठिकाणी ॲप ओपन होणार कसे? तो शेतकरी माहिती भरणार कशी? असे अनेक प्रश्न शेतकऱ्यांना पडले आहेत.

‘ई-पीक’ पाहणी म्हणजे काय रे भाऊ....

जिल्ह्यातील बहुतांशी शेतकऱ्यांना ‘ई-पीक’ पाहणी म्हणजे काय हेच माहीत नाही. ही माहिती भरायची तर खूप लांबचे आहे. मुळात ज्यांच्यावर ही जबाबदारी सोपवली त्या यंत्रणेने माहिती देताना नेमके किती शेतकरी उपस्थित होते, हे पाहणेही गरजेचे आहे.

तालुकानिहाय खातेदारांनी केलेली नोंदणी -

पन्हाळा - ५३११

राधानगरी - ४१९६

हातकणंगले - ४१६८

चंदगड -३८९५

करवीर -३६८५

गडहिंग्लज - ३६७०

आजरा -२९१३

शाहूवाडी - २८०८

कागल-२५६६

शिरोळ - २०७१

भुदरगड -११५१

गगनबावडा -११३१

ही माहिती भरावी लागते-

खातेदाराचे नाव

क्षेत्र

जलसिंचनाची व्यवस्था

सिंचनाखालील क्षेत्र

पिकांचे वर्णन व सोबत पिकाचा फोटो

कोट-

‘ई-पीक’ पाहणी याबाबत आम्हांला काहीच माहिती नाही. मोबाईलवर माहिती भरण्यास सांगितले खरे, मात्र आमच्याकडे महागडे मोबाईल आणायचे कोठून.

- बाबूराव खाडे (शेतकरी)