शहरं
Join us  
Trending Stories
1
धावपट्टीला स्पर्श करताच एका बाजूला झुकले, नंतर...; बोईंग विमानाचा मोठा अपघात थोडक्यात टळला
2
J-K: भारतीय सैन्याने हाणून पाडला घुसखोरीचा डाव; सीमेजवळ पाकिस्तानी गाईड ताब्यात
3
तरुणीने भेटायला हॉटेलमध्ये बोलावलं, आनंदाने गेला तरुण; पण पुढे जे झालं त्याची कुणी कल्पनाही केली नसेल!
4
पोलिसांनी गाडी अडवल्याने संतापले, ताजमहालजवळ केला गोळीबार; पर्यटकांमध्ये उडाली खळबळ!
5
१८ एकर जमिनीवर कब्जा करण्याचा डाव फसला; प्रियकरासोबत मिळून पतीला मधुचंद्राच्या रात्रीचं संपवलं, मग...
6
Jio BlackRock नं लाँच केले तीन म्युच्युअल फंड, सलग पाचव्या दिवशी शेअरमध्ये जोरदार तेजी
7
मराठीशी तडजोड चालणार नाही! राजकीय लेबलं लावू नका, याकडे संकट म्हणून पाहा; राज ठाकरेंनी ठणकावलं
8
'पंचायत'मध्ये सचिव जी अन् रिंकीचा असणार होता किसींग सीन, सानविकाने दिला नकार
9
जय मराठी! ५ जुलैला विजयी मेळावा होईल, पण तो कोणत्याही पक्षाचा नसेल; राज ठाकरेंनी स्पष्टच सांगितलं
10
चॉकलेटच्या डब्यात लपवून आणले तब्बल १६ साप अन्...; मुंबई विमानतळावर प्रवाशाला पोलिसांनी घेतले ताब्यात!
11
भारतात राहण्यासाठी काहीही! ५ बांगलादेशी पुरुषांनी निवडला 'विचित्र' मार्ग, कसे सापडले पोलिसांच्या तावडीत?
12
पतीसमोरच पत्नीने प्रियकरासोबत लग्न केले; निळ्या ड्रमची धडकीच मनात भरली, पतीने उलगडलं रहस्य
13
घसरणीनंतर पुन्हा वाढले सोन्याचे दर... खरेदीची संधी गेली का? २४ कॅरेटचा आजचा भाव काय?
14
हिंदी सक्ती : "समिती कोणतीही असू दे, आता सक्ती विषय..."; उद्धव ठाकरेंचा महायुती सरकारला इशारा 
15
Vastu Tips: श्रीमंतांसारखं आयुष्य जगायचं असेल, तर आजच करा 'हे' सात प्रभावी वास्तू उपाय!
16
ऐकावे ते नवलंच! एकटा दरोडेखोरांशी भिडला; कंबरेत गोळी घुसली, २ km पर्यंत कळालेही नाही...
17
रस्ते, मेट्रो, सिंचन, कुंभमेळा...सरकारने सादर केल्या 57 हजार 509 कोटींच्या पुरवणी मागण्या
18
'ChatGPT' ला हे प्रश्न विचारू नका, नाहीतर तुम्ही मोठ्या अडचणीत सापडू शकता
19
प्रेमात मिळाला धोका तेव्हा खासगी आयुष्यातील 'तो' व्हिडिओ केला लीक; क्रिकेटर अडकला होता वादात
20
अदानी ग्रीन एनर्जीचा ऐतिहासिक विक्रम! अक्षय ऊर्जा क्षेत्रात असं काम करणारी पहिलीच भारतीय कंपनी

कळे बंधाऱ्याने गाठला साठीचा टप्पा

By admin | Updated: June 11, 2016 00:52 IST

दुरुस्तीसाठी निधीची गरज : ४० ते ५० गावांच्या शेतीसह पिण्याच्या पाण्याच्या पुरवठ्याच्या दृष्टीने मैलाचा दगड

कळे : धामणी खोऱ्यासह पश्चिम पन्हाळ्यातील कळे परिसर व गगनबावडा तालुक्यातील साळवणपर्यंतच्या पट्ट्यात येणाऱ्या सुमारे ४० ते ५० गावांच्या शेतीसह पिण्याच्या पाण्याच्या पुरवठ्याच्या दृष्टीने मैलाचा दगड ठरलेला कळे- सावर्डे हा कोल्हापुरी पद्धतीचा बंधारा वयाची साठी ओलांडत आहे. गेल्या ६० वर्षांपासून अनेक उन्हाळे-पावसाळे पाहत, महापुरातील असह्य पाण्याचा प्रवाह सहन करीत व २०१२ सालापर्यंत वाहतुकीची सर्व मदार पेलून आता मात्र कमकुवत होऊ लागला आहे. बंधाऱ्याच्या दुरस्तीसाठी गरज आहे ती शासकीय निधीची. याकडे शासन पाटबंधारे विभाग कितपत लक्ष देतो व लोकप्रतिनिधी किती पाठपुरावा करतात यावरच या बंधाऱ्याचे भवितव्य अवलंबून आहे.माजी आमदार स्व. शंकरराव देसाई (कळे) यांच्या पुढाकाराने १९५५-५६ साली बंधाऱ्याच्या बांधकामास सुरुवात झाली. बांधकाम पूर्ण झाल्यानंतर १९५८-५९ साली प्रत्यक्षात पहिल्यांदाच पाणी अडविण्यात आले. ३३ गाळे असणाऱ्या बंधाऱ्याची उंची साधारण २० फुटावर आहे. कळे-साळवण परिसर व धामणी खोऱ्यासाठी पाणी अडविण्याबरोबरच धामणी खोऱ्यातील वाहतुकीची सर्व मदार २०१२ पर्यंत बंधाऱ्यावरच होती. २०१२ साली नवीन झालेल्या कळे-सावर्डे-मल्हारपेठ पुलामुळे बंधाऱ्यावरील वाहतुकीचा ताण पूर्णपणे कमी झाला.सर्वांत लांब बॅकवॉटरने पाणी पुरविणारा एकमेव बंधारा कळे-सावर्डे बंधारा व कुंभी-धामणी सहकारी धरण सोसायटीच्या मालकीचा असून, बंधाऱ्याची देखभाल व दुरस्ती धरण संस्था स्वखर्चाने पाहते. कळे-सावर्डे बंधाऱ्याला २० फुटापर्यंत पाणीपातळी ठेवून हे पाणी बॅकवॉटर पद्धतीने धामणी नदीतील आंबर्डे व कुंभी नदीतील वेतवडे (ता. गगनबावडा) बंधाऱ्यापर्यंत नेले. आंबर्डे बंधाऱ्यावर विद्युत मोटारी लावून मातीच्या बंधाऱ्यामध्ये पाणी साठवून म्हासुर्ली परिसरातील गावांनाही हे पाणी दिले जाते. एवढ्या लांब पल्ल्यापर्यंत बॅकवॉटरने पाणीपुरवठा करणारा हा जिल्ह्यातील एकमेव सहकारी तत्त्वावरील बंधारा आहे.