शहरं
Join us  
Trending Stories
1
दुसऱ्या पायलटबाबत इराणला माहितीच नव्हती, लीक करणाऱ्याला शोधणार ट्रम्प; रेस्क्यू मोहिमेवर मोठा गौप्यस्फोट
2
"किडनी दे, नाहीतर ३० लाख आण!"; थार गाडी अन् ८ लाख देऊनही छळ; लग्नानंतर उघड झालं पतीचं भयानक गुपित!
3
मध्यपूर्वेतील युद्धाचा परिणाम! एअर इंडियाचा प्रवास महागला; प्रवाशांच्या खिशाला कात्री...
4
इस्रायलचे पहिले टार्गेट ठरले! इराणच्या रेल्वे उडविणार, नागरिकांना रेल्वेमार्गांपासून दूर राहण्याचा इशारा...
5
किंमती गगनाला भिडल्या तरीही पायलटनं कोट्यवधीचं तेल समुद्रात ओतले; कारण ऐकून कराल कौतुक
6
सर्व नागरिकांनी ऊर्जा प्रकल्पांना घेराव घाला...! ट्रम्प यांच्या धमकीवर इराणची नवी चाल, वाटाघाटी नाजूक वळणावर...
7
दिल्ली विधानसभेत का घुसवली कार? पोलिसांच्या चौकशीत सरबजीतने केला धक्कादायक खुलासा! म्हणाला..
8
मरीन ड्राइव्ह अपघात निष्काळजीपणामुळेच, सदोष मनुष्यवधाचा गुन्हा वगळला: उच्च न्यायालय
9
भारतातील राजदूताला व्हाईट हाऊसमध्ये स्पेशल आमंत्रण; इराणची डेडलाइन तेव्हाच संपणार, योगायोग की...
10
Bonus Share News: पहिल्यांदाच मिळणार बोनस शेअर्सचं गिफ्ट; मिळणार ५ शेअर्स, २८५९% वाढलाय शेअर
11
Health Tips: कंबर, मान आणि खांदे दुखीने हैराण? उशीचा 'असा' वापर करा, वेदनांपासून कायमची सुटका मिळवा!
12
धक्कादायक! भावाच्या पत्नीवर अत्याचार; आईनेच दिली मुलाविरोधात साक्ष, न्यायालयाचा कठोर निर्णय
13
IPLमध्ये सर्व संघ कुणाविरोधात २ तर कुणाविरुद्ध एकच सामना का खेळतात? असं आहे यामागचं गुपित
14
तुफान राडा! भाजपातील वाद चव्हाट्यावर, नेते आपापसात भिडले; शिवीगाळ करत दिली धमकी
15
Crime: नाशिक, वसई पाठोपाठ नागपुरातही भोंदूबाबाचा मोठा कांड; तंत्र-मंत्राच्या नावाखाली महिलेवर बलात्कार
16
ट्रम्प यांची इराणला 'डेडलाईन'! रात्री ८ वाजेपर्यंत होर्मुज खुला करा, अन्यथा युद्ध अटळ; भारतासह आशियाई देश चिंतेत
17
अस्तनीतला साप...! UAE ने ३ अब्ज डॉलर्सचे कर्ज परत मागताच पाकिस्तानी खासदार भडकले; चक्क 'अखंड भारता'ची भीती दाखवली
18
इराणचा अमेरिकेला '१० कलमी' प्रतिप्रस्ताव! होर्मुजमधून जाणाऱ्या जहाजावर २० लाख डॉलर टॅक्स आकारणार? आता ट्रम्प काय करणार?
19
Mumbai Metro: मुंबईच्या बाहेर जाणारी पहिली मेट्रो! आता अंधेरी ते मिरा भाईंदर थेट प्रवास, तिकीट किती? स्थानकं किती? A टू Z माहिती...
20
युद्ध इराणमध्ये, फटका पाकिस्तानात! रात्री ८ नंतर बाजारपेठा बंद; डिझेल ५२० तर महागाईने मोडले कंबरडे
Daily Top 2Weekly Top 5

