शहरं
Join us  
Trending Stories
1
युद्धविरामानंतर फ्रान्सच्या नेतृत्वात १५ देश आले एकत्र; होर्मुझवर आखला 'प्लॅन बी', कसली तयारी?
2
इराणचा अमेरिकेवर खळबळजनक आरोप; "शस्त्रसंधीच्या ३ अटी मोडल्या, आता चर्चा करणे व्यर्थ!"
3
इंदूरच्या राजा-सोनमसारखं प्रकरण; "तू दिसायला चांगला नाहीस, मला..";  टोमणे मारत पत्नीनेच पतीला संपवलं
4
आसाममध्ये बहुतेक १०० टक्के मतदान होतेय...! दुपारी १ वाजेपर्यंत ६०% पेक्षा जास्त मतदान; केरळ आणि पाँडिचेरीमध्येही उत्साह
5
अजितदादांचे जॅकेट अन् चष्मा, तसाच लूक; पार्थ पवारांनी घेतली खासदारकीची शपथ, आईचा खास सल्ला!
6
Maruti Suzuki: दमदार मायलेज, किंमतही कमी; 'या' आहेत मारुती सुझुकीच्या बजेट कार, किंमत ४.६१ लाखांपासून सुरू
7
रेखा झुनझुनवालांनी 'या' Smallcap कंपनीतील २ लाखांपेक्षा अधिक शेअर्स विकले; स्टॉक 52W हायपासून ३५% खाली
8
युद्धविरामाचं भवितव्य अधांतरी, इराणी राजदूतांनी X वरील पोस्ट हटवली, चर्चेतून बाहेर पडणार?   
9
बारामती बिनविरोधसाठी महायुतीची धावाधाव; CM फडणवीसांचा सपकाळांना फोन, सुनेत्रा पवारांची तीनदा चर्चा
10
'तो' १० सूत्री प्रस्ताव पूर्णपणे 'फेक', ट्रम्प यांचं मोठं विधान; म्हणाले, करार न झाल्यास इराणवर पुन्हा बॉम्बफेक!
11
१० हजारांचा स्मार्टफोन थेट १४ हजारांवर! अचानक ४० टक्क्यांनी किंमती वाढल्या, 'ही' आहेत २ मोठी कारणे
12
प्रेमात आंधळी झाली ममता! प्रियकरासाठी पोटच्या २ वर्षांच्या मुलीचा गळा घोटला; मृतदेह गटारात फेकून रचला बनाव
13
रावण फक्त खलनायक नाही तर..., 'रामायण'मध्ये काय वेगळं बघायला मिळणार? दिग्दर्शक म्हणाले...
14
शिकारीचा थरार! गोळीबारात १ जण ठार; घटनास्थळी तलवार सापडल्याने गूढ वाढले, डाव कुणी साधला?
15
अमेरिका-इराण युद्धविरामानंतर रशियाची भारतासह आशियाई देशांना 'बिग ऑफर'; ट्रम्प यांची डोकेदुखी
16
महिलेला आंटी म्हणणं त्याला पडलं महागात, बोलावले पोलिस, कोर्टाने ठोठावला लाखोंचा दंड
17
कारचा तिसरा गियर कधी टाकावा? जाणून घ्या योग्य स्पीड अन् गियर बदलण्याची पद्धत, वाचवा इंधन
18
Heels History: सुरुवात झाली पुरुषांसाठी, मग महिलांच्या फॅशनचा भाग कशा बनल्या 'Heels'?
19
Ashok Kharat : भोंदू अशोक खरातचे ते 'पाप' ४६ वर्षे जुने; गावकऱ्यांनी दिलेला चोप, एका रात्रीत गाव सोडून पळाला
20
IPL 2026: शुभमन गिलनं नियम मोडला, बीसीसीआयनं ठोठावला १२ लाखांचा दंड, असं घडलं तरी काय?
Daily Top 2Weekly Top 5

