शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

निवडणुकीचे काम करणाऱ्या कर्मचाऱ्यास गडहिंग्लजमध्ये धक्काबुक्की

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 24, 2019 14:08 IST

लोकसभा निवडणुकीचे मतदान संपताच तैनात करण्यात आलेल्या शिक्षकांनी भत्ता मागण्याचा प्रयत्न करताच त्यांना धक्काबुक्की करुन बाहेर काढण्याचा प्रयत्न गडहिंग्लज येथे मंगळवारी रात्री घडला. याप्रकरणी प्रांताधिकाऱ्यांकडे दाद मागितली असता त्यांनी प्रथम भत्ताही देण्यास नकार दिला. वाद घातल्यानंतर रात्री अकरा वाजता तीनशे रुपये देउ केले. या प्रकाराची चौकशी करण्याची मागणी शिक्षकांमार्फत मिलिंद यादव यांनी जिल्हाधिकारी दौलत देसाई यांच्याकडे केली आहे.

ठळक मुद्देनिवडणुकीचे काम करणाऱ्या कर्मचाऱ्यास गडहिंग्लजमध्ये धक्काबुक्कीभत्ताही देण्यास नकार, जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन

कोल्हापूर : लोकसभा निवडणुकीचे मतदान संपताच तैनात करण्यात आलेल्या शिक्षकांनी भत्ता मागण्याचा प्रयत्न करताच त्यांना धक्काबुक्की करुन बाहेर काढण्याचा प्रयत्न गडहिंग्लज येथे मंगळवारी रात्री घडला. याप्रकरणी प्रांताधिकाऱ्यांकडे दाद मागितली असता त्यांनी प्रथम भत्ताही देण्यास नकार दिला. वाद घातल्यानंतर रात्री अकरा वाजता तीनशे रुपये देउ केले. या प्रकाराची चौकशी करण्याची मागणी शिक्षकांमार्फत मिलिंद यादव यांनी जिल्हाधिकारी दौलत देसाई यांच्याकडे केली आहे.लोकसभा निवडणुकीसाठी २२ एप्रिल रोजी सकाळी सहा वाजता चंदगड मतदारसंघात १00 हून अधिक शिक्षक हजर झाले. राखीव शिक्षकांपैकी ४६ जणांना झोनल अधिकाऱ्यांचे सहकारी म्हणून नेमले गेले आणि दोन दिवस त्यांच्याकडून काम करवून घेण्यात आले. मात्र, उर्वरित राखीव शिक्षकांची प्रशासनाने दखलही घेतली नाही. अनेकांची राहण्याची तसेच भोजनाचीही चांगली व्यवस्था केली नाही. चंदगड विश्रामगृहावर तर प्यायलाही पाणी नव्हते.तरीही या शिक्षकांनी प्रामाणिकपणे काम केले.निवडणुकीचे कामकाज संपल्यानंतर रात्री गडहिंग्लज येथील एम. आर. हायस्कूलच्या प्रांगणात कर्मचारी निवडणुक साहित्य जमा करत होते. याचवेळी त्यांना भत्ताही देण्यात येत होता. मात्र, राखीव कर्मचाऱ्यांना भत्ता देण्यात येणार नसल्याचे सुरुवातीलाच सांगण्यात आले. यामुळे संबंधित शिक्षकांनी अधिकाऱ्यांकडे विचारणा केली. त्यावेळी त्यांनी एकमेकांकडे बोट दाखविताच त्यांनी थेट प्रांताधिकारी आणि तहसीलदार यांच्याकडे विचारणा केली.  मात्र प्रांताधिकारी पांगारकर यांनी तुसड्या पध्दतीने शिक्षकांशी व्यवहार करुन भत्ता देय नसल्याचे सांगितले. वाद घातला असता रात्री दहा वाजता सर्र्वाना भत्ता देण्यास सुरुवात केली. २२00 रुपये ठरलेले असताना केवळ ३00 रुपयेच भत्ता देउ केल्याने बऱ्याच शिक्षकांनी तो नाकारला.काम करुनही कामाचा भत्ता देणार नसल्याचे समजताच शिक्षकांचा संताप अनावर झाला. शिक्षक महासंघाचे विभागीय अध्यक्ष राजेंद्र कोरे, मिलिंद यादव यांनी याचा जाब प्रशासनाला विचारताच पोलीस निरीक्षक प्रकाश गायकवाड आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी मिलींद यादव यांची गळपट्टी धरून त्यांना धक्काबुक्की केली. मात्र, यावेळी सर्व शिक्षकांनी एकजूट दाखवून पोलिसांच्या या अरेरावीला उत्तर दिले. याला सर्वांनी कडाडून विरोध केला. शेवटी प्रशासनाने रात्री उशिरा शासनाने दिलेल्या नियमानुसार भत्ता देण्यास सुरुवात केली.या प्रकाराची चौकशी करण्याची मागणी बुधवारी मिलिंद यादव, सुधाकर पाटील, राजेंद्र कोरे, संजय पाटील, राजेश बरक, प्रा. राजेंद्र हिरकुडे यांनी जिल्हाधिकारी दौलत देसाई यांची भेट घेउन केली. या प्रकाराची चौकशी करण्याचे आश्वासन त्यांनी शिष्टमंडळाला दिले.

टॅग्स :Lok Sabha Election 2019लोकसभा निवडणूकcollectorजिल्हाधिकारीkolhapur-pcकोल्हापूर