ST Strike : ..'तर हे आंदोलन आणखी तीव्र करणार'

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 12, 2021 18:43 IST

एसटी कर्मचाऱ्यांच्या मागण्या जोपर्यंत मान्य होत नाही तोपर्यंत आंदोलनच सुरूच राहणार असल्याचे एसटी कर्मचारी संघर्ष युनियनचे नेते शशांक राव यांनी सांगितले. शशांक राव आज, कोल्हापुरात एसटी कर्मचाऱ्यांच्या भेटीस आले होते.

कोल्हापूर : एसटी कर्मचाऱ्यांच्या मागण्या जोपर्यंत मान्य होत नाही तोपर्यंत आंदोलनच सुरूच राहणार असल्याचे एसटी कर्मचारी संघर्ष युनियनचे नेते शशांक राव यांनी सांगितले. शशांक राव आज, कोल्हापुरात एसटी कर्मचाऱ्यांच्या भेटीस आले होते. यावेळी प्रसारमाध्यमांशी बोलताना त्यांनी ही माहिती दिली.

यावेळी बोलताना शशांक राव म्हणाले, विलिनीकरण झाले नाही तर कामगारांचे रोजचे मरण आहे. आधीच एसटी कर्मचाऱ्यांना फार कमी पगार आहेत. त्यात आता पगार येईल की नाही याची शाश्वती नाही. नोकरी टिकण्याची शाश्वती नाही. कोवीड काळात एसटी कर्मचाऱ्यांनी दिलेली सेवा सर्वांनी पाहिली आहे. मात्र सरकार एसटी कर्मचाऱ्यांच्या मागण्याकडे गार्भियाने पाहणार नसेल आणि सकारात्मक निर्णय घेणार नसेल तर हे आंदोलन आणखी तीव्र करणार असल्याचे त्यांनी सांगितले. 

विलिनीकरणाच्या मागणीसाठी राज्यभरातील एसटी कर्मचारी गेल्या १४ दिवसांपासून आंदोलन करत आहेत. कोल्हापुरात देखील गेल्या पाच दिवसांपासून आंदोलन सुरू आहे. या आंदोलनात हजारो एसटी कर्मचारी सहभागी आहेत. जोपर्यंत एसटी कर्मचाऱ्यांच्या मागण्या पूर्ण होत नाहीत तोपर्यंत हे आंदोलन सुरूच ठेवण्याचा आक्रमक पवित्रा कर्मचाऱ्यांनी घेतला आहे. मात्र, संपात सहभागी असलेल्या अनेक कर्मचाऱ्यांचे निलंबन देखील करण्यात आले आहे.

दरम्यान मध्यवर्ती बसस्थानकात आंदोलनकर्त्या कर्मचाऱ्यांनी शासनाला सुबुद्धी येऊ दे, आंदोलन संपून लालपरी रस्त्यावर धावू दे रे महाराजा... असे म्हणत एसटीलाच गाऱ्हाणे घातले. एसटीला हार घालून आरती केली. दरम्यान, पाचव्या दिवशीही कर्मचाऱ्यांचे ठिय्या आंदोलन सुरूच आहे. .दरम्यान, एसटी सेवा पूर्णपणे ठप्प झाल्याने प्रवाशांचे अतोनात हाल होत आहेत. तर दुसरीकडे खासगी वाहनधारकांकडून प्रवाशांकडून जादा दर आकारला जात असून लुट सुरु आहे. अनेक प्रवाशी स्थानकात बसून आहेत. एकूणच बसस्थानकात कमालीचा शुकशुकाट जाणवत आहे. या आंदोलनामुळे एसटी महामंडळास मोठा तोटा होत आहे. 

टॅग्स :ST Strikeएसटी संप