गाळेधारकांचा महापालिकेवर मोर्चा

By admin | Updated: January 11, 2017 01:05 IST

महापौर : गाळेधारकांवर कारवाई नको; आठवड्यात संयुक्त बैठक

कोल्हापूर : अन्यायी भाडेवाढविरोधातील गाळेधारकांवर कारवाई करू नका, अशा सक्त सूचना देत, याप्रश्नी आठ दिवसांत महापालिका प्रशासन व गाळेधारक यांची संयुक्त बैठक घेऊ, असे आश्वासन महापौर हसिना फरास यांनी भारतीय शेतकरी कामगार पक्ष महापालिका गाळेधारक संघटनेच्या शिष्टमंडळाला दिले.अन्यायी भाडेवाढीविरोधात गाळेधारक संघटनेतर्फे मंगळवारी महापालिकेवर मोर्चा काढला. यावेळी महापौर फरास यांना संघटनेने निवेदन दिले. या विषयावर महापौरांच्या दालनात माजी आमदार संपतबापू पवार-पाटील, अतिरिक्त आयुक्त श्रीधर पाटणकर व माजी स्थायी सभापती आदिल फरास यांच्याबरोबर चर्चा झाली. व्यवसाय आणि बाजारमूल्य याच्यां समन्वयाने भाडेवाढीचा निर्णय घेऊ, असे आश्वासन पाटणकर यांनी यावेळी दिले.महापालिकेचे सुमारे दोन हजार गाळेधारक आहेत. त्यांना प्रशासनाने रेडीरेकनर (बाजारमूल्यानुसार) पद्धतीने भाडेवाढीच्या नोटिसा पाठविल्या. ही भाडेवाढ सुमारे पाच ते सहा पटींमध्ये आहे. यापूर्वीही गाळेधारकांनी आयुक्त पी. शिवशंकर व महापौर यांना निवेदन दिले आहे; पण निर्णय घेतला नाही. शहरात रेडीरेकनरच्या दरानुसार गाळेधारकांची भाडेवाढ केली. त्यामुळे किमान पाच ते सहा पटींत ही भाडेवाढ झाली. याला विरोध म्हणून टेंबे रोडवरील शेकाप कार्यालय येथून मोर्चाला सुरुवात झाली. मोर्चा मिरजकर तिकटी, महाद्वार रोड, पापाची तिकटीमार्गे महापालिकेवर आला.यावेळी संपतबापू पवार, बाबूराव कदम, संघटनेचे अध्यक्ष मधुकर हरेल, माजी प्राचार्य टी. एस. पाटील, संदीप वीर, सुनीलकुमार सरनाईक, संभाजी जगदाळे, बबन महाजन, आदींनी ही अन्यायकारक भाडेवाढ म्हणजे जिझिया परतवून लावला पाहिजे. आयुक्त पी. शिवशंकर यांना याचे काही देणे-घेणे नाही, अशाही संतप्त भावना व्यक्त केल्या. त्यानंतर संपतबापू पवार यांच्या नेतृत्वाखाली शिष्टमंडळ महापौर फरास यांना भेटले. त्यावेळी महापौर यांचे प्रतिनिधी आदिल फरास यांनी, राज्य शासनाच्या निर्देशानुसार रेडीरेकनर पद्धतीने ही भाडेवाढ आकारणी केल्याचे सांगून चर्चा केली. मोर्चात रवी चौगले,सुरेश जरग, भाऊ घोगले, व्ही. आर. पाटील, वनिता दीक्षित, मेहेजबीन शेख, सुशांत बोरगे, बबेराव जाधव, सुभाष सावंत, आदींचा सहभाग होता.कायदा बदला; पण भाडेवाढ कमी कराआमचा भाडेवाढीला विरोध नाही; पण रेडिरेकनर पद्धतीने जी भाडेवाढ केली आहे, ती चुकीची आहे. शासनाचे तसे निर्देश असले तरी ते पाळू. कायदा बदला; पण ही अन्यायकारक भाडेवाढ कमी करा, अशी भावना संपतबापू पवार यांनी यावेळी व्यक्त केली.गाळेधारकांवरील अन्यायी भाडेवाढीविरोधात भारतीय शेतकरी कामगार पक्ष महापालिका गाळेधारक संघटनेतर्फे मंगळवारी कोल्हापूर महापालिकेवर मोर्चा काढण्यात आला. या मोर्चात गाळेधारक सहभागी झाले होते.